Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘टाइप प्लॅन’ घरांचा प्रस्ताव लवकरच

$
0
0
शहरालगतच्या गावांतील बेकायदा व अनधिकृत बांधकामांना अटकाव घालण्यासाठी ‘टाइप प्लॅन’ घरे बांधण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. टाइप प्लॅन घरे बांधल्यास नागरिकांना बिगरशेती परवानगी व बांधकाम आराखड्याच्या मंजुरीसाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत.

आणखी दोन सीएनजी पंप सुरू?

$
0
0
पुण्यातील ‘सीएनजी’चा पुरवठा सुरळीत होण्याबाबत ठोस निर्णय झाला नसला, तरी पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करणार्या वेगवेगळया भागातील चार पंपांवर आता ‘सीएनजी’ उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसेच दोन नवे पंप सुरू करण्याच्या हालचाली जिल्हा परिवहन प्राधिकरण आणि ‘आरटीओ’ ने केल्या आहेत.

धरणांतील पाणीसाठा २१ टीएमसींवर

$
0
0
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून हा पाणीसाठा आता २१ टीएमसीवर पोहोचला आहे. धरणांचा साठा समाधानकारक स्थितीत आला असला, तरी शेतीसाठी आणखी पाण्याची आवश्यकता आहे.

शिक्षणमहर्षी डॉ.जे.जे. मगदूम यांचे निधन

$
0
0
शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथील शिक्षणमहर्षी, प्रसिध्द धन्वंतरी, माजी नगराध्यक्ष डॉ. जे. जे. मगदूम (८४)यांचे मंगळवारी सकाळी साडेआकराच्या सुमारास राहत्या घरी हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले

पुणेकरांची लातूरला धाव

$
0
0
विलासराव देशमुख यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मराठवाड्याच्या पुण्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लातूरकडे कूच केली. परिणामी,शिवाजीनगर एसटी स्टँड आणि खासगी गाड्यांच्या थांब्यांवर मंगळवारी दुपारपासूनच प्रचंड गर्दी झाली.

स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू

$
0
0
स्वाइन फ्लूच्या आजाराने गुलटेकडी येथील उल्ला अब्दुलअजीज मोमीन (वय ५७) यांचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेहासह सेप्टीसिमियाचाही आजार असल्याचे निदान झाले होते.

जकात चुकवून आणलेले ३ किलो सोने जप्त

$
0
0
जकात चुकवून शहरात येणा-या सोन्याच्या विरोधात महापालिकेच्या जकात विभागाने केलेल्या कारवाईत विविध अंगडियांकडून (कुरिअर) सुमारे तीन किलो सोने जप्त करण्यात आले. या प्रकरणी महापालिकेने आतापर्यंत सुमारे अकरा लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

स्वातंत्र्यदिनी घ्या कॅन्सरपासून मुक्तीची प्रेरणा

$
0
0
कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो असा दावा करीत पुण्यातील कॅन्सरतज्ज्ञांनी आता स्वातंत्र्यदिन हा दर वर्षी कॅन्सरविरोधी लढाई दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निमित्ताने वर्षभर कॉलेजांमध्ये व्याख्याने, सपोर्ट ग्रुपची स्थापना यांसारखे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.

कत्तलखान्यावरून रंगले राजकारण

$
0
0
काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेच्या सदस्यांनी राष्ट्रवादीला मदतीचा हात देऊ केल्याने कोंढव्यातील कत्तलखाना खासगी कंपनीस चालविण्यास देण्याचा विषय दप्तरी दाखल होण्याऐवजी मंगळवारी मान्य झाला. त्यामुळे एकाकी पडलेल्या भाजपने काँग्रेस आणि मनसेसह मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेवरही तोफा डागल्या आहेत.

हातगाडीवाल्यांचे पुनर्वसन करा

$
0
0
‘स्वारगेट येथील हातगाडीवाले, स्टॉलवाले हे परवानाधारक असून, अतिक्रमण विभागाने विनाकारण हटविल्यामुळे आमची उपासमार होऊ लागली आहे. परिणामी आम्हा परवानाधारक व्यावसायिकांचे पुन्हा पुनर्वसन करावी,’ अशी मागणी विक्रेत्यांनी केली.

