Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शांतता... सारे काही आलबेल

0
0
सकाळच्या पहिल्या दोन तासांतील थंड सुरवातीनंतर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढत गेली, ती दुपारी अडीच वाजेपर्यंत तशीच होती. वृद्धांची लक्षणीय उपस्थिती, मशिनमध्ये कोणताही बिघाड नाही आणि शांततामय वातावरण, अशी परिस्थिती या मतदारसंघात पाहायला मिळाली.

बहुतांश केंद्रे मोकळीच

0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असतानाच कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या परिसरारात मात्र बुधवारी सकाळी खूपच तोकडा प्रतिसाद अनुभवायला मिळाला.

तरुणाई ‘इनअॅक्टिव्ह’

0
0
काही भागांत मतदानासाठी गर्दी, तर काही ठिकाणी अनुत्साह..., बहुतेक भागांत ज्येष्ठांची संख्या अधिक; तर सोशल मीडियावर लाइक्स अन् कमेंट्स करणारी तरुणाई मतदानापासून ‘इनअॅक्टिव्ह’ अन् अधिकाधिक मतदान करून घेण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमधील उत्सुकता, अशा वातावरणात कसबा विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सुमारे ३१.२५ टक्के मतदान झाले.

सकाळी शांतता; सायंकाळी रांगा

0
0
लोकसभा निवडणुकीत मतदारांमध्ये असलेला उत्साह विधानसभेच्या निवडणुकीत मात्र कमी झाल्याचे चित्र शिवाजीनगर मतदारसंघात पहायला मिळाले. सकाळी नऊ वाजेपर्यंत या मतदारसंघात अवघे सहा ते सात टक्के मतदान झाले होते.

कोथरूडमध्ये ‘संततधार’

0
0
लोकसभा निवडणुकांच्या वेळी दिसलेला उत्साह कमी जाणवत असला तरी कोथरूड भागात बुधवारी संथगतीने मतदान सुरु होते. मतदार यादीतून नाव वगळल्याच्या तक्रारीही फारशा पाहण्यास मिळाल्या नाहीत.

नव्या मतदारांचा उत्साह मोठा

0
0
निवडणुकीच्या रिंगणातील पाच तगडे उमेदवार, त्यांनी मतदारांना केलेले आवाहन, मतदानाबद्दलची वाढलेली जागृती आणि नव्या मतदारांचा उत्साह यामुळे खडकवासला मतदारसंघात सकाळपासून मतदानासाठी मोठा प्रतिसाद मिळत होता. दुपारी एक वाजेपर्यंत जवळपास ३२ टक्के मतदान झाले.

केंद्रांवर रांगा नाहीत; पण गर्दी कायम

0
0
लोकसभा निवडणुकीसारखा फारसा उत्साह जाणवला नसला, तरी हडपसर विधानसभा मतदारसंघातील सर्वच मतदान केंद्रांवर फारशा रांगा दिसल्या नाहीत. पण मतदारांची ये-जा सुरुच होती.

मतदान जागृती करणारे गेले कोठे?

0
0
एकीकडे मतदान केंद्रांवर मतदारांचा थोडा निरुत्साह जाणवत असताना मतदान जागृती करणारे स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्तेही यंदा गायब झाले होते. काही अपवाद वगळता मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठीचे प्रयत्न अभावानेच दिसले.

झुंबड नाही; पण ओघ कायम

0
0
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेसाठी मतदानकेंद्रांवर सकाळपासून झुंबड उडाली नसली, तरी मतदारांचा ‘फ्लो’ कायम राहिला असल्याने ‘टक्का’ वाढण्यास मदत झाली.

पोलिस आयुक्तांनीही केले मतदान

0
0
पोलिस आयुक्त सतीश माथूर यांनी बुधवारी सकाळी कॅम्प परिसरातील बिश्यप्स्​ शाळेत मतदान केले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत माथूर यांचे नाव मतदार यादीत न आल्याने त्यांनी आयोगाकडे तक्रार केली होती.

अंधदिनीच अंधांच्या हक्काची पायमल्ली

0
0
अंधांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ‘ब्रेल’ लिपीतून मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी त्या सुविधेपासून एका अंध जोडप्याला वंचित राहण्याचा प्रकार उघडकीस आला.

