महानगरपालिका हद्दीबाहेरील प्रादेशिक योजनेमधील गृहनिर्माण प्रकल्पांना सार्वजनिक सुविधांची जागा (अॅमिनिटी स्पेस) आणि अंतर्गत रस्त्यांचा एफएसआय देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याबाबतचे पंचवीस प्रस्ताव जिल्हाप्रशासनाकडे आले असून यामुळे शाळा, हॉस्पिटल तसेच खेळाच्या क्रिडांगणासाठी जागा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
↧