ट्रकने चिरडल्याने दुचाकीस्वार ठार

$
0
0
मुंबई-बंगळुरू हायवेवर बावधन येथील हॉटेल रानवारासमोर ट्रकचालकाने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘आयटी’च्या हिंजवडीत गावगुंडांचा धुमाकूळ

$
0
0
‘लाखात देखणी’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करणा-या कलावंताच्या चमूतील एका तरुणीची छेड काढल्याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंजवडी परिसरातील तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

रांका ज्वेलर्समध्ये लाखाच्या अंगठ्यांची चोरी

$
0
0
रांका ज्वेलर्सच्या रविवार पेठेतील दुकानामध्ये खरेदीच्या बहाण्याने दोन सोन्याच्या अंगठ्यांची चोरी करणा-या एका महिलेसह पुरुषावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात ४९ हजारांचा गुटखा जप्त

$
0
0
पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील एका व्यापा-याच्या गोदामावर छापा घालून त्यातील विविध कंपन्यांचा ४९ हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशाससनाने (एफडीए) मंगळवारी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.

ईदगाह मैदानावर २ दरवाजे नाहीतच

$
0
0
ईदगाह मैदानावर रमजाननिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेसाठी जा-ये करण्यासाठी दोन वेगवेगळे दरवाजे उभारण्याची पुणे पोलिसांची मागणी पुणे कॅन्टोमेंट बोर्डाने मंगळवारी धुडकावून लावली. एकाच दरवाजातून ये-जा होऊ शकते, असा खुलासा करून बोर्डाने ही परवानगी नाकारली.

अपहरणकर्त्या महिलेचे रेखाचित्र जारी

$
0
0
हडपसरमधील साने गुरुजी हॉस्पिटलमधून अर्भक पळविणा-या अपहरणकर्त्या महिलेचे रेखाचित्र पो‌लिसांनी तयार केले आहे.

ईशान्य भारतातील विद्यार्थी पुण्यात सुरक्षित

$
0
0
मुंबईत झालेल्या दंगलीमागे बांगलादेशी घुसखोरांचा हात असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. शिक्षणासाठी किंवा नोकरी करणारे ईशान्य भारतातील विद्यार्थी, नोकरदार पुण्यात सुरक्षित आहेत. तसेच यापुढेही त्यांचे परिषदेकडून संरक्षण केले जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अनास्थेमुळे चिघळतेय जम्मू-काश्मीरची जखम

$
0
0
‘भारतीय जनतेची कमालीची उदासीनता आणि दिल्लीत बसलेले सेक्युलर सुलतान यांच्यामुळेच जम्मू-काश्मीरच्या प्रश्नाचा गुंता झाला आहे. देशाचा अविभाज्य घटक असूनही त्याबाबत खरी माहिती जाणून घेण्याची तळमळ कुणी दाखवत नसल्याने जम्मू-काश्मीर ही समस्या बनली आहे,’ असे मत खासदार तरुण विजय यांनी मंगळवारी व्यक्त केले.

‘दासबोध’ आयुष्य प्रकाशित करणारा ग्रंथसूर्य

$
0
0
‘समर्थांच्या सर्व शिकवणीचा सार असणारा ‘दासबोध’ हा सर्वसामान्यांची आयुष्ये प्रकाशित करणारा ग्रंथसूर्य आहे. त्यामुळेच उज्ज्वल राष्ट्रउभारणीसाठी प्रत्येक नागरिकाने ‘दासबोधा’ची शिकवण अंगिकारणे आवश्यक आहे,’ असे आवाहन आचार्य गोविंदगिरीजी महाराज यांनी मंगळवारी केले.

जीपवर गोळीबार : ५ लाख लांबविले

$
0
0
पुणे-सोलापूर रोडवर बँकेत भरणा करण्यासाठी चाललेल्या आयआरबी कंपनीच्या जीपवर गोळीबार करून जीपमधील सुमारे पाच लाख रुपयांची रोकड लांबविण्यात आली. यवत पोलिसांनी या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images