अपघाताच्या तक्रारीमध्ये अटकेची धमकी देत पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मार्केटयार्ड पोलिस स्टेशनमधील लाचखोर सहाय्यक फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सकाळी अटक केली. संपत भागोजी मालुसरे असे या सहाय्यक फौजदाराचे नाव असून पोलिस स्टेशनच्या शेजारी सापळा रचण्यात आला होता.
↧