Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मराठी भाषा धोरणाला आचारसंहितेपूर्वी मंजुरी?

$
0
0
मराठी भाषेच्या पुढील पंचवीस वर्षाचे धोरण तयार झाले आहे. हे धोरण मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आले असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या धामधुमीत त्याला आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजुरी मिळणार का हाच प्रश्न आहे.

टोमॅटो स्वस्त; मटार, फ्लॉवर, वांगी महाग

$
0
0
पावसाने उघडीप दिल्याने फळभाज्यांची आवक वाढली असल्याने दोडका, टोमॅटो स्वस्त झाले आहेत. मात्र मागणी वाढल्याने आणि काही प्रमाणात पालेभाज्या पावसात भिजल्याने शेतीमाल खराब झाला. परिणामी कोथिंबीर, मेथीसह फ्लॉवर, मटार, वांगी, सिमला मिरची, तोंडली महाग झाली आहे.

त्वरा करा....थोडेच दिवस शिल्लक

$
0
0
विधानसभा निवडणुकीची घोषणा येत्या दोन दिवसांमध्ये झाल्यास मतदार नोंदणी करण्यासाठी अवघ्या काही दिवसांचाच कालावधी मिळणार आहे. त्यामुळे विधानसभेसाठी मतदान करावयाचे असल्यास आता यादीत नावे नोंदविण्याची अखेरची संधी आहे.

ऑनलाइन खरेदीचा ट्रेंड वाढला

$
0
0
मॉलमध्ये फिरून खरेदी करण्यापेक्षा ‘ई-कॉमर्स’ वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन शॉपिंग करण्याचा ‘ट्रेंड’ अलिकडे वाढू लागला आहे. आठवड्याच्या कामाच्या दिवसात ऑनलाइन शॉपिंगचा टक्का वाढत आहे. ऑनलाइन शॉपिंगमधील निम्मी खरेदी ही मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांत होत आहे.

महापालिकेकडून दरमहा पैसे हवेत

$
0
0
पुणे महनगर परिवहन महामंडळाला (पीएमप‌ी) प्रत्येक महिन्याला दीड कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. दोन्ही महपालिकांनी हा तोटा भरून देण्याचे आदेश सरकारने दिल्याने महापालिका आपल्या हिश्याचे पैसे देतात.

नदी पात्रात ‘नो पार्किंग’

$
0
0
वेधशाळेच्या अंदाजानुसार सोमवारी (आज) शहरात आणि धरण क्षेत्रात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसाच्या अंदाजानुसार धरणांतून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याची शक्यता आहे.

यासीनला इजाझकडून घर

$
0
0
इंडियन मुजाहिदीन (आयएम) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या यासीन भटकळ याला पुण्यातील जर्मन बेकरीत स्फोट घडवण्यासाठी भारती विद्यापीठ परिसरात भाड्याचे घर मिळवून देण्यास इजाझ सईद अब्दुल कादर शेख (वय २७, रा. घोरपडी) यानेच मदत केल्याची माहिती तपासादरम्यान उघड झाली आहे.

'ते' पर्यटक सुरक्षित

$
0
0
‘राज्यातील एक हजारांहून अधिक पर्यटक काश्मीरमधील पुरात अडकून पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, हे सर्व जण सुरक्षित आहेत,’ असा निर्वाळा तेथील अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती ‘सरहद’चे प्रमुख संजय नहार यांनी रविवारी दिली.

वीजप्रश्नासाठी ५०० कोटी

$
0
0
देशात उद्भवलेल्या अभूतपूर्व वीजसंकटाचा परिणाम राज्यातील वीज पुरवठ्यावरही होत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत या संकटावर मात करण्यासाठी निधीची कमतरता भासू नये, यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी येथे दिली.

डेंगीने गर्भवती महिलेचा मृत्यू

$
0
0
डेंगीची लागण झालेल्या एका गर्भवती महिलेचा रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. जन्मलेले बाळ मात्र सुखरुप आहे. डेंगीने दगावलेल्या पेशंटची संख्या आतापर्यंत तीन झाली आहे. अश्विनी महेश डावखरे असे या मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.

