Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

५४० डॉक्टर अडचणीत

$
0
0
स्वतःच्या हक्कासाठी राज्यातील सरकारी डॉक्टरांनी (मॅग्मो) पुकारलेल्या संपाचा फटका प्रत्यक्षात सहकारी कनिष्ठ डॉक्टरांनाच बसला. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) राज्यातील डॉक्टरांना आरोग्य खात्याने निलंबित केल्याने तीन महिन्यांपासून घरी बसलेल्या ५४० डॉक्टरांची ऐन दिवाळीत उपासमार होत आहे.

मनपाही होणार पंचरंगी?

$
0
0
विधानसभेच्या निवडणुकीत यशस्वी ठरलेला स्वबळाचा फॉर्म्युला यापुढे महापालिकेच्या निवडणुकीतही वापरावा, असा मतप्रवाह भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये मूळ धरू लागला आहे. भाजपला ताकद वाढविण्यासाठी, तर शिवसेनेला अस्तित्व टिकविण्यासाठी स्वबळाशिवाय पर्याय नाही, असे मतदानातून आढळले आहे.

'तो' अहवाल वादात

$
0
0
महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांतील बीडीपी आरक्षणाच्या जागा मालकांना आठ टक्के ग्रीन टीडीआरने देण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष करत पालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बीडीपीबाबत सीडॅकऐवजी मोनार्क संस्थेचा अहवाल स्वीकारला.

आमदार आप्ताच्या हत्येचा कट

$
0
0
पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित आमदाराच्या नातेवाइकाच्या हत्येचा कट रचणाऱ्या तिघांना मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. राजकीय वैमनस्यातून रचण्यात आलेल्या या कटात देहू कँटोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्षासह छोटा शकीलच्या दोन हस्तकांचा समावेश आहे.

मैत्रीत रमणारा आमदार

$
0
0
साहित्यिकांपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांशीच मैत्री असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचित असलेल्या विजय काळे यांना शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार होण्याचा मान मिळाला आहे.

केंद्राचे इंदिराप्रेम ‘वितळले’

$
0
0
सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करण्याचा आदेश देणाऱ्या केंद्र सरकारकडून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाळण्यात येणारा राष्ट्रीय एकात्मक दिन व सप्ताह मात्र अव्हेरण्यात आला आहे.

चित्रपटामुळे 'प्रकाशवाटा' प्रकाशात!

$
0
0
हेमलकसासारख्या दुर्गम भागात राहून वेगळे विश्व निर्माण करणाऱ्या डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्यावर आधारित ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटामुळे ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकाच्या मागणीत वाढ झाली आहे. हे पुस्तक प्रकाशित झाल्यापासूनच त्याला वाचकांचा चांगला प्रतिसाद असला, तरी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे या पुस्तकाच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.

पुण्यात तरुणीचा विनयभंग?

$
0
0
पुण्यातील पिंपळे गुरवमधील काटेपुरम चौकाजळील आनंद पार्क येथे शुक्रवारी रात्री एक ३० वर्षाची तरुणी अर्धनग्न अवस्थेत आढळली. या तरुणीला सांगवीच्या काँफी शाँपमध्ये कोणीतरी नकळत गुंगीचे औषध पाजले व त्यानंतर पुढे काय झाले, हे आठवत नसल्याचे तिने पोलिसाना सांगितले. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑक्टोबर ‘हीट’मध्ये पाऊसही!

$
0
0
सणासुदीचा आनंद आप्तस्वकीयांसह घेण्याच्या पूर्ण तयारीत असणाऱ्या पुणेकरांच्या मूडवर शनिवारी पावसाने पाणी फिरविले. दिवसभर थांबूनथांबून सुरू असलेली पावसाची रिपरिप आणि कुंद हवा, यामुळे ऑक्टोबरअखेरीस जून सुरू असल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला.

शिक्षकनगरमध्ये १४ गाड्यांची तोडफोड

$
0
0
कोथरूड येथील शिक्षक नगर भागात चौघा व्यक्तींनी दगड-विटा मारून १४ गाड्यांची तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी नितीन मालपोटे (वय २२, नवीन शिवणे) व त्याच्या तीन साथीदारांविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळे गुरवमध्ये आढळलेल्या बेशुद्ध तरुणीचे गूढ उकलले

$
0
0
पिंपळेगुरव येथील आनंद पार्क येथे शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) रात्री तीस वर्षीय तरुणी अर्धनग्न स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली. एका कॉफी शॉपमध्ये कोणीतरी नकळत गुंगीचे औषध पाजले आणि त्यानंतर पुढे काय झाले, हे आठवत नसल्याचे या तरुणीने पोलिसांना सांगितले.

