Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

हक्काचे पाणी आजपासून पूर्ववत

$
0
0
शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे १०० टक्के भरूनही पुणेकरांना दोनवेळचे पाणी देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना अखेर पुणेकरांच्या दबावापुढे झुकावे लागले. गुरुवारपासून (११ सप्टेंबर) शहरात पुन्हा दिवसातून दोनदा पाणीपुरवठा केला जाणार असून, १५ ऑक्टोबरपर्यंत दोनवेळ पाणी दिले जाणार आहे.

जाणू इतिहास बागेचा...

$
0
0
साठ वर्षांपूर्वीचा कैलासपती वृक्ष (कॅनन बॉल्स), शंकरजटा (फिश टेल पाम), महागनी, स्पॅथोडिया पिचकारी उर्फ कारंज, बारतोंडी, जिवंती (इंडियन चारकोल) अशा वैविध्यपूर्ण वनस्पती वैभव अनुभवण्याची संधी हेरिटेज वॉकमध्ये मिळणार आहे. येत्या रविवारी (१४ सप्टेंबर) संध्याकाळी पाच वाजता एरंडवण्यातील कमला नेहरू उद्यान इथं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

जुन्नरलाही हवे सी-प्लेन

$
0
0
जुन्नर परिसरात किल्ले शिवनेरीसोबतच लेण्याद्री-ओझरचे अष्टविनायक, नाणेघाट, तसेच पाच धरणे असल्यामुळे या भागात पर्यटनाच्या दृष्टीने सी-प्लेन सुविधा सुरू करण्याची मागणी जुन्नरच्या सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

बहिणीसह चौघांना जन्मठेप

$
0
0
प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या भावाचा काटा काढण्यासाठी कट रचून त्याचा खून केल्याप्रकरणी बहिणीसह चौघांना जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश आर. एस. तिवारी यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

संतोष माने प्रकरणात नुकसानभरपाईचे दावे

$
0
0
बसचालक संतोष माने प्रकरणातील मयतांचे वारस आणि जखमींच्या अकरा कुटुंबीयांनी तीन कोटी २७ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळावी म्हणून ​शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात दावे दाखल केले आहेत.

पुढील आठवड्यात ठरणार साहित्य संमेलनाची रुपरेषा

$
0
0
पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कार्यक्रमांची रुपरेषा पुढील आठवड्यात निश्चित होणार आहे. महामंडळाचे पदाधिकारी आणि संयोजन समिती १८ सप्टेंबरला संमेलनस्थळाची पाहणी करणार असून, त्यानंतर होणाऱ्या बैठकीत संमेलनाचा कार्यक्रम ठरवला जाणार आहे.

वैद्यकीय निष्काळजीपणाबद्दल नुकसानभरपाई

$
0
0
लष्करातील हवालदाराच्या पत्नीच्या बाळंतपणात वैद्यकीय निष्काळजीपणा दाखविल्याप्रकरणी लष्कराच्या पुणे आणि पटियालाच्या डॉक्टरांना संबंधित महिलेला सात लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश पुणे ग्राहक न्यायमंचाने दिला. बाळंतपणाची शस्त्रक्रिया करताना या महिलेच्या पोटात सुई राहिली होती.

झेक प्रजासत्ताकशी ‘इपीएफओ’चा करार

$
0
0
एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गेनायझेशनने (इपीएफओ) झेक प्रजासत्ताक या देशाशी सामाजिक सुरक्षा करार केला असून, त्याची अंमलबजावणी एक सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. या करारामुळे नोकरीनिमित्त या देशात जाणारे आणि या देशातून भारतात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा लाभणार आहे.

विकासकामांच्या श्रेयासाठी चढाओढ

$
0
0
महापौर आणि उपमहापौरपदाचा कार्यकाळ संपत असल्यामुळे गेल्या अडीच वर्षांत केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी महापौर मोहिनी लांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. तर, उपमहापौर राजू मिसाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलेल्या कामांची माहिती दिली.

