महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या नवजात बालिकेचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी ‘बालिका जन्मोत्सव योजने’तून कपड्यांची खरेदी करण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेने १३ लाख २८ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली असून, ही योजना येत्या १५ ऑगस्टपासून सुरू करण्याचा विचार आहे, असे यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलचे आरोग्य अधिकारी डॉ. कमल यादव यांनी सांगितले.
↧