Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सरकारी निर्णय यंदा दुपटीने पास

0
0
राज्यातील कोणत्याही सरकारी कामासाठी महत्त्वाचा संदर्भ म्हणून आवश्यक असणारे सरकारी निर्णय काढण्याची राज्य सरकारची क्षमता गेल्या काही महिन्यांमध्ये अचानक वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

जिल्ह्यात फक्त ५८ टक्के पेरण्या

0
0
जिल्ह्यात या वर्षी खरीप हंगामात फक्त ५८ टक्के पेरण्या झाल्या असून, उत्पादनात सुमारे २० टक्क्यांपर्यंत घट होणार आहे. मात्र त्यामुळे रब्बीला अधिक क्षेत्र उपलब्ध झाले असून पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास रब्बी पिकांचे उत्पादन वाढण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

कोथरूडमधील नागरिक हैराण

0
0
कोथरूड परिसरातील नागरिकांना डासांच्या समस्यांनी हैराण केले आहे. या परिसरात डासांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे; तसेच मलेरिया, डेंगीच्या पेशंटची संख्याही वाढते आहे. पालिकेकडून औषधांची फवारणी नियमित होत नसल्याने डासांची संख्या वाढल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

डासांची उत्पत्ती : तेराशे जणांना नोटीस

0
0
धनकवडी, कसबा, रविवार पेठ, कोथरूड, कर्वेनगर, घोले रस्ता, येरवडा, भवानी पेठ यासारख्या भागात डेंगीच्या डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आले आहे. या भागात डेंगीच्या डासांच्या उत्पत्तीप्रकरणी साडेतीन महिन्यांत १३०० जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.

कॉलेजच्या गुणवत्तेपेक्षा शहराला गुण अधिक

0
0
पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी देशातील विद्यार्थी कॉलेजच्या गुणवत्तेपेक्षा कॉलेज कोणत्या शहरामध्ये आहे, या मुद्द्याला प्राधान्य देत आहेत. शहरांसाठीच्या या प्राधान्यक्रमामध्येही देशाची राजधानी दिल्ली अग्रक्रमावर असून, बेंगळुरू दुसऱ्या, तर ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ असणारे पुणे शहर तिसऱ्या क्रमांकावर आले आहे.

फेरतपासणीच्या प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांची पिळवणूक

0
0
नापास झाल्याने किंवा अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने फेरमूल्यांकन किंवा फेरतपासणीसाठी अर्ज केला आहे, अशा इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना केवळ दहा टक्के शुल्क आकारून पुढील वर्षात/सत्रात तात्पुरता प्रवेश द्यावा, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

‘साखरगडनिवासिनी’चे मंदिर ‘युनेस्को’च्या नोंदीत

0
0
सातारा जिल्ह्यातील किन्हई गावचे श्री साखरगडनिवासिनी देवी मंदिर आता थेट ‘युनेस्को’च्या नोंदींमध्येही झळकले आहे. मंदिराच्या जतनसंवर्धनासाठी पुण्यातील ‘किमया’ या आर्किटेक्चरल फर्मच्या कार्याने मंदिराला मिळालेल्या गतवैभवामुळे ही नोंद घेण्यात आली आहे.

रेल्वे विभागाचा पुन्हा पालिकेला कोलदांडा

0
0
महापालिकेने दिलेल्या प्रस्तावांना विरोध करून हे प्रस्ताव थेट फेटाळून लावण्याचा धडाकाच रेल्वे विभागाने लावला आहे. शिवाजीनगर रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण करताना स्टेशनबाहेर असलेल्या बस स्थानकाचेही नूतनीकरण करावे, असा प्रस्ताव महापालिकेने रेल्वे विभागाला दिला होता.

ठेकेदाराला वाहतूक पोलिसांची ‘समज’

0
0
स. गो. बर्वे चौकातील ग्रेड सेपरेटरचे काम दिरंगाईने करणाऱ्या ठेकेदाराला वाहतूक पोलिसांनी चांगलीच ‘समज’ दिली आहे. ग्रेड सेपरेटरचे काम करण्यासाठी ठरलेल्या निर्धारित वेळेपेक्षा उशीर केल्यामुळे वाहतूक पोलिसांनी हे काम गेल्या आठवड्यात बंद केले होते.