पहिल्यासारखेच कमळ की ‘इंजिना’ने साधली वेळ?

0
0
इंजिन पळालं... मोदी लाटेने कमळ जोरात... घड्याळाचे काटे फिरतायेत... बाण घुसला... हात साथ देतोय... अशा चर्चा खडकवासला मतदारसंघातील वेगवेगळ्या ‘पॉकेट’मध्ये झडत होत्या.

जाती, नात्यागोत्यांमध्ये निकाल जाणार गोत्यात

0
0
तुटलेली युती-आघाडी, इतर पक्षांपेक्षा पक्षीय बलाबल अधिक असूनही जातीसह नात्यागोत्यांमुळे झालेल्या मतविभागणीच्या समीकरणावरच या रंगलेल्या निवडणुकीचा अंतिम निकाल अवलंबून आहे.

वडगाव शेरी, खराडीच ठरणार निर्णायक

0
0
धानोरी, टिंगरेनगर आणि विश्रांतवाडी येथे झालेल्या मतदानाच्या तुलनेत वडगाव शेरी, खराडी व चंदननगर येथील मतदानच अंतिम निकालात निर्णायक ठरणार आहे. तेथील मतांच्या राजकारणात वर्चस्व राखणारा उमेदवार बाजी मारेल, अशी परिस्थिती आहे.

प्रस्थापितविरोधी लाट, मतदारदेखील दूरच!

0
0
पंचरंगी लढत होऊनही पुणे कँटोन्मेन्ट विधानसभा मतदारसंघात निरुत्साही वातावरणात ४२.५९ टक्के, म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील नीचांकी मतदान झाले. मतदानाचा टक्का घसरल्याने या मतदारसंघात लाटेवर स्वार होत कोणता बदल होणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

भरघोस मतदानावर पंचरंगी दावे-प्रतिदावे

0
0
शह-काटशहाचे राजकारण... मोदी लाट.... पारंपरिक मतदार... झोपडपट्ट्यांतील मतदान... व्यापारी वर्गाचा वरचष्मा... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्राबल्य... फुटलेली युती आणि आघाडी... आणि गेल्या काही वर्षांतील मतदानाचा मोडलेला विक्रम.

धनुष्यबाणाचा वेध मोदीलाटेत चुकणार?

0
0
गेली २५ वर्षे शिवसेनेच्या भगव्याला साथ देणाऱ्या कोथरूड मतदारसंघात यंदा प्रथमच भगवा विरूद्ध भगवा असे चित्र निर्माण झाले असून सर्व स्तरांमधून मोठ्या प्रमाणावर झालेल्या मतदानामुळे शिवसेनेला भाजपने शह दिल्याचे चित्र दिसते आहे.

टक्का वाढला, धाकधूक वाढली

0
0
विधानसभेच्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा वाढलेला टक्का नक्की काय सांगतो, याचे राजकीय वर्तुळातून निरनिराळे अर्थ लावण्यात येत आहेत. हे वाढलेले मतदान ही प्रस्थापितविरोधी लाट असल्याचा दावा विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे, तर पंचरंगी लढती आणि वाढलेल्या उमेदवार संख्येमुळे मतदानाचा टक्का वाढल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे.

काँग्रेस अंतर्गत विरोध राष्ट्रवादीच्या पथ्यावर?

0
0
शिवसेना, भाजपची युती तुटल्याने झालेली मतांची विभागणी, काँग्रेसच्या विद्यमान आमदारांबाबत त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली नाराजी आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला काँग्रेसकडून मिळालेली रसद यावरच शिवाजीनगरवर कोणाचे वर्चस्व राहणार, याचा निर्णय होणार आहे.

बाल्लेकिल्ल्यातील लढत खिच के ताणली जाणार

0
0
सगळे स्वतंत्र अन् पडद्याआड सर्वांचे शह-काटशहाचे राजकारण..., पक्षाच्या पारंपरिक मतदानावर भिस्त अन् विरोधकांच्या मतांचे विभाजन... आणि ‘अँटी-इन्कम्बन्सी’मुळे वाढलेला मतदानाचा टक्का, अशा वेगवेगळ्या पारड्यांवर ‘वजन’ झुकविणारेच कसब्याचे कारभारी होणार असल्याचे बुधवारच्या मतदानानंतर स्पष्ट होते आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images