Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सीएमईने पुन्हा बंद केला बोपखेलचा रस्ता

$
0
0
खासदार श्रीरंग बारणे यांनी मध्यस्थी केल्यानंतर काही दिवसांतच लष्कराने बोपखेल गावाकडे जाणारा रस्ता बंद केल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. मंगळवारी सकाळी लष्कराने अचानक हा रस्ता बंद केला.

मंगळयान जागृती अभियान दोन दिवस

$
0
0
फर्ग्युसन कॉलेज, विज्ञान भारती, पुणे आणि ज्योतिर्विद्या परिसंस्थेतर्फे येत्या २४ ते २६ सप्टेंबर या कालावधीत ‘मंगळयान जनजागृती अभियान’ राबविण्यात येणार आहे. मंगळयान मोहिमेच्या अंतिम टप्प्याच्या निमित्ताने आयोजित या अभियानाच्या माध्यमातून कॉलेजमध्ये खगोलशास्त्र आणि अवकाशशास्त्रविषयक प्रदर्शनही मांडण्यात येणार आहे.

भारतासाठी २४ सप्टेंबर थराराचा

$
0
0
‘कमीत कमी खर्चात मंगळावर पोहोचण्याचे देशाने स्वीकारलेले आव्हान... पूर्णपणे भारतीय बनावटीच्या उपकरणांसह आखलेली मंगळ मोहीम... त्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून केलेले अथक परिश्रम... अशा सर्व बाबींचे यशापयश येत्या २४ सप्टेंबरला सकाळी सव्वासात ते सव्वाआठ या एका तासातच निश्चित होणार आहे.

चोरीच्या मोबाइलची सीमेवर विक्री

$
0
0
गेल्या काही दिवसांत शहरातील तीन मोबाइल शॉपी फोडण्यात आल्या असून, त्यातून लाखो रुपयांचे मोबाइल हँडसेट चोरीस गेले आहेत. अशाप्रकारे चोरण्यात आलेले मोबाइल हँडसेट, तसेच विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री बांगलादेशाच्या सीमेवर होत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

कुमार विश्वकोशाचे काही खंड ब्रेल लिपीत

$
0
0
राज्य सरकारतर्फे कुमार विश्वकोश जीवसृष्टी आणि पर्यावरण खंड ब्रेल लिपीत प्रसिद्ध केला जाणार आहे. नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड (नॅब) या संस्थेतर्फे या खंडांचे ब्रेल लिपीकरण करण्यात येत असून, राज्यभरातील ११५ अंध शाळांना हे खंड विनामूल्य दिले जाणार आहेत.

कार्यालयाला कुलूप लावून घरी जा

$
0
0
अधिकारी-कर्मचाऱ्यांना दमदाटी किंवा मारहाण झाल्यास कुलूप लावून ‘महावितरण’चे कार्यालय बंद करून निघून जावे, असा निर्णय ‘महावितरण’च्या प्रशासनाने मंगळवारी घेतला आहे.

पुन्हा शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र

$
0
0
पाषाण आणि कर्वेनगर येथे सोमवारी सकाळी सोनसाखळी हिसकावण्याच्या तीन घटना घडल्या असून त्यात सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने हिसकावण्यात आले आहे. या प्रकरणी कोथरूड आणि चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लोभाने लहान भावाचा खून

$
0
0
नांदेड येथील मालमत्तेवर वारसदार म्हणून नाव लागू नये, म्हणून सात वर्षांच्या मुलाचा मामेबहिणीनेच कालव्यात ढकलून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी मामेबहिणीला अटक केली आहे.

निवडणूक कर्मचाऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा

$
0
0
कामाची वेळ सांभाळून मतदानासंदर्भात काम करायला पुरेसा वेळ तरी आहे का... मतदान अधिकारी म्हणून काम करण्यासाठी अद्याप मानधनच देण्यात आलेले नाही... सोसाट्यांमध्ये माहिती घेण्यासाठी गेल्यावर लोकं धाडकन दार लावून घेतात...

