Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नातेवाइक सोबत नसले, तरीही मिळणार भरपाई

$
0
0
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारसाचे नातेवाइक त्याच्याबरोबर राहत नसले, तरी त्यांनाही नुकसान भरपाई मिळू शकते, असे स्पष्ट करून मोटार अपघात न्यायाधिकरणाने एका दाव्यात मयताच्या वारसांना २२ लाख ४४ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश इन्शुरन्स कंपनीला दिला.

संभाव्य उमेदवारांसाठी थेरगावात उद्या बैठक

$
0
0
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राजकीय पक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी, तसेच संभाव्य उमेदवारांना नामनिर्देशन पत्र व आचारसंहितेची माहिती देण्यासाठी शुक्रवारी (१९ सप्टेंबर) सकाळी अकरा वाजता बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भानुदास गायकवाड यांनी दिली.

मोशीत मोबाइल चोराला अटक

$
0
0
रस्त्यावर उभे राहून चोरलेले मोबाइल विकण्याचा प्रयत्न करत असलेल्या तरूणाला युनिट चारच्या पथकाने अटक केली. चिंचवडमधील कस्तुरी मार्केट येथे बुधवारी पावणेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

भरमसाठ फी वाढ अन् अपमानास्पद वागणूक

$
0
0
मोशी येथील गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भरमसाठ फी वाढ अन् विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत विचारणा करावयास गेलेल्या पालकांना शाळा व्यवस्थापनाकडून खडे बोल सुनावण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

रिक्षाचालक-मालकांची ‘सीएनजी’ किटची मागणी

$
0
0
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पुरेशा प्रमाणात सीएनजी पुरवठा व्हावा, ही सुविधा इतर शहरांतही लागू करावी आणि पंप सुरू करावेत, अशी मागणी रिक्षा चालक-मालकांच्या राज्यव्यापी मेळाव्यात बुधवारी करण्यात आली.

लांडे, जगतापांचे कोडे कायम

$
0
0
विधानसभा निवडणूक लढवायची की नाही... लढवायची झाल्यास कोणत्या पक्षाकडून, याबाबतचा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच घेतला जाईल, याचा पुनरूच्चार आमदार विलास लांडे आणि लक्ष्मण जगताप यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

फौजदार लाच घेताना अटकेत

$
0
0
सेक्स रॅकेटमध्ये नाव गोवण्याची धमकी देऊन येरवडा पोलिस ठाण्यातील कार्यरत प्रशिक्षणार्थी महिला फौजदाराला वीस हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

पाषाण-बाणेर लिंक रोडवर समस्यांचे ‘इंटरलिंकिंग’

$
0
0
पाषाण-बाणेर लिंक रोडवरील समस्यांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडी व अपघातांना सामोरे जावे लागत आहे. पाषाण-बाणेर लिंक रोड सध्या समस्यांच्या विळख्यात अडकला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

येरवड्यातील विद्यार्थी घेताहेत पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण

$
0
0
वडगाव शेरी येथील नॅशनल चिल्ड्रेन अॅकॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची इमारत जागामालकाने जमीनदोस्त केल्याने शेकडो विद्यार्थ्यांना पटांगणात पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घ्यावे लागत आहे. चार महिने उलटूनही इमारत बांधली नसल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात हाल आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे.

समाजकल्याण विभागाच्या प्रमुखांकडून ‘अकल्याण’

$
0
0
समाजकल्याण विभागाच्या संत ज्ञानेश्वर वसतिगृहाच्या प्रमुखांचे पती व मुलाने तक्रार घेऊन गेलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि वसतिगृह प्रमुखांची बदली करावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी समाजकल्याण संचालनालयाच्या दारात बुधवारी धरणे आंदोलन केले.

अपहरण, खुनाचा गुन्हा उघड

$
0
0
वडगाव बुद्रुक येथील तरुणाला भोरमधील आशिंपी गावात नेऊन त्याचा गळा आवळून, डोक्यात दगड घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार दत्तवाडी पोलिसांनी उघडकीस आणला. या तरुणाची ओळख न पटल्याने भोर पोलिसांनी त्याचा अंत्यविधीही केला होता.

