Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

१५ आमदार BJP च्या वाटेवर

$
0
0
राज्यातील १४ ते १५ आमदारांचा गट भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याचा दावा भाजपचे उपाध्यक्ष वसंत वाणी यांनी नुकताच पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे सत्तेच्या मार्गावर असलेल्या भाजपने फोडाफोडीचे राजकारण सुरू केल्याचे समोर आले आहे.

प्रस्थापितविरोधी लाट भुईसपाट

$
0
0
कसब्यात प्रस्थापित आमदारांविरोधात जनमत असल्याचे वातावरण विरोधी पक्षांनी तयार केले आणि मतदारसंघात पसरवलेही; परंतु सलग चार वेळा निवडून जाणारा लोकप्रतिनिधी मतदारसंघातील मतदारांची नस पकडू शकणार नाही, असे अभावानेच घडते.

थंडीचा कडाका शहरात कायम

$
0
0
सलग दुसऱ्या दिवशी रविवारी शहरात थंडीचा कडाका कायम होता. दिवसभर शहरात ढगाळ वातावरण असले, तरी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. दरम्यान, अरबी समुद्रातील ‘निलोफर’ चक्रीवादळाचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले असून त्यामुळे पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहून थंडीही कायम राहण्याची शक्यता आहे.

वीज क्षेत्रातील ‘इन्स्पेक्टर राज’ खालसा

$
0
0
वीजपुरवठा क्षेत्रातील ‘इन्स्पेक्टर राज’ लवकरच संपुष्टात येणार आहे. विद्युत निरीक्षकांकडून वीज संच मांडणीच्या तपासणीचे बंधन काढून टाकण्याची दुरुस्ती केंद्रीय वीज प्राधिकरणाने (सीइए) केली आहे.

सुट्या संपल्याने रस्त्यांवर कोंडी

$
0
0
दिवाळीच्या सुट्या आणि वीकएण्ड जोडून आल्याने पर्यटनासाठी गेलेले नागरिक रविवारी दुपारनंतर पुन्हा शहरात परतले. त्यामुळे सातारा रोडवरील कापूरहोळ ते खेड शिवापूर टोल नाका या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

निराधारांच्या मुखी ते भरवतात घास

$
0
0
हो... ते डबेवाले आहेत; पण स्वखर्चाने असहायतांना दोन वेळचे जेवण घरपोच देणारे. जुन्नरच्या सलिम सय्यद या युवकासह त्याच्या मित्रपरिवारातील २५ युवक एकत्र येतात, प्रत्येकी एक हजार रुपये काढतात...

नदीपात्रातील रस्त्याला स्पीडब्रेकर

$
0
0
शहरातील पर्यावरणवादी आणि महापालिका प्रशासन यांच्यातील वादामुळे वर्षानुवर्षे रखडलेल्या नदीपात्रातील रस्त्याच्या कामाला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. या रस्त्याचे काम करण्यासाठी दिलेली स्थगिती सुप्रीम कोर्टाकडून उठविण्यात आली असली, तरी पर्यावरणप्रेमी घटकांनी आता राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) तक्रार दाखल केली आहे.

काँग्रेसच्या गडावर भगवा फडकला

$
0
0
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघावर पूर्वीपासूनच काँग्रेसच्या विचारांचा पगडा राहिला आहे. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर या मतदारसंघात गेली पंधरा वर्षे राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. दिवंगत नारायणराव पवार यांनी सर्वाधिक म्हणजे सलग चार वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

विशीतल्यांनाही ‘स्किझोफ्रेनिया’

$
0
0
‘चोरी छुपे’ मित्रांच्या संगतीने गांजा ओढण्याच्या सवयीमुळे स्वभावात नैराश्य, उदासीनता आलेल्या पंधरा वर्षांच्या लहान मुलांमध्येच आता ‘स्किझोफ्रेनिया’ मानसिक आजाराची लक्षणे आढळून येत आहेत.

