Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गुरुवारी सोलापूर रोडला पाणी बंद

0
0
पुणे महापालिकेच्या लष्कर जलकेंद्रातील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (ता. १६) सोलापूर रोड आणि आसपासच्या परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

अखेर गणवेश वाटपाला मुहूर्त मिळाला

0
0
पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अखेर गणवेश मिळू लागले आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये स्वातंत्र्यदिनापर्यंत सर्व गणवेशांचे वाटप पूर्ण करण्यात येणार आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी सोमवारी ही माहिती दिली.

कायम संलग्नत्वासाठी हवी ‘नॅक’, ‘एनबीए’ची मान्यता

0
0
‘नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन’ (एनबीए) किंवा ‘नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रेडिटेशन कौन्सिल’कडून (नॅक) मूल्यांकन करून घेतलेल्या कॉलेजांनाच या पुढे कायम संलग्नत्व देण्यासाठी विचार केला जाणार आहे. पुणे विद्यापीठाने या संदर्भात पावले उचलली असून, विद्या परिषदेत तसा ठरावही मंजूर करण्यात आला आहे.

स्त्री संवेदनांना चित्रपटात मोजकेच स्थानः सई परांजपे

0
0
जिद्द असलेल्या, काही करण्याची ऊर्मी असलेल्या स्त्रियांचे चित्रण मोजक्या भारतीय चित्रपटांत करण्यात आले असून, फारच थोड्या दिग्दर्शकांनी संवेदनशील पद्धतीने स्त्रियांच्या संवेदनांना चित्रपटात हाताळले’, अशी खंत ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांनी येथे व्यक्त केली.

नऊ प्रमुख हॉस्पिटलमध्ये गर्भपात गोळ्या मिळणार

0
0
शहरातील प्रमुख नऊ बड्या खासगी हॉस्पिटलच्या औषधविक्री दुकानांतच गर्भपात गोळ्यांची (एमटीपी) विक्री करण्यात येणार आहे. कारवाईच्या भीतीपोटी औषधांची विक्रीच बंद केल्यानंतर अखेर इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दिलजमाई करीत तोडगा काढला.

चिपळूण संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

0
0
बोधचिन्हामध्ये पारंपरिक प्रतिमांचा वापर करण्याऐवजी सुलेखनाच्या माध्यमातून साहित्य निर्मितीतील ‘अक्षर-रूप’ साकारण्याचा प्रयत्न चिपळूण येथे होणाऱ्या आगामी ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणार आहे. संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण सोमवारी करण्यात आले.

‘पुणे कॅन्टोन्मेंट’मध्ये हेल्मेटसक्ती करणार?

0
0
पुणे कॅन्टोन्मेंट मंडळाच्या क्षेत्रात, दुचाकी वाहनचालकांशी संबंधित अपघाताचे मोठे प्रमाण लक्षात घेता, या क्षेत्रांत राहणाऱ्या आणि या भागातून येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी, येत्या १ सप्टेंबर पासून हेल्मेटचा वापर अनिवार्य करण्याबाबत, संबंधित लष्करी यंत्रणा विचार करत आहे.

‘इंटरनेट अॅडव्हर्टायझिंग’वर रविवारी मोफत कार्यशाळा

0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘प्रगती फास्ट’ आणि ‘एडिट इन्स्टिट्यूट’ यांच्यातर्फे येत्या रविवारी (१९ ऑगस्ट) ‘इंटरनेट अॅडव्हर्टायझिंग’ या विषयावर विनामूल्य कार्यशाळा आयोजिण्यात आली आहे. पदवीपूर्व आणि पदवीधर विद्यार्थी यात भाग घेऊ शकतात.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी जागेची मागणी

0
0
जुन्नर तालुक्यातील आळे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी फुले-साठे-आंबेडकर विचार फाउंडेशनच्यावतीने करण्यात आली.

फूस लावून मुलीला पळवून नेल्याप्रकरणी तरुणास अटक

0
0
लग्नाचे अमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी एका २७ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यशश्री मारुलकर यांनी हा आदेश दिला.