नादुरूस्त कॅमेरा, लेन्सची रक्कम परत देण्याचा आदेश

$
0
0
कॅमेरा दुरूस्त होणार नाही, असे सांगून ग्राहकाला योग्य सेवा न दिल्याप्रकरणी एका कॅमेऱ्याच्या कंपनीला ग्राहक न्याय मंचाने दणका दिला आहे. अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्षा अंजली देशमुख, सदस्य एस. के. पाचरणे यांनी ग्राहकाला कॅमेरा आणि लेन्सची रक्कम परत करण्याचा आदेश दिला.

बोर्डाचे वाहन प्रवेश कर कंत्राट वादात

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे वाहन प्रवेश कर आणि पे अॅण्ड पार्कचे कंत्राट तांत्रिक वादात सापडले असून, कंत्राटप्रक्रिया गुरुवारी पुन्हा रद्द करण्यात आली. आता याबाबतचा निर्णय येत्या मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत घेण्यात येणार आहे.

तिकीटांचा ‘खजिना’ उलगडणारे संग्रहालय

$
0
0
टपाल खात्याकडून काढण्यात आलेली तिकिटे, पाकिटे, ​ग्रिटिंग नागरिकांना पाहायला मिळावीत, यासाठी मुख्य टपाल कार्यालयात नवे संग्रहालय बनविण्यात आले आहे. या संग्रहालयात वेगवेगळ्या संग्राहकांनी संग्रहित केलेल्या तिकिटांचा खजिना बघता येणार असून, ‘माय स्टॅम्प’ या योजनेअंतर्गत नागरिकांना स्वतःचा फोटो असलेले तिकीटदेखील तयार करून देण्याची कायमस्वरूपी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे.

मेट्रो प्रकल्प पुढील आठवड्यात ‘पीआयबी’समोर

$
0
0
केंद्र सरकारच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डासमोर (पीआयबी) शहराच्या बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाचे सादरीकरण पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी मेट्रोच्या मान्यतेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अत्यंत धूसर असल्याचे स्पष्ट होत आहे.

मानेंच्या निलंबनप्रकरणी अॅफिडेव्हिटचे आदेश

$
0
0
राज्याचे पणन संचालक सुभाष माने यांच्या निलंबनाप्रकरणी राज्य सरकाने अॅफिडेव्हिट सादर करावे, असा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) गुरुवारी दिला आहे.

तेरा पंचायत समित्यांच्या पदांची रविवारी निवडणूक

$
0
0
जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक येत्या रविवारी (१४ सप्टेंबर) होणार आहे. सभापती पदांच्या आरक्षण सोडतीनुसार यातील निम्मी सभापतीपदे महिलांना मिळणार आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक २१ सप्टेंबरला घेण्यात येणार आहे.

पालक-शिक्षक संघ निम्म्या शाळांत नाही

$
0
0
शुल्क नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या पालक-शिक्षक संघाच्या स्थापनेविषयी राज्यातील शाळा गांभीर्याने विचारच करत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

पुतण्याचे अपहरण करणाऱ्या काकाला अटक

$
0
0
मोठ्या भावाबरोबर झालेल्या भांडणातून त्याने घरातून हाकलून दिले म्हणून त्याच्या पाच वर्षाच्या मुलाचे अपहरण करुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या भावाला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून लहान मुलाला सोडविण्यात आले आहे.

नव्या अभ्यासक्रमाला एकही आक्षेप नाही

$
0
0
चौथीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या नव्या अभ्यासक्रमाला आणि परीक्षेच्या नव्या स्वरूपाला राज्यातून एकही आक्षेप नोंदविला गेला नसल्याचे समोर आले आहे.

विद्यापीठातील अध्यासनप्रमुखांची पदे रिक्त

$
0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील १९ अध्यासनांपैकी केवळ ८ अध्यासने पूर्णवेळ प्रमुखांसह सुरू असल्याने अध्यासनांच्या कार्यक्षमतेविषयी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे.

खोट्या पत्त्यांमुळे पासपोर्ट प्रक्रियेस विलंब

$
0
0
पासपोर्ट अर्ज जमा करताना रहिवासी पत्त्याविषयी अर्धवट माहिती दिल्याने दररोज किमान पाच विद्यार्थी तर सुमारे दहा नागरिकांना पाच हजार रुपयांच्या दंडाला सामोरे जावे लागते आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>