Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गैरप्रकारांची चौकशी पुन्हा सुरू होणार

$
0
0
राज्याचे निलंबित पणन संचालक सुभाष माने यांचे निलंबन रद्द झाल्यामुळे शहर, जिल्हा आणि राज्याच्या अन्य भागांमध्ये रखडलेल्या काही गैरप्रकारांच्या चौकशांचे सत्र पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पणन विभाग आणि बाजार समित्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

कोथरूडमध्ये राष्ट्रवादीच्या तिघांना पैसे वाटताना अटक

$
0
0
कोथरूड येथील साईनाथ वसाहत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिघा कार्यकर्त्यांना पैसे वाटप करत असताना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३१ हजार १०० रुपये जप्त करण्यात आले.

पंचरंगी लढतींमुळे मतदारांचीही कसोटी!

$
0
0
युती-आघाडीच्या ‘महाघटस्फोटा’नंतर होणाऱ्या पंचरंगी निवडणुकीत आज राजकारण्यांच्या स्वबळाची कसोटी पाहिली जाणार आहे. मात्र, त्याचबरोबर पक्ष-उमेदवार आणी जातीपातीसारखे स्थानिक संदर्भांचा ताळमेळ जुळवताना मतदारांचीदेखील ‘परीक्षा’ पाहिली जाणार आहे.

…आणि गायकवाड मळ्यात ते विमान कोसळले!

$
0
0
लोहगाव विमानतळावर नेहमीप्रमाणे सुखोई या लढाऊ विमानातून सराव सुरू होता. सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच काही तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने विमान हेलकावे खाऊ लागले.

पुण्यातील दुसरा; तर देशातील पाचवा अपघात

$
0
0
भारतीय हवाई दलाचा कणा मानल्या जाणाऱ्या ‘सुखोई’ विमानाच्या अपघाताची मालिका सुरूच राहिली आहे. मंगळवारी केसनंदजवळ सुखोईला झालेला अपघात हा पुण्यातील दुसरा; तर एकूण पाचवा अपघात होता.

‘काका, तुम्ही मतदान केलंय का?’

$
0
0
विद्यार्थ्यांकडून निवडणुकपूर्व काळात आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांना परीक्षांच्या वातावरणामुळे खीळ बसली असली, तरी शिवाजीनगरमधील मॉडर्न कॉलेजच्या राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी मात्र त्याही परिस्थितीत निवडणुकीविषयीची जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्याचा निश्चय केला आहे.

पोलिस दल सतर्क

$
0
0
शहरातील १०७ संवेदनशील मतदान केंद्रावर निमलष्करी दलांचे जवान तैनात... जलत प्रतिसादासाठी सुमारे ५०० वाहनांचा ताफा... प्रत्येक पोलिस अधिकाऱ्याकडे पिस्तुल, पुरेसा काडतुसांचा साठा... पोलिस कर्मचाऱ्याकडे लाठी-काठी, शिल्ड, हेल्मेट आणि बंदुकीसुद्धा.... सर्व वायरलेस सेटच्या फ्रिक्वेसींसुद्धा मतदानासाठी मॅच करण्यात आल्या आहेत.

मतदानासाठी प्रशासन सज्ज

$
0
0
पुणे शहर व ग्रामीण भागातील २१ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी आज, बुधवारी मतदान होत असून प्रचाराची शर्थ केल्यानंतर ३०८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आता मतदान यंत्रात बंद होणार आहे. या निवडणुकीसाठी ६९ लाख २७ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

विविध ठिकाणी उद्या पाणी बंद

$
0
0
पद्मावती आणि इंदिरानगर या भागांचा वीजपुरवठा गुरुवारी (१६ ऑक्टोबर) देखभाल-दुरूस्तीच्या कामांसाठी बंद राहणार असल्याने पद्मावती, बिबवेवाडी, कोंढवा, कात्रज, धनकवडी या परिसराचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे.

मतदान करणा-यांसाठी विविध ऑफर्स

$
0
0
नागरिकांनी अधिकाधिक संख्येने मतदानाला यावे, यासाठी सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करीत असताना संस्था-संघटनांसह दुकानदार-व्यावसायिकांनीदेखील त्यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेलादेखील ‘ऑफर्स’चा धडाका लावला आहे.

‘सुखोई’चा पुन्हा अपघात

$
0
0
हवाई दलाच्या विमानांच्या अपघाताची मालिका सुरूच असून, मंगळवारी सुखोई एमकेआय ३० हे लढाऊ विमान पुण्यातील केसनंदजवळ कोलवडी गावात कोसळले. दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटच्या साह्याने उडी मारल्याने ते सुखरूप बचावले असून, विमान मोकळ्या जागी कोसळल्याने जीवित आणि वित्तहानी टळली.

