Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सेनेची सभांची तलवार म्यान?

0
0
निवडणूक प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असताना शिवसेनेचा कोणताही बडा नेता प्रचाराच्या शेवटच्या रविवारी पुण्यात प्रचाराला येणार नाही. त्यामुळे उमेदवारांना त्यांचा किल्ला स्वतःलाच लढवावा लागणार आहे.

आबांवर दाखल होऊ शकतो गुन्हा!

0
0
निवडणूक लढवायची होती, आमदार व्हायचं होतं तर निदान निवडणुकीनंतर तरी बलात्कार करायचा होता, अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केल्याप्रकरणी त्याची दखल घेऊन पोलिसांकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया कायदाक्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे.

'दिवाळी भेट’ देणारे ताब्यात

0
0
ऐन निवडणूक प्रचारादरम्यान ‘दिवाळी भेट’ देऊन मतदारांना भुलविण्याचा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारीवरून काही कार्यकर्त्यांना ‘रंगेहाथ’ पकडण्यात आल्याने कसबा मतदारसंघात शनिवार रात्रीपासून काहीसे तणावाचे वातावरण आहे.

‘मेट्रो’प्रश्नी नागरिकांची भूमिका काय?

0
0
पुणे व पिंपरी-चिंचवडकरांच्या जिव्हाळ्याचा मेट्रो प्रकल्प गेली अनेक वर्षे कागदावरच राहिल्याबद्दल दोष नेमका कुणाचा?... शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे, वैयक्तिक वाहनांच्या संख्येत आणि त्यायोगे पुन्हा वाहतुकीच्या कोंडीत भरच पडत आहे, त्यामुळे शहराला सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा आवश्यक आहे.

खर्च १६ हजार कोटी, रिंगरोड कागदावरच

0
0
शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या ‘रिंगरोड’ला (बाह्यवळण मार्ग) अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. काही वर्षांपूर्वी साडेतीन ते चार हजार कोटी रुपयांचा खर्च असलेल्या या रिंगरोडचा खर्च आजच्या तारखेला सोळा हजार कोटींच्या घरात जाऊन पोहोचला आहे.

PMP ला ‘ब्रेक’ राजकारण्यांचाच

0
0
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची दुरवस्था, हीच शहराच्या सर्व समस्यांच्या केंद्रस्थानी असूनही, त्यावर रामबाण उपाय शोधण्याच्या आश्वासनांपलीकडे पुणेकरांच्या हातात अद्याप काहीच पडलेले नाही.

सोसायट्यांच्या व्होटबँक मतदानानंतर दुर्लक्षित

0
0
निवडणुकीपूर्वी सर्वपक्षीय उमेदवार सोसायट्यांमधील प्रलंबित प्रश्न पूर्ण करण्याची आश्वासने देतात. मतदान झाल्यानंतर मात्र ही ‘व्होटबँक’ ते वाऱ्यावर सोडतात. हजारो सोसायट्यांमधील पुणेकरांनी नवीन पुणे वसविले आहे. केवळ मतांवर डोळा ठेवण्यापेक्षा, त्यांच्या समस्यांबाबत भावी आमदारांनी संवेदनशील राहणे अपेक्षित आहे.

स्वयंसेवी संस्था आता गेल्या कुणीकडे?

0
0
एरवी, छोट्या-मोठ्या विषयांवरून स्वयंसेवी संस्था रान उठवितात. निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या विषयापासून मात्र नामानिराळ्या का राहतात?

शिक्षणहक्काच्या पळवाटा रोखणार

0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लॉ विभागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) त्रुटी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पळवाटा शोधून काढल्या आहेत

दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

0
0
एम. जी. रोडवर दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिक ठार झाले. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. अशोक विष्णू साळवे (वय ६०, रा. सॅलिसबरी पार्क) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अजिंक्य साळवे (वय २२, रा. सॅलिसबरी पार्क) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

निवडणूक जाणण्यासाठी ‘सार्क’ प्रतिनिधी पुण्यात

0
0
जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असणाऱ्या देशातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया अनुभवण्यासाठी ‘सार्क’ देशांचे सतरा प्रतिनिधी पुण्यात येत आहेत. मतदान आणि मतमोजणीसाठी वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबद्दल (ईव्हीएम) या देशांच्या प्रतिनिधींच्या मनात विशेष उत्सुकता आहे.

