बोगस हमालांना मार्केट यार्डाच्या आवारात फिरकू न देण्याचा इशारा बाजार समितीने दिल्यानंतरही या हमालांकडून जादा हमाली घेतली जात असल्याचे प्रकार आढळून येऊ लागले आहेत. या हमालांनी आता एक पोत्यासाठी १५ रुपये मनमानी हमाली घेण्यास सुरू केली आहे. बेकायदा हमाली आकारणाऱ्या लोकांबाबत तक्रारी आल्या नाहीत, असे समितीने स्पष्ट केले.
↧