‘तू माझा सांगाती’बाबत आक्षेप

$
0
0
सध्या ‘ई-टीव्ही’वर प्रसारित होत असलेल्या ‘तू माझा सांगाती’ मालिकेतील संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई यांच्या जीवन चरित्राशी संबंधित प्रसंग विसंगत आणि अवास्तव असल्याचा आक्षेप घेऊन देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानने या मालिकेचे पुढील भाग प्रसारित करू नयेत, अशी मागणी केली आहे.

महापालिकेचे नवे ‘कारभारी’ आज ठरणार

$
0
0
शहराच्या नवीन महापौरपदावर कोणाची वर्णी लागणार, याचा निर्णय आज, बुधवारी होणार असून, खडकवासला विधानसभा मतदारसंघाला झुकते माप मिळण्याची दाट शक्यता आहे. या मतदारसंघातून तीन नगरसेवक इच्छुक असून, त्यात दत्ता धनकवडे ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चिन्हे आहेत.

अखेर पगाराची ‘आकाशवाणी’ झाली

$
0
0
आकाशवाणीच्या पुणे केंद्रातील नैमित्तिक कर्मचाऱ्यांचे गेले पाच महिने रखडलेले वेतन-मानधन देण्यास अखेर मंगळवारी सुरुवात झाली. यासंदर्भात ‘मटा’ ने वृत्त प्रसिद्ध केले होते. आकाशवाणीच्या पुणे केंद्रातील शंभराहून अधिक नैमित्तिक कर्मचारी गेल्या पाच महिन्यांपासून वेतन-मानधनापासून वंचित होते.

पुण्यासह राज्यात पावसाचा जोर

$
0
0
गणेश विसर्जनाच्या दिवशी हलकेच बरसल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शहरात काही जोरदार सरी कोसळल्या. राज्यात मराठवाडा वगळता सर्वत्र मान्सून सक्रिय असल्याने पुण्यासह राज्यात पावसाचा जोर काहीसा वाढला आहे.

‘रुपी’तून स्वेच्छानिवृत्तीसाठी २७२ कर्मचाऱ्यांचे अर्ज

$
0
0
रुपी सहकारी बँकेतील २७२ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी बँकेकडे अर्ज दाखल केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर बँकेवरील आर्थिक ताण काहीसा हलका होणार असला तरी बँक आर्थिक गर्तेतून बाहेर येण्याची मात्र तूर्त कोणतीही चिन्हे नाहीत.

मिरवणुकीला उशीर आणि स्पीकरला बंदी

$
0
0
लष्कर भागातील विसर्जन मिरवणुकीला अंधार पडल्यानंतर उशिरा झालेली सुरुवात आणि रात्री बारा वाजता पोलिसांनी बंद केलेले स्पीकर यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे मंडळांनी स्वतःहून रात्री साडेबारा वाजता मिरवणुकीची सांगता केली.

‘भाईचंद’चे ठेवीदार आयुक्तांना भेटणार

$
0
0
कोट्यवधी रुपयांच्या बेनामी व्यवहारांमुळे चौकशीच्या फेऱ्यात सापडलेल्या भाईचंद हिराचंद मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेत अडकलेल्या ठेवी परत मिळाव्यात, या मागणीसाठी ठेवीदार संघटनेकडून पोलिस आयुक्त सतीश माथूर व खासदार अनिल शिरोळे यांची येत्या गुरुवारी (११ सप्टेंबर) भेट घेण्यात येणार आहे.

उपनगरातल्या मंडळांनी ‘टोलबंदी’ला टोलवले!

$
0
0
ध्वनीप्रदूषणाच्या कारणास्तव ढोलपथकांना टोल न वाजवण्याच्या पुणे पोलिसांनी केलेल्या नियमाला उपनगरातील पथकांनी टोलवले. उपनगरांतील मंडळाच्या मिरवणुकीतील वादनाला ढोलपथकांनी बिनधास्त टोलाचा वापर केला. दरम्यान, तीन पथकांचे टोल पोलिसांनी जप्त केले.

मिरवणुकीत २५० मोबाइल हँडसेटची चोरी

$
0
0
गणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले. सुमारे २५० मोबाईल हँडसेट चोरीस गेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. शहरातील विविध पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मिनी हॉस्पिटलही मदतीला

$
0
0
गणेश विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांसह गणेशभक्तांना होणारी दुखापत, रक्तदाब, साखर, चक्कर येणे, छातीत दुखणे, अंगदुखीसारख्या दुखण्याच्या १६२४ पेशंटवर मिनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी उपचार केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images