Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुणे तिथे काँग्रेस-राष्ट्रवादी ‘उणे’!

$
0
0
‘सबसे बडा खिलाडी’ बनून महापालिकेचा दशकभराहून अधिक काळ ताबा मिळविलेल्या सुरेश कलमाडी यांची काँग्रेस आणि ‘कारभारी’ होत अनभिषिक्त सत्ता गाजविलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोदी प्रणीत विकासाच्या राजकारणाने झटका दिला आहे.

पिंपरीत धनुष्यबाण चालला

$
0
0
अतिशय चढउतार आणि चुरशीच्या ठरलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबूकस्वार यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांचा दोन हजार ३३५ मतांनी पराभव करत शिवसेनेचा झेंडा फडकवला.

चिंचवडला एकतर्फी विजय

$
0
0
चिंचवड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी तब्बल ६० हजारांहून अधिक मतांनी विजय मिळविला. त्यांनी अखेरच्या क्षणी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय योग्य ठरविला.

भोसरीत ‘नारळ’ पावला

$
0
0
भोसरी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार महेश लांडगे यांनी १५ हजार ३१६ मतांनी विजय मिळविला. त्यांचे निवडणूक चिन्ह नारळ होते. शिवसेनेच्या सुलभा उबाळे दुसऱ्या क्रमांकावर, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विलास लांडे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

भोरमधून संग्राम थोपटेंना मतदारांचा कौल

$
0
0
भोर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे संग्राम थोपटे यांनी शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांचा १८,९९५ मतांनी पराभव करून जिल्ह्यातील पक्षाची अब्रू वाचवून आपला सत्तेचा गड कायम राखला आहे.

दादांच्या विजयातदेखील वादाचा तडका!

$
0
0
शहरात भाजपने जोरदार मुसंडी मारली असताना बारामतीमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८९,७९१ मतांनी भाजपचे बाळासाहेब गावडे यांच्यावर विजय मिळवला.

शिरूरमध्ये पुन्हा एकदा भाजपचे पाचर्णे

$
0
0
शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार अशोक पवार यांना भाजपचे उमेदवार बाबुराव पाचर्णे यांनी १० हजार ९४१ मतांनी धूळ चारली. गतनिवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा पाचर्णे यांनी पवार यांना पराभूत करून काढला आहे.

दिलीप वळसे-पाटील सहाव्यांदा विधानसभेत

$
0
0
विधानसभेचे सभापती व माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग सहाव्यांदा विजय मिळविण्याचा विक्रम केला आहे. शिवसेनेचे उमेदवार अरुण गिरे यांच्यावर वळसे-पाटील यांनी ५८ हजार १५४ मतांनी मात मिळविली.

दत्तात्रय भरणे ठरले ‘जायंट किलर’

$
0
0
गेली वीस वर्षे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे व कायम मंत्रिपदाच्या खुर्चीत विराजमान असलेल्या हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा धक्का देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे हे जायंट किलर ठरले आहेत.

हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा धक्का

$
0
0
राज्यात सलग वीस वर्षे मंत्रिपद भोगलेले काँग्रेसचे इंदापूर मतदारसंघातील उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी पाटील यांना १४ हजार १७३ मतांनी पराभूत केले.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड जिल्ह्यात ढासळला

$
0
0
एका मंत्र्यांसह चार विद्यमान आमदारांना पराभवाचा धक्का देत भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या जिल्ह्यातील बालेकिल्ल्याला खिंडार पाडले.

प्रलंबित प्रश्न सुटतील?

$
0
0
अनधिकृत बांधकामे, शास्ती कर, रेडझोन, साडेबारा टक्के परतावा जमीन, बफर झोन हे शहरातील प्रलंबित प्रश्न प्रचाराचे केंद्रबिंदू राहिले. ते सत्तेतील बदलातून सुटतील, असा कौल पिंपरी-चिंचवडकरांनी दिला आहे. त्यामुळे हे प्रश्न सुटण्याविषयी नवनिर्वाचित आमदारांकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य : शेडगे

$
0
0
‘जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. संपूर्ण राज्यात नरेंद्र मोदी आणि भाजपची लाट होती. या लाटेत मतदारांनी केवळ पक्ष पाहून मतदान केले. त्यामध्ये इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केलेले काम, पक्षाची भूमिका याकडेही दुर्लक्ष झाले.

सोशल मीडियावर धम्माल पोस्ट्स‍

$
0
0
‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’... ‘मोदी लाट आहेच की’... ‘मनसेचे केवळ इंजिन, डबा नाहीच; अरे कुठे नेऊन ठेवलंय मनसेला?’ इथपासून ‘डकवर्थ लुईस’ नियमानुसार रामदास आठवलेच नवे मुख्यमंत्री..., पंतप्रधानांच्या १०० सभा कमी पडल्या...

इंदिराजींनंतर मोदीही अपयशी!

$
0
0
मोरारजीभाई देसाई यांच्या जनता सरकारने भ्रमनिरास केला आणि नाराज जनतेने देशाची सत्ता पुन्हा इंदिरा गांधी यांच्या हातात दिली. आणीबाणी लादल्यामुळे जेवढ्या अपमानास्पद पद्धतीने त्यांना सत्ता सोडावी लागली, तेवढ्याच दिमाखदारपणे त्या पंतप्रधानपदावर विराजमान झाल्या.

विद्यमानांना दणका

$
0
0
राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या प्रतिष्ठितांच्या लढतीत विद्यमान आमदारांना जबर दणका बसला असून, माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांचा कुडाळमधून धक्कादायक पराभव झाला आहे.

भाऊबंदकीची बाजी

$
0
0
राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाऊबंदकी एकमेकांविरोधात उभी ठाकली होती. लक्षवेधी ठरलेल्या या नातेवाइकांच्या लढतीमध्ये बाजी कोण मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परळीतील भाऊ-बहिणीच्या लढतीत पंकजा मुंडे यांनी बाजी मारली आहे.

जिल्ह्यात दोनच ‘दुर्गा’

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या पुणे जिल्ह्यातील रिंगणात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन बहुजन पक्षासह अपक्ष विभागातून २१ महिला पुरुषांच्या बरोबरीने उतरल्या होत्या. यात पुणे शहरात भारतीय जनता पक्षाच्या माधुरी मिसाळ आणि मेधा कुलकर्णी या दोघींना मतदारांनी भरघोस मतांनी निवडून दिले.

मतमोजणीत तांत्रिक अडथळा

$
0
0
हडपसर मतदारसंघातील पहिल्या फेरीतील मतमोजणीची आकडेवारी कम्प्युटरमध्ये फीड केल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे मतमोजणीस थोडासा विलंब झाला. यामुळे उमेदवारांच्या प्रतिनिधींसह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संताप व्यक्त केला.

विद्यार्थी आघाडी ते थेट आमदारकीपर्यंत वाटचाल

$
0
0
महापालिकेच्या निवडणुकीचा कोणताही अनुभव नसताना पक्षाचे प्रोत्साहन आणि सोशल नेटवर्किंगच्या जोरावर जगदीश मुळीक हे वडगाव शेरी मतदार संघातून चुरशीच्या लढतीत विजेते ठरले. विद्यार्थी आघाडीचे काम करणारे ३३ वर्षांचे मुळीक यांच्या नावाचा आता लहान वयात आमदार झालेल्या तरुणांच्या यादीत समावेश झाला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images