Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

भाजप प्रवेशाचे अचूक टायमिंग

$
0
0
सर्वत्र उसळलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाचे अचूक टायमिंग गाठत चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांनी मोठ्या मताधिक्यासह विजय मिळवला.

पुण्याला दोन लाल दिवे?

$
0
0
राज्यातील भाजप सरकारमध्ये पुणे शहराकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये वरिष्ठ आमदार गिरीश बापट यांच्या नावाची मंत्रीपदासह विधानसभेच्या अध्यक्षपदासाठीही चर्चा सुरू झाली आहे.

मोदी बरेच काही करतील

$
0
0
निवडणुकीच्या काळात भाजपच्या केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी निवडणुका संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक सुरू केले आहे.

दिवाळीनंतर पावसाळा!

$
0
0
दिवाळीत गुलाबी थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेकरांना दिवाळीच्या शेवटच्या दिवशी चक्क जलाभिषेक अनुभवायला मिळाला. पुण्यासह संपूर्ण राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान, अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असून. संपूर्ण राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

संतोष माने प्रकरणातील अकरा दावे एकाच कोर्टात

$
0
0
बसचालक संतोष मानेप्रकरणी एसटी महामंडळाविरुद्ध कोर्टात दाखल करण्यात आलेले अकरा दावे एकाच कोर्टात वर्ग करण्याचा आदेश ​​जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश कालिदास वडणे यांनी दिला आहे.

‘बोल्शेविक नीती’चा अवलंब करण्याचा माओवाद्यांचा घाट

$
0
0
कमकुवत झालेली चळवळ शहर पातळीवर पुनर्जीवित करण्यासाठी 'बोल्शेविक' रशियन नीतीचा अवलंब करण्याचा घाट माओवाद्यांकडून घातला जात असल्याचे इनपुट तपास यंत्रणांना समजले आहे.

‘वेताळ टेकडी’ वाचविण्यासाठी आंदोलन

$
0
0
वेताळ टेकडीच्या सुशोभीकरणाच्या निमित्ताने तेथील निसर्गसौंदर्य नष्ट करण्याचा घाट वनविभागाने सध्या घातला आहे. वेताळ टेकडीवर कृत्रिम विकासकामांपेक्षा तेथील वनसंपदेचे वृक्षतोड आणि अस्वच्छतेपासून टेकडीचे संरक्षण करा, अशी मागणी डेक्कन जिमखाना परिसर समितीने वन विभागाला केली आहे.

१० भिकाऱ्यांना कष्टाची ‘भाकरी’

$
0
0
वयाच्या सहाव्या वर्षापासून स्वारगेट चौकात येणाऱ्या जाणाऱ्यांपुढे भीक मागणाऱ्या तरुणासह दहा जणांची भीक मागण्यापासून सुटका करण्यात आली असून, त्यांच्या हाताला चांगल्या संस्थांमध्ये ‘रोजगार’ मिळू लागला आहे.

नगर हत्याकांडाचा संघटनांकडून निषेध

$
0
0
नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील जाधव कुटुंबीयांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघातर्फे पुण्यात नुकतेच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पिकांच्या उत्पादनाच्या चाचण्या तातडीने थांबवा

$
0
0
जनुकीय बदल केलेल्या (जी. एम.) पिकांमुळे मानवी आरोग्यावर होणारे संभाव्य दुष्परिणाम विचारात घेता, राज्यात आणि देशात अशा पिकांच्या उत्पादनाच्या होणाऱ्या चाचण्या तातडीने थांबविण्याची मागणी ‘जी. एम. मुक्त भारत अभियाना’तर्फे करण्यात आली.

ट्रॅक्टर ट्रॉलीवर जीप आदळून चौघांचा मृत्यू

$
0
0
नाणीज येथून परतणाऱ्या शिरोलीतील भाविकांची जीप ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला आदळून ४ जण ठार, तर आठ जण जखमी झाले. पहाटे सहाच्या सुमारास नारायणगाव-ओझर रस्त्यावर हा अपघात घडला.

बिबट्या ६ तासांनंतर विहिरीबाहेर

$
0
0
पिंपरी पेंढारच्या दुरगुडे मळ्यातील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात वनविभागाला यश आले आहे. ही घटना घडली त्या परिसरात मेढपाळांचे पाल होते. रात्री ११ च्या सुमारास पालातील मेंढीची शिकार करण्याच्या हेतूने बिबट्या तेथे आला.

विहिरीत पडलेल्या तरसाला वाचविले

$
0
0
आंबोली (ता. खेड) येथे गावालगतच्या पाण्याने भरलेल्या विहिरीत पडलेल्या दोन तरसांपैकी एकाला वाचवण्यात यश आले, मात्र दुसऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात भटकत असलेले दोन तरस गावाजवळ असलेल्या धर्मा शिंदे यांच्या विहिरीत पडले होते.

पिंपळवंडी येथे एटीएम फोडले

$
0
0
पिंपळवंडी येथे गुरुवारी पहाटे चोरट्यांनी बँक आँफ महाराष्ट्रचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला; परंतु मशिनमध्ये पैसेच नसल्यामुळे हा प्रयत्न अयशस्वी झाला. डी. आर. काकडे पॉलिटेक्निक कॉलेजच्या शेजारीच बँक आँफ महाराष्ट्रची शाखा आहे.

आचारसंहितेच्या काळात १७ लाखांचे मद्य जप्त

$
0
0
भवानी पेठेतील कासेवाडी येथे मोकळ्या मैदानात विदेशी मद्याच्या ३३ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. भवानी पेठेतील कासेवाडी भागात बबन उर्फ रवींद्र भीमराव साठे (वय ३२, रा. कासेवाडी, भवानी पेठ) याच्याविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलझाला आहे.

पत्नीच्या हत्येनंतर पतीची आत्महत्या

$
0
0
घरगुती वादातून पत्नीचा गळा चिरून हत्येचा प्रयत्न करीत पतीने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवार (२६ ऑक्टोबर) सकाळी सातच्या सुमारास रहाटणी येथे ही घटना घडली.

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

$
0
0
लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर बलात्कार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आरोपीला ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

दिवाळीच्या काळात ५५ ठिकाणी आगी

$
0
0
दिवाळीच्या तीन दिवसांत फटाक्यांमुळे शहरात आगी लागण्याच्या ५५ घटना घडल्या असून या सर्व आगी उंच उडविल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे लागल्या असल्याचे निदर्शनास आले आहे.

...मात्र, बाजारपेठांमध्ये तुडुंब गर्दी

$
0
0
यंदाच्या दिवाळीत ऑनलाइन खरेदी भाव खाऊन गेली असली, तरी सर्वसामान्य ग्राहकांची नाळ बाजारपेठेशीच जुळलेली असल्याने बाजारपेठांमध्येही गर्दी दिसून आली. वेळेवर मिळालेला बोनस, सोन्या-चांदीच्या भावात झालेली घट आणि खरेदीसाठी ग्राहकांनी दाखवलेला उत्साह यामुळे यंदा पुण्याच्या बाजारपेठेत चांगली उलाढाल झाली.

यंदाचे दिवाळी शॉपिंग ऑनलाइन

$
0
0
यंदाची दिवाळी भारतीयांसाठी ऑनलाइन दिवाळी ठरण्याची शक्यता आहे. यंदाच्या दिवाळीत ऑनलाइन शॉपिंगमध्ये तब्बल ३५० टक्क्यांची वाढ झाल्याचा अंदाज आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images