Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कांदा, मटार महाग; गाजर स्वस्त

$
0
0
राज्यातील विविध भागातून कांद्यासह मटारची होणारी आवक घटल्याने त्याच्या दरात दहा किलोमागे दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली. तर अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत.

बासमती तांदळाची भाववाढ नाही!

$
0
0
देशभरात भाताच्या उशिरा झालेल्या कमी पेरण्या, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन घटले असले, तरी बासमती तांदळाच्या दरात मात्र यंदा वाढ अपेक्षित नाही. उलटपक्षी, किलोमागे दर २० रुपयांनी घटणार आहेत.

२६ लाख मतदार स्लिपविना

$
0
0
विधानसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले असतानाच अद्याप २६ लाख ५० हजार व्होटर स्लिपचे वाटप होऊ शकलेले नाही. विशेषतः शहरी भागांत व्होटर स्लिप वाटण्यात अडचणी येत असून, आता मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान बूथवर व्होटर स्लिप देण्यात येणार आहेत.

जाहिरातींचा पैसा आणला कोठून?

$
0
0
‘करोडो रुपये खर्च करून जाहिरातींचा सातत्याने मारा करण्यात येत आहे. टीव्हीवर दाखविल्या जाणाऱ्या जाहिरातींसाठी भाजपला पैसा आला कोठून,’ असा थेट सवाल राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विचारला आहे.

विधानसभेनंतर मेट्रोला मान्यता

$
0
0
विधानसभेच्या निवडणुकीनंतर पुणे मेट्रो प्रकल्पास मान्यता देण्याचे जाहीर आश्वासन केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी रविवारी दिले असून, त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. नायडूंच्या आश्वासनामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची चर्चा आहे.

दिवसा तडाखा; रात्री थंडीचा कडाका

$
0
0
दिवसा ऑक्टोबर हीटमुळे अंगाची लाही लाही होत असताना रात्री थंडीचा कडाका वाढल्याने हुडहुडी भरू लागली आहे. पुण्यात पारा १७.४ अंशांपर्यंत उतरला आहे. तर राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद अहमदनगर येथे (१५.८ अंश सेल्सियस) झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

पणन संचालक मानेंचे निलंबन अखेर रद्द

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसह अनेक बड्या धेंडांवरील कारवाईमुळे निलंबित करण्यात आलेले राज्याचे पणन संचालक सुभाष माने यांचे निलंबन रद्द करण्याचा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) सोमवारी दिला.

बँक महासंघाचा संपाचा इशारा

$
0
0
बँकेतील अधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ आता अखिल भारतीय बँक अधिकारी महासंघातर्फे कृती कार्यक्रम आखण्यात आला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपाचा इशारा देण्यात आला आहे.

लेखी परिक्षेमध्ये किमान वीस टक्के गुण आवश्यकच

$
0
0
दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात लेखी परीक्षेत किमान २० टक्के गुण मिळविणे विद्यार्थ्यांसाठी सक्तीचे करण्यात येणार आहे.

१२ वीच्या अर्जांसाठी आठवड्याची मुदतवाढ

$
0
0
ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच आलेल्या लागोपाठच्या सुट्ट्या आणि त्यानंतर बोर्डाची वेबसाइट हँग होण्याच्या प्रकारांमुळे बारावीचे ऑनलाइन परीक्षा फॉर्म भरण्यात अनेक अडचणी येत असल्याची तक्रार शहरातील ज्युनियर कॉलेजांमधून करण्यात येत आहे.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू

$
0
0
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत डॉक्टरांवर कारवाई होईपर्यंत त्याच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला; तसेच वायसीएम रुग्णालयासमोर ठिय्या मांडला. सोमवारी (ता. १३) सकाळी साडेदहाच्या दरम्यान ही घटना घडली.

अवैध दारू धंद्यांवर ४ ठिकाणी छापा

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने पिंपरी, एमआयडीसी, भोसरी व सांगवी येथील अवैध दारू धंद्यांवर छापा टाकून तेथून हजारो रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे.

दगडफेक करणाऱ्या ९ जणांवर गुन्हा

$
0
0
शिवीगाळ केल्याची तक्रार देऊ नये, म्हणून पोलिस चौकीवर दगडफेक करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यातील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. नवी सांगवी पोलिस चौकीसमोर रविवारी दुपारी हा प्रकार घडला.

उमेदवारांचा आता ऑफलाइन प्रचार...

$
0
0
सर्वच प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे गेले पंधरा दिवस प्रचाराचे वादळ उठले होते. हे वादळ आणि प्रचाराची रणधुमाळी अखेर सोमवारी संध्याकाळी पाच वाजता संपली. उमेदवारांना आता थेट प्रचार करता येणार नसल्याने अनेकांचा ऑफलाइन (पडद्यामागून) प्रचार सुरू झाला आहे.

पदयात्रा, रॅलीने प्रचाराची सांगता

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सोमवारी संध्याकाळी झाली. मात्र, प्रचाराची सांगता करताना विविध राजकीय पक्षांनी काढलेल्या दुचाकी रॅलीने शहरातील वाहतूक वेठीस धरल्याचे चित्र पहावयास मिळाले.

पिंपरीत १२ लाख मतदार

$
0
0
पिंपरी-चिंचवडमधील तिन्ही विधानसभा मतदारसंघांत सुमारे १२ लाख २९ हजार मतदारसंख्या असून, मावळमध्ये दोन लाख ९२ हजार मतदार आहेत. त्यांच्यासाठी शहरात एक हजार २६० आणि मावळमध्ये ३४० मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे.

खाद्यपदार्थ तपासणीची ‘FDA’ची मोहीम

$
0
0
ऐन सणासुदीत भेसळमुक्त फराळाचे खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांकडे तेल, तूप, मैदा, रवा, आटा या वस्तूंची तपासणी करण्याची मोहीम अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अन्न विभागाने सुरू केली आहे.

भाषिक जाणिवांची उंची कायद्याने नाही

$
0
0
‘संपूर्ण समाजाच्या जाणिवा भाषेतून उंचावतात. संसदेमध्ये विधेयक संमत करून नाही,’ असा टोला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी सोमवारी लगावला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला आहे.

MCA (कॉमर्स)च्या बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत संभ्रम

$
0
0
विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरून झाल्यानंतरच्या टप्प्यावर बदललेल्या अभ्यासक्रमामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे एमसीए (कॉमर्स) चे विद्यार्थी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

‘भारतीय विज्ञान परंपरा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी’

$
0
0
‘सर्व प्रकारच्या आधुनिक विज्ञानाची पाळेमुळे ही वेदांमध्ये आढळतात. वेदांमध्ये अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड आहे. या गौरवशाली भारतीय विज्ञान परंपरा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे,’ असे मत ज्येष्ठ कम्प्युटरतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी सोमवारी व्यक्त केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images