घरात गॅस सिलिंडर असूनही काही ग्राहकांकडून केरोसिनचा वापर होत असून, त्याला आळा घालण्यासाठी रेशन कार्डवर गॅस स्टँपिंग करण्यात येत आहे. त्यामुळे आता रेशन कार्डवर गॅस स्टँपिंग असल्यानंतरच सिलिंडर देण्यात येणार असून, १५ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण शहरात ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
↧