Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शिक्षणसेवकांचे मानधन वाढविले

$
0
0
पुणे महापालिकेच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारने माध्यमिक शाळांतील शिक्षणसेवकांचे मानधन चार हजार रुपयांवरून आठ हजार केले आहे.

ज्येष्ठ नागरिकांचा उद्या निषेध दिन

$
0
0
केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी पुण्यासह राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघ गुरुवारी (ता. १६) निषेध दिन पाळणार आहेत.

पुण्याची तहान भागली; आता शेती फुलवा!

$
0
0
शहराला पाणीपुरवठा करणा-या धरणातील पाणीसाठा २१ टीएमसीपेक्षा अधिक झाल्याने खडकवासला प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांन‌ी मंगळवारी जिल्हा प्रशासनाला दिला.

दुखवटा असला, तरी ध्वजवंदन नेहमीप्रमाणे

$
0
0
विद्यमान केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनामुळे राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असला, तरी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजवंदन नेहमीप्रमाणेच ध्वज पूर्ण उंचीवर फडकावूनच होणार आहे.

पुणे पोलिस आयुक्तांसह १२ जणांना राष्ट्रपती पदक

$
0
0
पुण्याचे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, ‘सीआयडी’चे प्रमुख अप्पर पोलिस महासंचालक एस. पी. यादव यांच्यासह पुणे शहरातील ११ पोलिस अधिकारी- कर्मचा-यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदकांची घोषणा करण्यात आली. एकूण पदकविजेत्यांमध्ये राज्यातील ४३ पोलिस अधिकारी-कर्मचा-यांचा समावेश आहे. पोळ आणि यादव यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतीपदक देण्यात येणार आहे.

‘रेडिओ FTII’ वर घुमणार बालचमूंचा आवाज

$
0
0
‘लहान मुलांच्या हक्कांसाठी ‘युनिसेफ’ काय कार्य करते..., राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेतर्फे शिक्षकांचे प्रशिक्षण कसे चालते, या सारख्या विषयांपासून माता व बालसंगोपन, प्राथमिक आरोग्य केंद्र, दूधवाले-भाजीवाल्याचा दिनक्रम,’ अशा विविध गोष्टींवर आधारित किशोरवयीन मुलांनी तयार केलेले कार्यक्रम बुधवारी (१५ ऑगस्ट) ‘रेडिओ एफटीआयआय’वरून प्रसारित केले जाणार आहेत.

चाकूचा धाक दाखवून सोनसाखळी लुटली

$
0
0
साधू वासवानी पुलावरून चाललेल्या पादचा-याशी भांडण करून चाकूच्या धाकाने गळ्यातील ५० हजार रुपयांची सोनसाखळी लुटल्याचा प्रकार घडला. गौरवसिंह राजसिंह खांडसिया (वय २६, रा. विश्रांतवाडी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

ठेकेदार तुपाशी; कर्मचारी उपाशी

$
0
0
महापालिकेच्या वतीने चालविण्यासाठी देण्यात आलेल्या अनेक नागरी सुविधा केंद्रांमधील( किऑस्क) ऑपरेटरना गेले तीन महिने पगार न मिळाल्याची तक्रार करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर या ऑपरेटर्सच्या हातात पगारासाठी महापालिकेकडून घेण्यात येणाऱ्या रकमेपैकी निम्माही पगार पडत नसल्याचीही धक्कादायक बाब समोर आली आहे.

‘इकॉलॉजिक’ देणार ‘इको फ्रेंडली’ गणेशमूर्ती

$
0
0
गणेशोत्सवादरम्यान होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांना ‘इको फ्रेंडली’ गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्याची मोहीम ‘इकॉलॉजिक’ संस्थेने हाती घेतली आहे. जास्तीत जास्त पुणेकरांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्याबरोबरबच पेण येथील पारंपरिक कलाकारांना प्रोत्साहन देण्याचाही निर्णय संस्थेने घेतला आहे.

एसटीच्या मिडी बस होणार यशवंती

$
0
0
ग्रामीण भागात धावणा-या एसटीच्या मिडी बस आता यशवंती या नावाने धावणार आहेत. एसटी महामंडळाकडून त्याचे नामकरण करण्यात आले असून लवकरच ताफ्यातील सर्व गाड्यांवर हे नाव झळकणार असल्याचे एसटी महामंडळाकडून कळवण्यात आले आहे.

