Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

…आता प्रत्येकाला डिजिटल लॉकर

$
0
0
कल्पना करा, तुम्हाला एखाद्या योजनेसाठी डॉक्युमेंट्स सादर करायची आहेत. योजनेसाठी संबंधित कार्यालयात गेलात, की तुम्हाला तुमचा आधार क्रमांक विचारला जाईल. आधार क्रमांकालाच जोडलेल्या मोबाइल क्रमांक आणि बँक अकाउंट क्रमांकाच्या आधारे ‘ते तुम्हीच ना,’ याची खात्री केली जाईल.

वेबपोर्टलद्वारे खुलणार वेददालन

$
0
0
भारतातील समृद्ध वेद परंपरेचे दालन आता वेबपोर्टलच्या माध्यमातून जगापुढे येणार आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे चारही वेदांचे वेबपोर्टल तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

डेंगीची माहिती दडवल्यास हॉस्पिटलवर कारवाई

$
0
0
डेंगीच्या पेशंटची माहिती दडविणाऱ्या शहरातील खासगी हॉस्पिटलवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. डेंगीच्या पेशंटची माहिती कळविण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या खासगी हॉस्पिटलवर धाडी टाकून कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरुवारी प्रशासनाला दिले.

निवडणुकांनंतरही ‘व्होटबँक’… गायब!

$
0
0
‘स्वबळा’ची ताकद अजमविणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुण्यासारखे महानगर होऊ पाहणाऱ्या शहरात स्वतःची ‘व्होटबँक’ निर्माण करण्यात अपयश आले आहे. परिणामी, एखादा अपवाद वगळता काँग्रेसच्या नकारात्मक व्होटिंगवरच राष्ट्रवादीचे भवितव्य अवलंबून आही.

स्वबळाचा विस्तारवाद भाजपच्या पथ्यावर...?

$
0
0
पाया विस्तारत असलेल्या मोक्याच्या टप्प्यावर शिवसेनेशी असलेली युती तोडण्याचा निर्णय पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात भाजपच्या पथ्यावर पडेल, असे चित्र आहे. शहरातील जागांमध्ये भर पडण्याची शक्यता आणि ग्रामीण भागात आयात उमेदवारांच्या आधारे पाय पसरण्याची संधी यंदा भाजपने साधली.

नाटकांना सरकारने सोडले वाऱ्यावर

$
0
0
‘आपल्याकडे नाटकाला मोठा इतिहास आणि सशक्त परंपरा आहे. मात्र, नाटक आजही केवळ स्वतःच्या जिवावर जगत आहे. शासनाकडून या कलेला कोणतेही आर्थिक पाठबळ मिळत नाही. सध्याच्या व्यवस्थेकडून फक्त लोकप्रिय ‘इव्हेंट्स’नाच अर्थपुरवठा होतो,’ अशी खंत ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी व्यक्त केली.

काँग्रेसजनांच्या ‘बाबां’कडे तक्रारी

$
0
0
निवडणुकीत पक्षाचे वरिष्ठ नेते पुण्यात आले नाहीत..., प्रदेश पदाधिकारी सहभागी झाले नाहीत... तसेच पक्षाच्या जाहीरनाम्याची प्रतही पुण्यात पोहोचली नाही..., अशा स्वरूपाच्या तक्रारी पुण्यातील उमेदवारांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे गुरूवारी केल्या. तेव्हा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षसंघटनेत लक्ष घालू, असे आश्वासन चव्हाण यांनी दिल्याचे समजते.

मनसेची… मिसप्रिंट!

$
0
0
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदाच्या निवडणुकीतही पुन्हा केवळ राजसाहेबांच्या करिष्म्यावरच अवलंबून राहिली. ऐनवेळी महाराष्ट्राची ब्लू प्रिंट पक्षाच्या मदतीला धावून आली खरी, परंतु, त्याचे ‘मार्केटिंग’ पक्षाला जमू शकले नाही.

भाजप-आरपीआय ‘मैत्री’त ठिणगी

$
0
0
ऐन निवडणुकीच्या तोंडावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आरपीआय) भाजपशी केलेली मैत्री ही शिवसेनेत कळ लावणारी आणि भाजपला बळ देणारी ठरेल, असा अनेकांचा होरा होता. मात्र, पुण्यात तसे काहीही झाले नाही.

