बालगंधर्व संगीत नाट्य मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संगीत नाट्यपरिषदेमध्ये संगीत नाटकांकडे पाठ फिरवणारे प्रेक्षक, शासनाची अनास्था, कलाकारांना मिळणारे कमी मानधन आणि भेडसावणाऱ्या समस्या या सर्वांवर तोडगा काढण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या समस्यांवर मात करण्यासाठी संगीत नाट्य अकादमीची स्थापना करावी असे मत पंडित रामदार कामत यांनी चर्चासत्रामध्ये मांडले.
↧