Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

१२ गंभीर पेशंटवर ‘१०८’ मुळे उपचार

$
0
0
अलका चौकात मिरवणूक पाहताना फिट्स आलेला १९ वर्षांचा युवक असो, की विजय टॉकीजजवळ अचानक छातीत दुखू लागलेला ६५ वर्षांचा ज्येष्ठ नागरिक... आरोग्य खात्याच्या १०८ ‘इमर्जन्सी’ मेडिकल सर्व्हिसच्या (इएमएस) डॉक्टरांनी दिलेल्या तातडीच्या उपचारांमुळे अशा १२ गंभीर पेशंटना ‘जीवदान’ मिळाले.

काश्मीरमध्ये सहाशे गलाई व्यावसायिक संकटात?

$
0
0
‘जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्या पुरामुळे सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, तासगाव, कडेगाव आणि सातारा जिल्ह्यातील माण परिसरातील पाचशे ते सहाशे गलाई व्यावसायिकांचा चार दिवसांपासून संपर्क झालेला नाही. त्यामुळे त्यांचे नातेवाइक चिंतेत आहेत.

टिळक रोडची मिरवणूक ‘डीजे’च्या वापरामुळे रेंगाळली

$
0
0
बावीस तास चाललेल्या मिरवणुकीच्या धांगडधिंग्याला पोलिसांनी घातलेल्या लगामामुळे टिळक रोडवरील गणपती विसर्जन मिरवणूक मंगळवारी दुपारी अडीच वाजता संपली.

मिरवणूक गणपतीची की डॉल्बीची?

$
0
0
पोलिसांचा अपुरा बंदोबस्त आणि प्रशासनाचे कसलेच नियंत्रण नसल्याचा फायदा घेत गणेश मंडळांनी कुमठेकर रोडला संध्याकाळनंतर ‘पार्टीफ्लोअर’चे स्वरूप आणले होते.

केळकर रस्ता दणाणला

$
0
0
विघ्नहर्ता लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी जाणाऱ्या गणेश मंडळांच्या ‘डॉल्बी’च्या आवाजाने केळकर रस्ता दणाणला. केळकर रस्त्यावरून विसर्जन मिरवणुकीस सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास प्रारंभ झाला.

कर्वे रोड झाला ‘डान्स फ्लोअर’

$
0
0
डॉल्बीचा दणदणाट... एलईडी दिव्यांचे प्रकाशझोत... बेभान होऊन नाचत असलेले कार्यकर्ते... ट्रॅक्टरवर चढून अंगविक्षेप करत असलेली तरुणाई... गणेश मंडळ कोणतेही असो ज्यांचा डीजे जास्त चांगला त्यांच्या तालात सहभागी होऊन मनसोक्त नाचत असलेली बघ्यांची गर्दी...

परदेशी विद्यार्थी यंदाही कमीच

$
0
0
गणेश विसर्जन मिरवणुकीला परदेशी विद्यार्थी आणि नागरिकांची उपस्थिती यंदा फारच कमी जाणवली. जोडून चार दिवस आलेल्या सुट्टीमुळे अनेक विद्यार्थी बाहेरगावी गेले होते, तर काहींनी सुरक्षेच्या कारणावरून हजेरी लावण्याचे टाळले.

या फुकट फौजदारांना आवरा

$
0
0
गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी ‘स्वयंसेवक’ म्हणून रस्त्यांवर उतरलेल्या पोलिस मित्रांच्या अरेरावी आणि उद्दामपणामुळे या ‘फुकट फौजदारांना आवरा’ म्हणण्याची वेळ यंदाच्या स्वयंसेवकांनी नागरिकांवर आणली.

प्रतीक्षा निवडणूक तारखेची, आचारसंहितेची!

$
0
0
गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेच्या तारखा जाहीर होणार आणि आचारसंहिता लागू होणार, ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान होणार आणि दिवाळीच्या आधी निकालही जाहीर होणार....

सेलिब्रेटी पथकाचेही थाटात वादन

$
0
0
विविध मानाच्या गणपतींपुढे एखाद्या चौकापुरतेच डौलात वादन करणारे ‘सेलिब्रेटी’ या वर्षी संपूर्ण मिरवणूक वाद्य वादन करत चालत गेले.

