दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाईसह फराळाच्या खाद्यपदार्थासाठी वापरण्यात येणाऱ्या रवा, मैदा, बेसन, तेल, वनस्पती तूप, खवा यातील भेसळ रोखण्यासाठी पुणे विभागाचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) सज्ज झाले आहे. एक नोव्हेंबरपासून पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत या संदर्भात विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
↧