श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत फुगेवाडी येथील आझाद मित्रमंडळाने पिंपरी -चिंचवड शहरातील पहिले पारितोषिक पटकाविले. तर, नेहरूनगर येथील झिरोबॉईज मित्रमंडळ दुसरे, पिंपरी येथील शिवराजे प्रतिष्ठानला तिसरे, चिंचवड येथील भोईर कॉलनी मित्रमंडळ चौथे, तर भोसरी येथील दामुशेठ गव्हाणे मित्रमंडळाला पाचवे पारितोषिक मिळाले.
↧