भाज्यांचे दर कडाडले

$
0
0
पाऊस आणि थंडीमुळे शेतमालाचे उत्पादन कमी झाले असून सण आणि सुट्ट्यांमुळे मालाची आवकही कमी झाली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत आवक कमी आहे. परिणामी, घाऊक बाजारात सर्वच पालेभाज्या व फळभाज्यांच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

टोलचा ‘गोलमाल’ रोखणार

$
0
0
टोलनाक्यावरून नेमकी किती वाहने जातात, कोणत्या प्रकारची वाहने ये-जा करतात, या वाहनांकडून गोळा केला जाणार टोल नेमका किती असतो आणि तो किती दाखविला जातो यासंदर्भातील सगळा ‘गोलमाल’ आता रोखला जाणार आहे.

लवकरच ‘ऑनलाइन’ उतारे

$
0
0
​खरेदी दस्तनोंदणी झाल्यानंतर काही तासांत महसूल अभिलेखात त्याची फेरफार नोंद घेण्याच्या योजनेस राज्यातील तीन तालुक्यांत प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात करण्यात आली आहे.

१०-१२वीच्या गुणपत्रिका क्लिकवर

$
0
0
शैक्षणिक प्रवेशासाठी किंवा नोकरीसाठी सादर केलेली दहावी-बारावीची गुणपत्रिका खरी आहे किंवा नाही, हे आता एका ‘क्लिक’वर पडताळून पाहणे शक्य होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येत्या जानेवारीत गेल्या दहा वर्षांतील गुणपत्रिका ऑनलाइन उपलब्ध करण्याच्या तयारीत आहे.

अॅपमधून होणार म्युझियमची सैर

$
0
0
एखाद्या म्युझियममधून तुम्ही फिरत आहात, समोर एखादी ऐतिहासिक वस्तू आहे आणि त्याची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाइलवर मिळत चालली आहे. तुमच्या आजूबाजूच्या वस्तू बदलल्या, की मोबाइलवरची माहितीही आपोआपच बदलणार आहे. गरज असेल, ती केवळ एका ‘अॅप’ची !

सातबारा लवकरच ऑनलाइन

$
0
0
खरेदी दस्तनोंदणी झाल्यानंतर काही तासांत महसूल अभिलेखात त्याची फेरफार नोंद घेण्याच्या योजनेस राज्यातील तीन तालुक्यांत प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात करण्यात आली आहे. ही ‘ई-फेरफार’ योजना ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे त्यास विलंब झाला आहे.

उद्योजक अजय चोरडियांची आत्महत्या

$
0
0
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील प्रसिद्ध उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिक ईश्वरदास चोरडिया यांचे पुत्र अजय चोरडिया यांनी चिंचवड येथील एका हॉटेलात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, सोमवारी घडली.

भारिप बहुजन महासंघाचे रास्ता रोको

$
0
0
अहमदनगर जिल्ह्यात जवखेडा खालसा येथील सुनील जाधव आणि कुटुंबीयांच्या हत्येच्या घटनेला आठ दिवस पूर्ण झाले, तरी पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक केली नसल्याने भारिप बहुजन महांसघाच्या युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सलग चौथ्या दिवशी शहराच्या विविध भागात रास्ता रोको आंदोलन केले.

मनसैनिक जाणार ‘कृष्णकुंज’वर

$
0
0
विधानसभा निवडणुकीनंतर एकच नेता, एकच आमदार असे स्वरूप आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी कार्यकर्त्यांनीच पुढाकार घेतला आहे. पक्षात आलेली मरगळ झटकण्यासाठी हजारो कार्यकर्ते ‘मनसे’ थेट राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी धडकणार आहेत.

वैयक्तिक लाभाच्या कामांमुळे ‘मनरेगा’च्या मजुरांत वाढ

$
0
0
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या वैयक्तिक लाभाच्या कामांमुळे मजुरांच्या संख्येत वाढ झाली आहे. वैयक्तिक लाभाच्या विविध ८५६ कामांवर सात हजार २८६ मजुरांची उपस्थिती असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

नगरमधील हत्याकांडाविरोधात निदर्शने

$
0
0
नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील जाधव कुटुंबीयांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमधील विविध संघटनांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सोमवारी निदर्शने करण्यात आली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>