डावललेला ‘शिक्षण हक्क’ ७ दिवसांत द्या

$
0
0
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) विद्यार्थ्यांचे शिक्षण रोखण्याचा हक्क कोणत्याही संस्थेला नाही, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवित, गोखलेनगर भागातील डॉ. विखे पाटील फाउंडेशन शाळेने २५ टक्के आरक्षणांतर्गत ४० विद्यार्थ्यांना सात दिवसांत प्रवेश द्यावा, असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे.

पर्वती मतदारसंघावर शिवसेनेचाच दावा

$
0
0
राज्यात शिवसेना, भाजपमध्ये जागा वाटपावरून जोरदार कलगीतुरा सुरू असतानाच शहरात भाजपच्या वाट्याला असलेला पर्वती मतदारसंघ देण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेकडून पुढे केली जात आहे.

...तर इलेक्शन एजंटवर कारवाई करणार

$
0
0
निवडणुकीच्या काळात उमेदवारांना चुकीच्या मतदारयाद्या व मतदान केंद्रांची माहिती देऊन संभ्रम निर्माण करणाऱ्या खासगी इलेक्शन एजंटवर कारवाई करण्याची तंबी जिल्हा निवडणूक अधिकारी सौरव राव यांनी दिली आहे.

मतदार नोंदणीसाठी शेवटची संधी

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीत नावनोंदणी करण्यासाठी आज, बुधवारी अखेरची संधी असून या मुदतीत नावनोंदणी केल्यावर विधानसभेसाठी मतदानाचा हक्क मिळणार आहे. दरम्यान, मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री मतदार मदत केंद्रे व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात करता येणार आहे.

पासपोर्ट ऑफिसने टाकली कात

$
0
0
पासपोर्टचा अर्ज भरण्यासाठी अपॉइंटमेंट मिळण्यापासून ते पासपोर्ट हातात येईपर्यंतच्या विविध अडचणींमुळे सतत चर्चेत असलेले पासपोर्ट कार्यालय आता कात टाकते आहे.

अपंग शिष्यवृत्तीत दुपटीने वाढ

$
0
0
पहिलीपासून पदवीपर्यंतच्या अपंग विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालान्तपूर्व आणि शालान्त परिक्षोत्तर शिष्यवृत्तीच्या रकमेत सरकारने दुपटीने वाढ केली आहे. शिष्यवृत्तीच्या रकमेची किमान ५० रुपये आणि जास्तीत जास्त ४२५ रुपये मर्यादा वाढून आता किमान १०० रुपये आणि जास्तीत जास्त १२०० रुपये झाली आहे.

B.Sc नंतर २ वर्षांतच इंजिनीअर

$
0
0
फर्ग्युसन कॉलेजमध्ये बीएस्सीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे अमेरिकेतील पेनस्टेट युनिव्हर्सिटीची इंजिनीअरिंगची पदवी घेणे शक्य होणार आहे.

मेट्रोवर पाच हजार हरकती

$
0
0
पालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीत (डीसी रूल्स) मेट्रो नियमावलीचा समावेश करण्यासाठी पालिकेकडे सुमारे पाच हजार हरकती दाखल झाल्या आहेत. या सर्व हरकतींवर सुनावणी घेऊन त्याचा अहवाल अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे.

लाच घेताना पोलिसाला अटक

$
0
0
सेक्स रॅकेटमध्ये नाव गोवण्याची धमकी देऊन येरवडा पोलिस ठाण्यातील कार्यरत प्रशिक्षणार्थी महिला फौजदाराला वीस हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचलपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

‘राष्ट्रवादी’चा डबलरोल

$
0
0
विविध आश्वासनांनी भरलेले विविध पक्षांचे जाहीरनामे निवडणुकीनंतर पक्षांच्याच विस्मरणात जातात असा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना त्याचे स्मरण करून देण्यासाठीचे हे सदर. आजच्या अंकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा ऊहापोह…

सर्वपक्षीय पितृ‘पक्ष’

$
0
0
विधानसभेच्या निवडणुकीचे अर्ज भरण्यास येत्या शनिवारपासून (२० सप्टेंबर) सुरूवात होत असली, तरी सर्वच प्रमुख पक्षांना उमेदवारांची घोषणा करण्याची अजून तरी घाई नाही!
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images