Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अन्न भेसळ : ३ वर्षांची शिक्षा

$
0
0
अन्नपदार्थामध्ये भेसळ केल्याप्रकरणी कसबा पेठेतील दुकानदाराला दंडासह तीन वर्षांच्या कैदेची शिक्षा पालिका कोर्टाने सुनावली आहे.

रस्त्यावर फटाके उडवायचे नाहीत!

$
0
0
फटाके उडविण्यावर वाजविण्यावर हरित लवादाने निर्बंध आणल्यानंतर पुणेकरांनी फटाके कोणते, कुठे आणि कसे उडवायचे याची नियमावली आता पोलिसांनी प्रसिद्ध केली आहे.

सहकारी बँकांतही आता ‘जनधन’

$
0
0
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान जनधन योजनेत सहकारी बँकांचाही समावेश असावा, ही सहकारी बँकांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. विशिष्ट अटी पूर्ण करणाऱ्या सहकारी बँकांनाच आता या योजनेअंतर्गत खाती उघडता येतील, अशी अधिसूचना केंद्रीय अर्थ मंत्रालयाने नुकतीच काढली आहे.

मंगळयान करणार धूमकेतूचे निरीक्षण

$
0
0
मंगळाभोवती फिरणाऱ्या भारताच्या मंगळयानाला महिनाभराच्या आतच दुर्मिळ निरीक्षणाची मोठी संधी चालून आली आहे. येत्या रविवारी (१९ ऑक्टोबर) सायडिंग स्प्रिंग नावाचा धूमकेतू मंगळाच्या अगदी जवळून जाणार असून, त्याच्या छायाचित्रणासह अंतरंगाचा अभ्यास मंगळयान करणार आहे.

‘सार्क’ देशांचे प्रतिनिधी पुण्यात दाखल

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी ‘सार्क’ राष्ट्रांचे प्रतिनिधी शनिवारी पुण्यात दाखल झाले आहेत. मतदान आणि मतमोजणीसाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, मतदान केंद्रांची निवड, संवदेनशील मतदान केंद्रे, पोलिस बंदोबस्त आणि आदर्श आचारसंहिता याविषयी हे प्रतिनिधी माहिती जाणून घेणार आहेत.

आचारसंहिता भंगाच्या ३९ तक्रारी

$
0
0
गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत या विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली असून शहर व जिल्ह्यातील २१ मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या आतापर्यंत फक्त ३९ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

स्वबळाच्या लढाईत शहरावर वर्चस्व कोणाचे?

$
0
0
गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत शहरातील आमदारांमध्ये आघाडी आणि युतीचे आलटून-पालटून वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे, यंदा राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविली असल्याने सर्वांना सम-समान न्याय मिळणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मोदीलाट… की लोकल इफेक्ट?

$
0
0
एक्झिट पोलमध्ये निर्माण झालेली मोदी लाट प्रत्यक्ष मतदानात येणार, की स्थानिक राजकीय समीकरणांचा प्रभाव मतदारांवर पडणार, याचा फैसला आज (रविवारी) होणार आहे. प्रमुख पाचही पक्षांनी पुणे शहरात आपापल्या जागा वाढणार असल्याचे दावे केले आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रशासन सज्ज

$
0
0
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदार संघांतील तीन विद्यमान आमदारांबरोबर इतर सर्व उमेदवारांच्या भाग्याचा निकाल रविवारी (१९ ऑक्टोबर) लागणार आहे. बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलामध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

निवडणुकांचे निकाल बारापर्यंत हाती

$
0
0
शहर व ग्रामीण भागातील २१ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी आज रविवारी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे.

फसवणूक करून दागिन्यांची चोरी

$
0
0
दागिने चोरी होतात असे सांगून एका ज्येष्ठ महिलेला तिच्याकडील दागिने पिशवीत काढून ठेवायला सांगून फसवणूक करून ४० हजार रुपयांचे दागिने एका महिलेले चोरून नेले. धनकवडी बसस्टॉपजवळ शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला.

माहिती अधिकारात व्यक्तिगत माहिती नाही

$
0
0
माहिती अधिकार कायद्यान्वये व्यापक जनहिताशी संबंधित नसलेली वैयक्तिक स्वरूपाची माहिती पुरविण्याबाबत सरकारने नव्या परिपत्रकानुसार बंधने घातली आहेत.

ऑनलाइन खरेदी पालिकेच्या रडारवर

$
0
0
ऑनलाइन खरेदीचा ट्रेंड सध्या जोरात असून, ग्राहकांना घरपोच सेवा देणाऱ्या नव्वदहून अधिक कंपन्यांनी पालिकेचा स्थानिक संस्था कर (एलबीटी) मात्र चुकविला आहे. त्यातील, बऱ्याच कंपन्यांना पालिकेने नोटीस बजावली असून, त्यांच्यावर होणाऱ्या दंडात्मक स्वरूपाच्या कारवाईतून पालिकेच्या महसुलात भर पडणार आहे.

PMP कर्मचाऱ्यांना ८ हजारांचा बोनस

$
0
0
निवडणुकीच्या धामधुमीत पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचे रखडलेले सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले असून, सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी आठ हजार रुपयांचा लाभ मिळू शकणार आहे.

जिल्ह्यात ‘NCP’ला दणका?

$
0
0
निवडणूक निकालांबाबत वर्तविण्यात येत असलेल्या भाकितांमुळे जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांत काय होणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. हे अंदाज पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील वर्चस्वाला दणका बसण्याची चिन्हे आहेत.

‘बाबरी’हक्क मुस्लिमांनी सोडावा

$
0
0
समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मुस्लिम समाजाने त्यागाच्या भावनेतून वादग्रस्त बाबरी मशिदीवरचा हक्क सोडावा. त्याला इतर समाजातील घटकांनी सकारात्मक प्रतिसाद देत, देशातील एकाही मशिदीला हात लावला जाणार नाही, याची ग्वाही द्यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेऊन मांडणार आहे, अशी माहिती मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सय्यदभाई यांनी शनिवारी दिली.

डेंगी विषाणूंमध्ये होतोय बदल?

$
0
0
शहरातील बहुतांश हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या डेंगीच्या पेशंटची संख्या वाढत असली तरी प्रत्यक्षात त्यांना डेंगीची लागण झाली नसल्याचे वैद्यकीय चाचणीनंतर स्पष्ट होत आहे.

फटाक्यांवर पूर्ण बंदी आणा

$
0
0
फटाके वाजविणे ही विदेशी प्रथा असून त्याला हिंदू धर्मात कुठलाही शास्त्राचा वा धर्माचा नाही, तसेच फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी आणि वायू प्रदूषण होते. त्यामुळे शासनाने फटाक्यांवर पूर्णपणे बंदी आणावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

दर्शिलेेंची गोळ्या झाडून हत्या

$
0
0
मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी शिवसेनेचे पुनावळे-ताथवडे विभागप्रमुख राजू दर्शिले यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. दर्शिले यांच्या पुनावळे येथील कार्यालयातच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

इंदापुरात भरणे 'जायंट किलर'

$
0
0
गेली वीस वर्षे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे व कायम मंत्रिपदाच्या खुर्चीत विराजमान असलेल्या हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा धक्का देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे हे जायंट किलर ठरले आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images