लोहगाव विमानतळावर २ किलो सोने जप्त

$
0
0
दुबईहून तस्करी करून सोने आणणाऱ्या एका प्रवाशाला सीमा शुल्क (कस्टम) विभागाने काल लोहगाव विमानतळावर पकडले. त्याच्याकडून ५८ लाख ७१ हजार ५३९ रुपये किमतीचे, दोन किलो १० तोळे वजनाचे सोन्याचे दोन बार जप्त करण्यात आले आहेत.

सोनसाखळी चोरांची टोळी जेरबंद

$
0
0
शहरात शुक्रवारी सकाळी साडेआठ ते पावणे दहा वाजण्याच्या सुमारास शहरात सोनसाखळी चोरी करणाऱ्या इराणी टोळीला अवघ्या सहा तासांमध्ये जेरबंद करण्याची कामगिरी शहर पोलिस दलाच्या युनिट तीनने केली आहे.

पुणे विद्यार्थी गृहाचे डॉ. प. भ. कुलकर्णी कालवश

$
0
0
पुणे विद्यार्थी गृहाचे माजी कार्याध्यक्ष डॉ. प. भ. कुलकर्णी (वय ८२ वर्षे) यांचे शुक्रवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. पुणे विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ प्रिंटिंग टेक्नोलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नोलॉजी आदी संस्थांसाठी संस्थापक सदस्य म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

भर दुपारी भरली हुडहुडी

$
0
0
दिवाळीच्या सुरुवातीला नाही तरी शेवटाला मात्र, थंडीने राज्यभर हातपाय पसरले आहेत. शनिवारी शहरातील कमाल तापमानात तब्बल आठ अंशांची घट झाल्याने पुणेकरांना भर दुपारी हुडहुडी भरली. पुण्यासह राज्यातील कमाल तापमानात सरासरी सात अंशांची घट झाल्याने राज्यातील नागरिकही गारठले.

ऑक्टोबर ‘हीट’मध्ये पाऊसही ‘प्रेझेंट’!

$
0
0
सणासुदीचा आनंद आप्तस्वकीयांसह घेण्याच्या पूर्ण तयारीत असणाऱ्या पुणेकरांच्या मूडवर शनिवारी पावसाने पाणी फिरविले. दिवसभर थांबूनथांबून सुरू असलेली पावसाची रिपरिप आणि कुंद हवा, यामुळे ऑक्टोबरअखेरीस जून सुरू असल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला.

रविवार पेठेत गोडाउनला आग

$
0
0
रविवार पेठेतील सुभानशहा दर्ग्याजवळील गोडाउनला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. दोन तासात ही आग आटोक्यात आणण्यात फायरब्रिगेडच्या जवानांना यश आले. सुभानशहा दर्ग्याजवळ सोमाणी बिल्डिंगमध्ये युवराज प्रजापती यांचे गोडाउन आहे.

माळी समाजाची साथ अन् मोदींचा करिष्मा

$
0
0
भाजप सेनेची तुटलेली युती, मराठी समाजाच्या मतांची झालेली विभागणी, माळी समाजाने दिलेली साथ या शिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोदी लाटेचा करिष्मा यामुळेच हडपसरच्या आमदारकीची विजयमाळ भाजपच्या योगेश टिळेकर यांच्या गळ्यात पडली.

‘NMMS’ची परीक्षा पुढे ढकलली

$
0
0
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राज्य पातळीवर आयोजित केली जाणारी राज्यस्तरीय राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा (एनएमएमएस) दोन महिने पुढे ढकलण्यात आली आहे.

‘अॅप’मधून होणार म्युझियमची सैर

$
0
0
एखाद्या म्युझियममधून तुम्ही फिरत आहात, समोर एखादी ऐतिहासिक वस्तू आहे आणि त्याची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाइलवर मिळत चालली आहे. तुमच्या आजूबाजूच्या वस्तू बदलल्या, की मोबाइलवरची माहितीही आपोआपच बदलणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images