पुण्यात ‘टक्का’ वाढला; ६२.५ टक्के मतदानाची नोंद

$
0
0
विधानसभेच्या पंचरंगी निवडणुकीसाठी पुणे शहर व जिल्ह्यात बुधवारी ६२.५ टक्के मतदान झाले. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कडक ऊन, दूरवरची मतदानकेंद्रे अशा समस्यांवर मात करीत नागरिकांनी भरघोस मतदान केले.

परदेशात उपक्रम नेण्यापूर्वी परवानगी घ्या

$
0
0
देशातील कोणत्याही विद्यापीठाने किंवा विद्यापीठांशी संलग्न कॉलेजांनी त्यांचा परदेशातील कोणताही उपक्रम संबंधित देशातील भारतीय दूतावास किंवा उच्चायुक्तालयाला अंधारात ठेवून राबवू नये, अशी स्पष्ट सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) केली आहे.

ब्रिटिशांचे रिव्हर्स मायग्रेशन

$
0
0
येत्या काळात पुण्यातील शिक्षण संस्थांत ब्रिटिश विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली दिसली, तर आश्चर्य वाटून घेऊ नका! ‘यूके’तील विद्यार्थ्यांना भारतात शिकण्यासाठी खुद्द ‘यूके’चे सरकार प्रयत्न करीत असून, त्यात पुण्यालाही महत्त्वाचे स्थान मिळणार आहे.

स्वस्तात लाडू, चिवडा विक्री उद्यापासून

$
0
0
सामान्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी गेल्या २६ वर्षापासून सुरू असलेल्या दि पूना मर्चंट्स चेंबरच्या स्वस्त दरातील लाडू चिवडा विक्रीच्या उपक्रमाला शुक्रवारपासून (दि. १७ ऑक्टोबर) प्रारंभ होणार आहे. लाडू आणि चिवडा प्रत्येकी ८५ रुपये किलो दराने उपलब्ध होणार आहे.

‘एलईडी’का जमाना है भाई....

$
0
0
दीपोत्सवात घर दिव्यांनी उजळून टाकण्यासाठी वैविध्यपूर्ण आणि आकर्षक इलेक्ट्रिक तोरणांनी बाजारपेठ लखलखत आहे. ‘एलईडी’ दिव्यांच्या तोरणांचा बाजारपेठेत बोलबाला असून, वीजेचा कमी वापर आणि कमी किंमतीत ही तोरणे मिळत असल्याने ग्राहकांचाही याच तोरणांच्या खरेदीकडे ओढा आहे.

पणत्याही झाल्या ‘ट्रेंडी’

$
0
0
लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून टाकणाऱ्या दिव्यांच्या असंख्य प्रकारांनी पुण्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. ग्राहकांच्या पसंतीस उतरण्यासाठी पारंपरिक दिव्यांबरोबरच आधुनिक ‘एथनिक टच’ दिलेल्या शेकडो प्रकारच्या पणत्या आणि दिवे बाजारपेठेत दाखल झाले आहेत.

शतायुषी आजींनाही मतदानाची प्रेरणा

$
0
0
अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीला जाऊनही आपले नवरात्रीचे कडक उपवास कायम ठेवणाऱ्या नरेंद्र मोदींमुळे कोथरूडच्या शतायुषी आजींना मतदानाची प्रेरणा मिळाली. सध्या स्वप्नशिल्प सोसायटीत राहणाऱ्या आनंदीबाई माधवराव कुलकर्णी या १०० वर्षांच्या आजींनी व्हीलचेअरवर येत कोथरूडच्या मोरे विद्यालयात मतदान केले.

हॅट्स ऑफ… ज्येष्ठांनी दाखवली जिद्द

$
0
0
लोकसभेच्या निवडणुकीला नवमतदारांनी करिष्मा दाखवला होता. त्यांच्या सेल्फीचा बोलबाला होता. आता विधानसभेलाही नेक्स्ट जनरेशन मोठ्या संख्येने मतदानासाठी आली. पण, लोकसभेसारखा माहोल नव्हता.

मिसाळ, छाजेड, जगताप एकाच वेळी केंद्रावर

$
0
0
मुकुंदनगर, बिबवेवाडी परिसरातील मतदान केंद्रांत सकाळी साडेसहालाच मतदारांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. आंबेडकरनगर येथे पैसे वाटप होत असल्याच्या आरोप-प्रत्यारोपांनी पोलिसांची धावपळ उडाली, तर पर्वतीतील झोपडपट्ट्यांमध्ये गैरप्रकार सुरू असल्याचे सांगणारे फोन पोलिस नियंत्रण कक्षात खणखणत होते.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images