संघपरिवाराचे रविवारी ‘मत’ संचलन

0
0
विजयादशमीच्या पथ संचलनापाठोपाठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्यभरात रविवारी विधानसभा निवडणुकीसाठी ‘मत’संचलन केले. आपल्या उमेदवारांना विजयाकडे नेण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही अधिकाधिक मतदान घडवून आणण्याची तयारी संघाने केली आहे.

पिंपरीतील २३ मतदान केंद्रे संवेदनशील

0
0
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतसदारसंघात एकूण २३ मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये पिंपरीतील १०, चिंचवडमध्ये ८ आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात ५ मतदानकेंद्रांचा समावेश आहे.

प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मटका तेजीत

0
0
निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना पैशांचा उडालेला धुराळा शहरातील मटका-जुगार अड्यांवर विसावत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात मिळून १०० मटका-जुगार अड्ड्यांवर नेहमीपेक्षा अधिक गर्दी वाढली आहे.

विशिष्ट समाजाला धमकावण्याचे प्रकार

0
0
काही विशिष्ट समाजाला मतदान न करण्यासाठी भीती दाखवली जात असल्याची तक्रार पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांच्याकडे करण्यात आली आहे. राज्यात कुठेही असा प्रकार होणार नाही; तसेच भीती दाखवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस दलांना देण्यात आले आहे.

मोदींवरील टीकेमुळेच शिवसेनेची घसरगुंडी

0
0
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यामुळेच राज्यात शिवसेनेची घसरगुंडी सुरू झाली आहे. त्यामुळेच सर्व निवडणूकपूर्व जनमत चाचण्यांमध्ये शिवसेनेच्या जागा कमी झाल्याचे चित्र समोर आल्या आहेत,’ या शब्दांमध्ये केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.

‘दिवाळी भेट’ देणारे पोलिसांच्या ताब्यात

0
0
ऐन निवडणूक प्रचारादरम्यान ‘दिवाळी भेट’ देऊन मतदारांना भुलविण्याचा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारीवरून काही कार्यकर्त्यांना ‘रंगेहाथ’ पकडण्यात आल्याने कसबा मतदारसंघात शनिवार रात्रीपासून काहीसे तणावाचे वातावरण आहे.

‘सुपरसंडे’च्या प्रचारात शक्तिप्रदर्शनाला जोर

0
0
राज्यातील आणि केंद्रातील प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा आणि रोड शो..., उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह फेऱ्या काढून केलेले शक्तिप्रदर्शन... आणि पदयात्रा-जीपयात्रा...आदी प्रचार कार्यक्रमांनी विधानसभेच्या निवडणुकीतील मतदानापूर्वीच्या अखेरच्या रविवारी सर्वपक्षीय उमेदवारांनी आपापले मतदारसंघ ढवळून काढले.

प्रचारकांनो, परत फिरा रे...

0
0
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेली नेत्यांची ‘फौज’ प्रचार संपल्यानंतर राजकीय पक्षांना स्वगृही बोलावून घ्यावी लागणार आहे. ही ‘फौज’ परत न गेल्यास पोलिसबळ वापरून बाहेर काढण्यात येण्याची, प्रसंगी त्यांच्यावर कारवाईसुद्धा होण्याची शक्यता आहे.

सुमती टिकेकर यांचे निधन

0
0
मराठी व संस्कृत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री-गायिका सुमती टिकेकर यांचे रविवारी अल्पशः आजाराने निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती बाळासाहेब, पुत्र अभिनेते उदय टिकेकर, स्नुषा ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर टिकेकर, नात स्वानंदी असा परिवार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images