महिला बचत गटांच्या नोंदणीला अखेर मुहूर्त

$
0
0
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत असलेल्या महिला बचत गटांच्या नोंदणीला पंधरा ऑगस्टनंतर सुरुवात करण्यात येणार असून, त्यासाठी या योजनेची माहिती असलेल्या एका महिलेची समन्वयक म्हणून तीन महिन्यांसाठी नियुक्ती करण्याचा निर्णय बोर्डाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

‘नॅशनल लॉ स्कूल’ : कुलगुरूंचे तळयात-मळ्यात

$
0
0
पुणे विद्यापीठात मंगळवारी उद्घाटन झालेल्या नव्या बिल्डिंगचा नॅशनल लॉ स्कूलशी काहीही संबंध नसल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी स्पष्ट केले. मात्र, काही दिवसांपूर्वीच ही बिल्डिंग लॉ स्कूलचीच असल्याचे विधान खुद्द कुलगुरूंनीच केले असल्याने ही बिल्डिंग नेमकी कोणाची असा संभ्रम आता विद्यापीठ वर्तुळात निर्माण झाला आहे.

खासगी विद्यापीठ आरक्षण : चेंडू आता सरकारच्या कोर्टात

$
0
0
खासगी विद्यापीठांच्या विधेयकावर माझा कोणताही आक्षेप नसून, त्याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. लवकरच हे विधेयक मंजूर होईल, अशी आशा पुणे विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी मंगळवारी व्यक्त केली.

नेट परीक्षा : आन्सर कीज वेबसाइटवर

$
0
0
यंदा प्रथमच पूर्णपणे वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये घेण्यात आलेल्या नेट (नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट) परीक्षेसाठीच्या आन्सर कीज यूजीसीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच या आन्सर कीजविषयी काही आक्षेप असल्यास हे आक्षेप नोंदविण्याची सोयही या वेबसाइटवर आता उपलब्ध करून देण्यात आली आहे.

धनकवडीत मनपाच्या शाळेत वर्ग ‘गळती’चा

$
0
0
भारती विद्यापीठ परिसरातील पुणे महापालिकेच्या शाळा क्र. १६२ च्या क्रीडांगणावरील तळ्याबरोबरच वर्गांमध्येही ‘गळती’चा वर्गच भरत आहे. शाळेच्या क्रीडांगणावरील तळ्याची बातमी ‘मटा’ने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर मनपाच्या प्रशासनाला जाग आली व शिक्षण मंडळाच्या काही अधिका-यांनी शाळेची पाहणी केली.

रस्ते विकास महामंडळाची ‘नजर’

$
0
0
टोलनाक्यांवरून किती वाहनांची ये-जा होते, याची माहिती संबंधित कंत्राटदार रस्ते विकास महामंडळाला कळवत असतो. इथून पुढल्या काळात हे चित्र बदलणार आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील चारही टोलनाक्यांवरून ये-जा करणा-या वाहनांचे सर्वेक्षण करण्यासाठी या ठिकाणी एटीसीसी मशिन्स बसवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

वारज्यात ३ दिवसांत २ घरफोड्या

$
0
0
वारजे परिसरात गेल्या तीन दिवसांमध्ये दोन घरफोड्यांमध्ये पावणेसहा लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. मोतीरामनगर येथील फ्लॅट आणि शरावती सोसायटीमधील बंगल्यात घरफोडी झाली आहे.

मल्टिप्लेक्समध्ये जागेवर, सिंगलस्क्रीनमधून बाहेर

$
0
0
मराठी चित्रपट निर्मात्यांसह शिवसेना आणि मनसेने दिलेल्या आंदोलनाच्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट टिकला आहे; परंतु काही सिंगलस्क्रीन थिएटरनी मात्र मराठीवर पडदा टाकला आहे.

मंडईतील वाहतूक कोंडीवर ‘चक्राकार’चा पर्याय

$
0
0
गजबजलेल्या मंडईतील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी चक्राकार वाहतुकीचा उपाय शोधला आहे. मंडई पोलिस चौकी ते शारदा कॉम्प्लेक्स आणि कै. विठोबा रामजी थोरात चौक ते जिलब्या मारुती चौक अशी चक्राकार वाहतूक करण्यात आली आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्रे सुरू करा

$
0
0
केंद्रीय आणि राज्यस्तरीय शासकीय सेवांमध्ये आदिवासी युवकांचे प्रमाण वाढविण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याची सूचना राज्यातील सर्व विद्यापीठांना करणार असल्याचे राज्यपाल के. शंकरनारायण यांनी सांगितले. यासाठी येत्या काही दिवसांतच आदिवासी विकासमंत्री आणि सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेण्यात येणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images