आम्ही पुण्यात सुरक्षित आहोत...

0
0
पुण्यामध्ये आम्ही सर्व जण अगदी सुरक्षित आहोत. काही समाजकंटकांकडून परस्पर पसरविण्यात येणारया गैरसमजातून आमच्यावर हल्ले होत आहेत. आता पोलिस आणि स्थानिक पुणेकरांकडूनही आम्हाला सुरक्षिततेची हमी दिली जातेय. आम्ही सुरक्षित आहोत, असाच संदेश आमच्या पालकांपर्यंत आम्ही पोहचवू इच्छितो...

मुस्लिम नेत्यांकडून विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध

0
0
‘आसाममध्ये झालेल्या हिंसाचारानंतर मुंबईमध्ये झालेली दंगल आणि त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यांचा पुण्यातील मुस्लिम समाजातील नेतेमंडळींनी निषेध केला आहे.

दूधउत्पादक शेतकऱ्यांना हवी दरवाढ

0
0
जनावरांच्या चारा-वैरण, तसेच पशुखाद्यामध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन दूधउत्पादक शेतकऱ्यांना सरकारने दरवाढ द्यावी, असा ठराव पुणे जिल्हा सहकारी दूधउत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) सर्वसाधारण सभेत करण्यात आला.

नॉर्थइस्टकडील मुलांसाठी २४ तास हेल्पलाइन सुरू सरहद संस्थेचा उपक्रम

0
0
सरहद संस्थेच्या ‘हाक ब्रह्मपुत्रेची’ या उपक्रमांतर्गत मणिपूर, आसाम, नागालँड भागातील विद्यार्थ्यांना मानसिक आधार देऊन त्यांना पूर्ण संरक्षण देण्यासाठी पुण्यात चोवीस तास हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

मल्टिप्लेक्स मनसे चौकट ‘मराठीचे खेळ

0
0
हिंदीतील सलमान खान-कतरिनाच्या बिगबजेट ‘एक था टायगर’साठी मराठी चित्रपटांचे खेळ रद्द करू नयेत, या मागणीसाठी मनसेतर्फे शहरातील सर्व मल्टिप्लेक्सचालकांना सोमवारी निवेदन देण्यात आले.

यूथ मिशन’च्या राष्ट्रीय समन्वयकपदी डॉ. पठाण

0
0
नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू व शिक्षणतज्ज्ञ डॉ. एस. एन. पठाण यांची विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, यूथ मिशनच्या राष्ट्रीय समन्वयकपदी नुकतीच संस्थेद्वारे नियुक्ती करण्यात आली.

जैन युवक युवती परिचय संमेलनाचे आयोजन

0
0
भारतीय जैन संघटनेच्या पुणे विभागातर्फे जैन उच्च शिक्षिक युवक -युवती परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दोन सप्टेंबर रोजी ओसवाल बंधू समाज कार्यालयात हे संमेलन होणार आहे.

भीमाशंकरवरून वळसे-मोहिते वाद

0
0
भीमाशंकर तीर्थक्षेत्राच्या हद्दीवरून विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील आणि खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्यातील शीतयुद्ध पुन्हा एकदा भडकले आहे. भीमाशंकर येथील जुन्या पाट्या बदलून ‘भीमाशंकर, तालुका खेड’ अशा नवीन पाट्या आमदार मोहिते यांनी येथे लावल्या आहेत.

मराठीपुढे मोठी आव्हाने

0
0
मराठी वाचक वाढवणे, कुशल मनुष्यबळ मिळवणे, नवीन तंत्रज्ञान अवगत करणे, सकस लेखनाचा आकसलेला प्रवाह वाढवणे अशी अनेक आव्हाने मराठी नियतकालिकांसमोर असल्याचे मत नियतकालिकांच्या संपादकांनी व्यक्त केले.

शहरात तुरळक पावसाची हजेरी

0
0
शहर आणि परिसरात सोमवारी पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. पुढच्या दोन दिवसांत शहराच्या काही भागांत किरकोळ पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांचा पाणीसाठाही २१.१० टीएमसीपर्यंत पोहोचला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images