कायद्याने ठरवलेल्या पात्रतेनुसारच RTE प्रवेश

$
0
0
शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) आरक्षित जागांवरील प्रवेश हे शाळांनी ठरविलेल्या पात्रतेनुसार नव्हे, तर कायद्याने ठरवून दिलेल्या पात्रतेनुसारच होणार असल्याची स्पष्टोक्ती राज्य प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी बुधवारी केली.

‘बीआरटी’चा वेळकाढूपणा

$
0
0
आळंदी-नगर रोड बीआरटीचे सेफ्टी ऑडिट झाले..., त्यातील शिफारसींनुसार मार्गांवर सुधारणा केल्या गेल्या..., बीआरटी मार्गावर बसची यशस्वी चाचणी झाली..., मार्ग सुरू करण्यासाठी आंदोलने झाली...

३ नवीन पुरस्कारांची ‘मसाप’तर्फे घोषणा

$
0
0
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे तीन नवीन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. परिषदेला मिळालेल्या दोन मोठ्या देणगी रकमेतून हे पुरस्कार प्रदान केले जाणार असून, परिषदेचे दिवंगत प्रमुख कार्यवाह, कोषाध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मृत‌िप्रित्यर्थ उत्तम कार्यकर्ता पुरस्कार, आशा संत स्मृत‌िप्रित्यर्थ साहित्यविषयक ग्रंथाच्या संपादकाचाही गौरव करण्यात येणार आहे.

ओला कचरा जिरवणारी लुंकड कोलोनेड सोसायटी

$
0
0
पाण्याची बचत आणि कचरा व्यवस्थापन ही काळाची गरज ओळखून विमाननगर येथील लुंकड कोलोनेड को. ऑपरेटिव्ह सोसायटीने रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम आणि व्हर्मिकल्चर प्लँट कार्यान्वित केला आहे.

महापालिकेचे पथक काश्मीरमध्ये

$
0
0
जम्मू-काश्मीरमधील पूरस्थितीमुळे उद‍्ध्वस्त झालेली पाणीपुरवठा आणि सांडपाणी वाहिन्यांची यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी पालिकेतर्फे गुरुवारी (१८ सप्टेंबर) तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे पथक पाठविण्यात येणार आहे.

बलात्कार : ज्येष्ठ नागरिकाला अटक

$
0
0
लग्नाची जाहिरात देऊन ५० वर्षीय महिलेला घरकामाला ठेवून ​तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका ६३ वर्षीय वृद्धाला पोलिसांनी अटक केली आहे. अशोक वसंत पटवर्धन (वय ६३, रा. नवी पेठ) असे अटक आरोपीचे नाव आहे.

डेंगी रोखण्यासाठी कृती आराखडा करा

$
0
0
डेंगीच्या पेशंटच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन या आजाराची साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. डेंगीवर नियंत्रण आणण्यासाठी सर्व विभागांच्या मदतीने कृ‌ती आराखडा तयार केला जाणार आहे.

राजकीय नेत्यांपेक्षा स्वबळावर मराठवाड्याचा विकास होईल

$
0
0
‘मराठवाड्याच्या विकासाबाबत राजकीय नेते, राजकीय इच्छाशक्तीची वाट पाहत वेळ घालवण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा जातिभेद, प्रांतभेद, भाषाभेद बाजूला ठेवून स्वतःच्या ताकदीवर मराठवाड्याच्या विकासाचे विचार प्रत्यक्षात आणणे महत्त्वाचे आहे,’ असे मत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राम भोगले यांनी मांडले.

मतदारयादीत नावनोंदणीसाठी गर्दी

$
0
0
मतदार नोंदणीचा फॉर्म घेण्यापासून जमा करण्यापर्यंत सर्व ठिकाणी असलेली लांबलचक रांग... तरुणांची उल्लेखनीय गर्दी... यादी भाग क्रमांक शोधण्यासाठी चाललेली धडपड...
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images