Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पालिकेतील ‘माननीय’ आता विधानसभेत!

$
0
0
महापालिकेच्या सभागृहात नेतृत्व करणाऱ्या दोन नगरसेवकांना या निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभेच्या सभागृहात बसण्याची संधी मिळाली आहे. मागी‌ल निवडणुकीच्या तुलनेत मात्र यंदा ही संख्या घटली आहे.

लांडगेंनी रोवला अपक्षांचा झेंडा

$
0
0
सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढत असतानाही अपक्ष म्हणून निवडून येणे खरेतर खूप जिकिरीचे असते. संपूर्ण जिल्ह्यात एकमेव अपक्ष म्हणून निवडून आलेल्या महेश लांडगे यांनी या वेळी भोसरीचे वेगळेपण सिद्ध केले आहे.

कमळाचा ‘रौप्यमहोत्सव’

$
0
0
मावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संजय उर्फ बाळा भेगडे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी ज्ञानेश्वर उर्फ माउली दाभाडे यांचा २८,००१ मतांनी पराभव करून मावळात कमळाच्या विजयांचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत कार्यकर्त्यांना दिवाळी भेट दिली आहे.

शिवतारेंचा विजय

$
0
0
​पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या चौरंगी लढतीत शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे यांनी काँग्रेसचे संजय जगताप यांच्यावर ८,४८० मतांची आघाडी घेत विजय मिळवला.

राष्ट्रवादीचा पाडाव

$
0
0
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात अतिशय चुरशीने लढल्या गेलेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सुरेश गोरे यांनी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांचे कडवे आव्हान सहज मोडून काढत मोहिते यांचा ३२,५७३ मतांनी दणदणीत पराभव करून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला व या मतदारसंघात प्रथमच भगवा फडकवला.

मोदीलाटेचे दौंडला ‘जंक्शन’

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार रमेश थोरात यांचा ११ हजार ३४५ मतांनी पराभव करून राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार राहुल कुल यांनी विजय मिळवला. कुल-थोरात या तालुक्यातील पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांच्या लढाईत इतर सोळा उमेदवारांची धूळधाण उडाली. कुल यांना ८७,६४९ मते पडली.

मनसेचा राज्यातील एकमेव शिलेदार

$
0
0
राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निःप्पात झाला असताना जुन्नरमध्ये मनसेचे शरद सोनवणे यांनी शिवसेनेच्या आशा बुचके यांचा १६ हजार ९२३ मतांनी पराभव केला. हा निकाल अनपेक्षित मानला जात असून तालुक्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा आहे.

वडगाव शेरीत सर्वाधिक चुरस

$
0
0
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरवात झाल्यापासून अंतिम निकाल घोषित होईपर्यंत नक्की विजयी कोण होणार, या बाबत सर्वांची उत्सुकता ताणली गेली होती.

मतदान यंत्रांची कार्यपद्धती पारदर्शी

$
0
0
सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतातील निवडणूक प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या मतदान यंत्रांच्या उपयुक्ततेमुळे रविवारी दक्षिण आशियाई देशांच्या प्रतिनिधींनाही अचंबित केले.

सर्वत्र भाजपच्या महाविजयाचा जल्लोष

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा शहरातून सुफडा साफ करून भाजपने शहरात सर्व मतदारसंघात वर्चस्व मिळवल्याने कार्यकर्त्यांनी दिवाळीपूर्वीच महाविजयाची दिवाळी साजरी केली. गुलालाची उधळण करून, बर्फी वाटून, फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

पुण्यातील भाजपसाठी दिवाळीपूर्वीच दिवाळी...

$
0
0
शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा विजय साकारला जाऊ लागल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी झाली आणि दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करण्यात आली. मात्र, रविवारच्या सुटीच्या दिवशी दिवसभर निवडणूक निकालांची मनसोक्त चर्चा केल्यानंतर सायंकाळनंतर पुणेकर पुन्हा खरेदीउत्सवात रमून गेले.

एक खासदार, ८ आमदार प्रश्न आता तरी सुटतील?

$
0
0
पुणे मेट्रो, रिंग रोड, सक्षम सार्वजनिक वाहतूक, पायाभूत प्रकल्प, किमान शहरी नागरी सुविधा, कचराकोंडीतून मुक्ती, जलशुद्धीकरण, पर्यावरण, युवा पिढीसाठी कौशल्य-रोजगारवाढीच्या संधी...

भाजपमध्ये रंगली मंत्रिपदाची चर्चा

$
0
0
तब्बल आठही, म्हणजे शंभर टक्के यशाचे दान भारतीय जनता पक्षाच्या पदरात घालणाऱ्या पुणे शहराला नव्या राज्य मंत्र‌िमंडळात महत्त्वाचे स्थान मिळेल, अशी चर्चा पक्षाच्या वर्तुळात सुरू झाली आहे.

अजितदादांचा बालेकिल्ला ढासळला

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकहाती सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या बालेकिल्ल्याला जबरदस्त धक्का बसला आहे. त्यामुळे भविष्यात शहराच्या राजकारणालाही वेगळे वळण मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस, NCPला पराभव जिव्हारी

$
0
0
शहरातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांना चांगलाच जिव्हारी लागला आहे. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, तर ‘राष्ट्रवादी’ने पराभवाचे आत्मपरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

३ माजी मंत्र्यांना घरचा रस्ता

$
0
0
मंत्री असो किंवा कोणीही असो, या वेळी भाजपलाच साथ देण्याचा निर्धार पुणेकरांनी केल्यामुळे तीन माजी मंत्र्यांना घरची वाट धरावी लागली. या तीनपैकी दोन माजी मंत्र्यांवर तर डिपॉझिट जप्त होण्याची नाचक्की पत्करावी लागली.

३३ हजार मतदारांनी वापरला ‘नोटा’

$
0
0
विधानसभा निवडणुकीदरम्यान आघाडी आणि युती तुटल्याने मतदारांना यंदा उमेदवारांचे एकापेक्षा अनेक पर्याय उपलब्ध होते. तरी देखील या पैकी ‘कोणताही उमेदवार आमच्या दृष्टीने पात्र’ नसल्याचा निष्कर्ष काढून पुणे जिल्ह्यातील तब्बल ३२ हजार ९५५ मतदारांनी ‘नन ऑफ द अबोव्ह’ (नोटा)चा अधिकार वापरला आहे.

दिग्गजांना दणका

$
0
0
राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या प्रतिष्ठितांच्या लढतीत विद्यमान आमदारांना जबर दणका बसला असून, माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांचा कुडाळमधून धक्कादायक पराभव झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रतिष्ठेची माहीमची जागा गमावली आहे.

पुणे तिथे काँग्रेस-राष्ट्रवादी ‘उणे’!

$
0
0
लोकसभा निवडणुकीत अनुभवलेली मोदीलाट, त्सुनामी ही संततधार बनून बरसल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची कशी ‘सफाई’ होते, याचा अनुभव पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आला.

पुणे शहरात भाजपच ‘अष्टपैलू’

$
0
0
पुणे शहरातील विधानसभेच्या आठही जागा जिंकून भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीतील कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. कोथरूड आणि हडपसरमध्ये शिवसेनेच्या आमदारांचा भाजपने पराभव केला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images