मतदार यादीतील गोंधळ टाळण्यासाठी उपाययोजना

0
0
मतदार यादी आणि मतदानासंबंधीचा गोंधळ टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने ठोस पावले उचलली असून विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखेच्या दहा दिवस अगोदरपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. या दिवसापर्यंत मतदार नोंदणी करणाऱ्यांनाच निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळू शकणार आहे.

८ वर्षांच्या विद्यार्थिनीचा विनयभंग

0
0
हडपसर परिसरात असलेल्या एका शाळेतील आठ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या व्हॅन चालकाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. विनयभंगाचा हा प्रकार गेल्या आठवड्यात घडला होता. सुहास अरुण गव्हाणे (वय २६, रा. मांजरी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.

काश्मीरमधील पुरात तीनशे पुणेकर अडकले

0
0
जम्मू आणि काश्मीरमध्ये आलेल्या पुरामध्ये त्या भागात सहलीवर गेलेले महाराष्ट्रातील तब्बल एक हजार पर्यटक सध्या विविध ठिकाणी अडकले आहेत. यात पुण्यातील पर्यटकांची संख्या तीनशे आहे. पर्यटक अडकलेल्या भागात बुधवारी दुपारपासून बचाव कार्याला सुरुवात झाली असून संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रातील शंभर पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी आणण्यास यश आले आहे.

बेकायदा बांधकामांवर २ दिवसांत हातोडा

0
0
शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून पुढील दोन दिवसांत ही कारवाई वेगाने सुरू होणार आहे.

३४ गावांमधील बांधकामांचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडेच

0
0
महापालिकेच्या हद्दीत ३४ गावांच्या समावेशाचे अंतिम आदेश निघेपर्यंत या हद्दीत जिल्हाधिकाऱ्यांनीच बांधकामांची परवानगी द्यावी, असा आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी दिला.

अरेरावीनंतर आता ताल आत्मपरीक्षणाचा!

0
0
ढोलपथकांच्या अरेरावीने गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक ‘हायजॅक’ झाल्याचा आरोप होत असतानाच पथकांनीदेखील आत्मपरीक्षण सुरू केले आहे. पथकांममुळे परंपरा जपली जाण्यापेक्षा उत्सवालाच बेशिस्तीची दूषणे लावली जात असल्याने विमलाबाई गरवारे शाळेच्या ढोलपथकाने तीन वर्षांसाठी पथक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘आधार’ आता देणार तपासकामालाही आधार!

0
0
वेगवेगळ्या गुन्ह्यांपोटी तुरुंगांच्या भिंतीआड शिक्षा भोगत असलेल्या राज्यभरातील कैद्यांनाही आता ‘आधार’ची ओळख मिळणार आहे. राज्यातील सर्व तुरुंगांमधील कैद्यांचे आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

दूध : प्रतिलिटर ५० पैसे बोनस

0
0
पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटरमागे ५० पैसे बोनस देण्याचा निर्णय पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने जाहीर केला. तसेच, दुधाच्या दरात कोणतीही दरकपात न करण्याचा निर्णयही घेतला. उत्पादकांना ५० पैसे बोनस देण्याचा निर्णय घेतल्याने संघावर सुमारे अडीच कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

मोडीलिपी वाचकावर गुन्हा

0
0
स्वतःच्या फायद्यासाठी वेल्हे तालुका तहसील कार्यालयातील जुन्या मोडी कागदपत्राच्या सरकारी दस्तावेजामध्ये खाडाखोड करून खोटा दस्तावेज केल्याप्रकरणी विश्वनाथ भागुजी गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवरात्रात तोरण बंदी कायमच

0
0
नवरात्रौत्सवात काढण्यात येणाऱ्या तोरण मिरवणुकांना यंदाही परवानगी न देण्याची ठाम भूमिका पोलिसांनी घेतली आहे. त्याचशिवाय डॉल्बीमुळे होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्याबाबतही पोलिसांकडून गांभीर्याने पावले उचलली जात आहेत. त्यासाठी डॉल्बीवर बंदी घालण्यासाठीचे कायदेशीर मार्ग तपासण्यात येत आहेत.

२ हजार जणांना डेंगीची लागण

0
0
डेंगीच्या डासांची पैदास रोखण्यास पुणे महापालिकेला अपयश आल्याने गेल्या नऊ महिन्यांत सुमारे दोन हजार नागरिकांना डेंगीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक ५९१ पेशंटची नोंद करण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images