प्रचारात भिस्त उमेदवारांवरच

$
0
0
राष्ट्रीय-राज्यस्तरावरील नेत्यांची प्रचारात अनुपस्थिती, समन्वयाचा अभाव, ऐनवेळी तुटलेली आघाडी आणि अँटी इन्कम्बन्सी अशा विविध आव्हानांना शहरातील काँग्रेसच्या उमेदवारांना तोंड द्यावे लागले. मात्र, अनुभवी-तगडे उमेदवार आणि वैयक्तिक यंत्रणेच्या बळावर या उमेदवारांनी निवडणुकीत कसोशीने मोठा पल्ला गाठला.

विजयी मिरवणुकीसाठी बंदी

$
0
0
मतमोजणीच्या दिवशी विजयी मिरवणुका काढण्यास उमेदवारांना बंदी घालण्यात आली आहे. मिरवणुकांमुळे तणावाचे वातावरण निर्माण होवू शकत असल्याने बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी त्यासाठी शहरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.

रात्री १० ते सकाळी ६ फटाकेबंदी

$
0
0
गणेशोत्सव, दहीहंडी, नागपंचमी, बैलगाडा शर्यती यांच्या पाठोपाठ कोर्टाने आता दिवाळीचा अविभाज्य भाग असलेल्या फटाक्यांवरदेखील बंधने घातली आहेत. ध्वनी आणि वायूचे प्रदूषण घातक ठरत असल्याचे निरीक्षण नोंदवून, पुण्यातील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने फटाके उडवण्याबाबत कठोर आदेश बजावला आहे.

मरगळलेल्या वाघाची डरकाळी!

$
0
0
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेली मराठी अस्मितेची साद आणि मित्रपक्षाने दिलेला दगा यामुळे गद्दारांना धडा शिकविण्यासाठी शिवसैनिक जोमाने कामाला लागल्याचे चि‌त्र या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाले.

विहिरीत उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या

$
0
0
पुण्यात एका विहिरीमध्ये प्रेमी युगुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. कृषी महाविद्यालयाच्या आवारात ही घटना घडली असून दोघेही कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दिवाळी फराळांची विमानवारी जोरात

$
0
0
दिवाळीत सहकुटूंब, आप्तेष्ट, मित्रपरिवारासह फराळाचा आस्वाद घेण्याचा आनंद निराळाच असतो. दिवाळीच्या निमित्ताने आपल्या कुटुंबीयांचे स्नेहसंमेलन होते. दिवाळी साजरी केल्याच्या आठवणी कायम मनात रुंजी घालत राहतात.

फटाक्यांची उलाढाल वाढली

$
0
0
आकाशात उंच जाऊन फटाक्यातून चांदण्या बाहेर येणे... नयनरम्य रोषणाई असलेले... कमी धूर आणि कमी आवाज होणारे फॅन्सी फटाके बाजारपेठेत दाखल झाले आहेत.

नागपूर, बेंगळुरूसाठीही आता ‘शिवनेरी’

$
0
0
ऐन दिवाळीच्या तोंडावर खासगी ट्रॅव्हल्सनी तिकिटांचे दर वाढवल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीच्या पुणे विभागातर्फे नागपूर आणि बेंगळुरू मार्गावर व्होल्वो सेवा सुरू करण्यात आली आहे. १९ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी या बस सोडण्यात येणार असून, प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास त्या कायम करण्यात येणार आहेत.

पुण्यात बरसला परतीचा पाऊस

$
0
0
नैर्ऋत्य मोसमी पावसाने यंदाच्या हंगामातील परतीचा प्रवास आरंभला आहे. बिहार, मध्य प्रदेशसह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातून मान्सून माघारी गेला असल्याचे पुणे वेधशाळेने शुक्रवारी जाहीर केले. दरम्यान, पुण्याच्या विविध भागात शुक्रवारी दुपारी झालेला पाऊस हा मान्सूनच्याच परतीचा भाग होता.

बचतगटांची दिवाळी ५० लाखांची

$
0
0
दिवाळीचा आनंद फराळाच्या पदार्थांशिवाय पूर्ण होत नाही. मात्र, अनेक नोकरदार महिलांना वेळेअभावी घरी फराळ तयार करणे शक्य होत नाही. बाजारपेठेत रेडीमेड फराळाचे पदार्थ मिळत असले, तरीही घरगुती चवीमुळे बचतगटांकडून फराळ करून घेण्यास सध्या चांगलीच मागणी वाढते आहे.

सोलापुरात पासपोर्ट केंद्र

$
0
0
परदेशगमनाच्या वाढत्या संधींमुळे पुण्याबरोबरच विभागातील पासपोर्टविषयक अर्जांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यातील पासपोर्ट सेवा केंद्रावर ताण वाढत आहे. हा ताण हलका करण्यासाठी लवकरच सोलापूरमध्ये नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images