मूर्तींचे विसर्जन नदीपात्रातच

$
0
0
दहा दिवसांच्या गणेशोत्साच्या काळात शहरातील विविध भागात तब्बल तीन लाख ३८ हजार ४७४ गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. पर्यावरण संरक्षण आणि नदी संवर्धनासाठी विसर्जन हौदात मूर्ती विसर्जित करण्याचे आवाहन महापालिकेने केले होते.

आवाजाची पातळी ९६ डेसिबल्सवर

$
0
0
विसर्जन मिरवणुकीत आवाजावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी ढोल-ताशा पथके आणि डॉल्बीवर बंधने आणली, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ध्वनिप्रदूषणाची पातळी कमी करण्यात त्यांना काही प्रमाणात यश आले आहे.

साडेआठ तासांचा संथ प्रवास

$
0
0
ढोल-ताशांचा दणदणाट..., डॉल्बी सिस्टीमचा धडधडाट..., मोरया, मोरयाचा अखंड जयघोष अन् बाप्पाच्या निरोपासाठी अभूतपूर्व गर्दी... अशा उत्साही वातावरणात शहराच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला सोमवारी सकाळी प्रारंभ झाला.

दिवस २… पोलिसांची २ रुपे

$
0
0
एकीकडे बघ्याची भूमिका तर दुसरीकडे मंडळांना ढकलाढकली..., गणेशोत्सव मंडळांमध्ये पडलेले अंतर...आणि कोणत्या रस्त्यावरून किती मंडळांना सोडावयाचे, यावरून झालेला संभ्रम...

वनमजुरांकडून मयुरेश्वर अभयारण्याचा कारभार

$
0
0
पुणे जिल्ह्यातील अभयारण्यापैकी मयुरेश्वर हे एक अभयारण्य असून याचा समावेश चिंकारा जातीच्या हरणासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या अभयारण्याच्या सुरक्षेची जबाबदारी चक्क वनमजुरावर आहे. अधिकाऱ्याची वानवा असल्याने येथील पशुपक्ष्यांच्या शिकारीचा धोका निर्माण झाला आहे.

कसला शिक्षक दिन, कसले मोदींचे भाषण

$
0
0
वाटलूज गावातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी चक्क चौदा दिवसांपासून शाळेला दडी मारल्याने शिक्षकाविना शाळा असे चित्र निर्माण झाले आहे. सतत उशिरा येणाऱ्या मुख्याध्यापकांना गावकऱ्यांनी जाब विचारल्यावरून वाद झाल्याने आपल्या सहकारी शिक्षकांसह मुख्याध्यपकांनी शाळेकडे १४ दिवसांपासून पाठ फिरवली आहे.

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

$
0
0
पाणी तापविण्यासाठी लावलेला हीटर सुरू असताना बादलीत हात घातल्याने विजेचा झटका बसून एका तरुणाचा मृत्यू झाला. पिंपळे सौदागर येथे सकाळी ही घटना घडली.

इमारतीवरून उडी मारून सॉफ्टवेअर इंजिनीअरची आत्महत्या

$
0
0
राहत्या घराच्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून एका सॉफ्टवेअर इंजिनीअरने आत्महत्या केली. बुधवारी (१० सप्टेंबर) सकाळी राहुल सहकारी सोसायटी, एमआयडीसी भोसरी येथे ही घटना घडली.

अश्लील शेरेबाजी करणाऱ्या प्राध्यापकाने मागितली माफी

$
0
0
वर्गात शिकवताना अश्लील विषयाची माहिती देणाऱ्या प्राध्यापकांविरुद्ध विद्यार्थ्यांनी एकजूट दाखवून आंदोलन केल्यामुळे, आणि त्यांना राजकीय पदाधिकाऱ्यांचे पाठबळ मिळाल्यामुळे प्राध्यापकांना माफी मागावी लागली.चिंचवडच्या संघवी केशरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बुधवारी (१० सप्टेंबर) ही घटना घडली.

गुरूंना आव्हान ‘शिष्यां’चे

$
0
0
एकेकाळी गुरू असलेल्या राजकीय आधारवडांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न शिष्यांकडून होऊ लागला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडमधील राजकीय नवी पिढी अधिक आक्रमक होऊ लागल्याचे दिसून येत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images