Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

संशोधनाचा उपयोग समाजहितासाठी व्हावा

$
0
0
‘विद्यार्थ्यांनी केवळ संशोधन न करता ते कृतीत आणले पाहिजे. या संशोधनाचा उपयोग समाजहितासाठी व्हावा,’ असे मत ‘संशोधनपद्धती’ विषयावरील चर्चासत्रात तज्ज्ञांनी व्यक्त केले.

‘एक्स्प्रेस वे’वर अपघात

$
0
0
टायर पंक्चर झाल्यामुळे एक्स्प्रेस वेच्या कडेला थांबलेल्या ट्रकला तेलंगण राज्य परिवहन मंडळाची बस मागच्या बाजूने धडकल्यामुळे झालेल्या अपघातात १७ जण गंभीर जखमी झाले.

पिंपरीतही ‘शत-प्रतिशत’चे ध्येय

$
0
0
पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्येही भारतीय जनता पक्षाने ‘शत-प्रतिशत’चे ध्येय ठेवले आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनंतर राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळकतकरातून पालिकेच्या तिजोरीत सहाशे कोटींची भर

$
0
0
मिळकतकर विभागाने आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत सुमारे सहाशे कोटी रुपयांच्या उत्पन्नाची भर पालिकेच्या तिजोरीत टाकली आहे. पहिल्या सात महिन्यांतील वसुली गेल्यावर्षीएवढीच असली, तरी उर्वरित कालावधीत आणखी तीनशे कोटी रुपये प्राप्त करण्याचे उद्दिष्ट विभागाला साध्य करावे लागणार आहे.

कर्नाटकात खून करणाऱ्या आरोपीला अटक

$
0
0
कर्नाटकमध्ये खून करून फरार झालेला आरोपी अजय वाघमारे (वय २२, रा. जनता वसाहत) यास रविवारी पुण्यात अटक करण्यात आली.

सुट्टीच्या दिवशी पर्यटन करणे, हा गुन्हा आहे का?

$
0
0
दिवाळीतील चार दिवसांच्या सुट्ट्या ‘एन्जॉय’ केल्यानंतर पुन्हा एकदा घड्याळावर पळण्यासाठी जड मनाने निघालेल्या पर्यटकांनी परतीचा देखील किती त्रासदायक असू शकतो, याचा अनुभव रविवारी घेतला.

‘NGO’च्या व्यवहारांवर सरकारची करडी नजर

$
0
0
केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार वीस हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमेचे रोखीने केलेल्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी केली जाणार आहे. सार्वजनिक संस्था, ट्रस्ट, स्वयंसेवी संस्थांच्या कागदपत्रांची त्यांनी केलेल्या सर्व खर्चाची फेरचौकशी करण्यात येणार आहे.

जिवाभावाची व्यक्ती हरविल्यानंतर…

$
0
0
घरातून पळून जाणाऱ्या मुला-मुलींमध्ये १४ ते १८ वयोगटातील मुलांचे प्रमाण सर्वाधिक असून, त्यात मुली ‘आघाडी’वर आहेत. लहान मुलांच्या तुलनेत मोठ्या व्यक्ती गायब होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

सोलापूर रोडवर अपघातात तरुण ठार

$
0
0
प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपचा टायर फुटल्याने जीप पलटी होऊन झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला, तर तरुणी गंभीर जखमी झाली. पुणे-सोलापूर रस्त्यावर ‘मांजरी स्टड फॉर्म’च्या समोर ही घटना घडली.

अॅसिड हल्ला, हुंडाबळींवर मोफत इलाज

$
0
0
मुलगी जन्माला आल्यानंतर पूर्ण बिल माफ करण्याचा कौतुकास्पद उपक्रम सुरू केलेले हडपसरचे डॉ. गणेश राख यांनी हुंडाबळीच्या प्रकरणांत भाजलेल्या महिलांवर मोफत उपचार करण्याची घोषणा केली आहे.

पालखी मार्गाचे रुंदीकरण रेंगाळले

$
0
0
आळंदी-पंढरपूर या संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. दिवेघाट माथा ते सासवड शहर हद्दीत अनेक ठिकाणी सुरू असलेले काम ठेकेदार कंपनीने अर्धवट सोडून दिले असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

लाळ्या खुरकूत रोगाची लस जिल्ह्यात उपलब्ध

$
0
0
पुणे जिल्ह्यात जनावरांना होणाऱ्या लाळ्या खुरकूत रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून डोस उपलब्ध झाले आहेत. जिल्ह्यातील नऊ लाख ५४ हजार ५५० जनावरांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. जनावरांसाठी लवकरच लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणूक यापुढे लढविणार नाही

$
0
0
‘पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नाही. मात्र, काँग्रेसच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी आतापासूनच प्रामणिकपणे काम करणार,’ अशी घोषणा काँग्रेसचे हडपसरमधील पराभूत उमेदवार बाळासाहेब शिवरकर यांनी केली.

राष्ट्रवादी कागदावर बलाढ्य

$
0
0
पुरंदर विधानसभा मतदारसंघातील निकालाने तालुक्याची राजकीय समीकरणे बदलली असून, राष्ट्रवादी हा कागदावर मोठा आणि केवळ नेत्यांचा पक्ष उरला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘फॉरेन्सिक’ भरतीत अपंगांना स्थान द्या

$
0
0
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयामार्फत राज्यातील प्रादेशिक न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) सुरू असलेल्या नोकरभरती प्रक्रियेत अपंगांसाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या नाहीत.

३४ कोटींचा कर बुडाला

$
0
0
ग्रामपंचायतींच्या हद्दीत सुरू असलेल्या बांधकामांवरील कर बुडवण्यासाठी बांधकाम व्यावसायिक बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही संबंधित ग्रामपंचायतीला त्याची माहिती देत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिवाळीनंतरचा पाऊस रब्बी पिकांसाठी फायद्याचा

$
0
0
दिवाळीनंतर सुरू झालेला पाऊस हा गहू आणि रब्बी ज्वारी या पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे, तर त्यामुळे निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणाने पालेभाज्या आणि फळबागांची काळजी घेण्याची वेळ आली आहे.

‘RTI’च्या जागरुकतेबाबत उदासीनता

$
0
0
माहिती अधिकारामुळे प्रशासकीय कारभारामध्ये पारदर्शकता येत आहे. मात्र, या कायद्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्याबाबत शासन उदासीन असल्याचेच चित्र आहे.

नगररोड बीआरटीला मुहूर्त

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये अडकलेला नगररोड बीआरटी प्रकल्प लवकरच सुरु होणार आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी सुरु करण्यासाठीचा अहवाल महापालिकेने अहमदाबाद बीआरटीकडून मागविला असून हा अहवाल येताच पुढील आठवड्यापासून हा बीआरटी मार्ग सुरु होईल, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.

परदेशी पक्ष्यांचा पहिला थवा महाराष्ट्रात

$
0
0
गवताळ प्रदेशातील भोवत्या, जंगलातील पर्ण वटवट्या, फ्लॉय कॅचर्स, गोड्यापाणवठ्यांवरील तुतवार, समुद्र किनाऱ्यावरील सूरय, चिखले, … अशा विविध अधिवासातील वैविध्यपूर्ण परदेशी पक्षांची पहिली लाट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नुकतीच धडकली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images