Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘मध्यस्थी’चा संवाद घटला

$
0
0
कुणाचा संसार तुटण्याच्या मार्गावर असताना पुन्हा जुळला..तर कोणाला आपण रागात भरात दाखल केलेल्या केसच्या परिणामाची जाणीव झाल्यामुळे सामोपचाराने केस मिटविली..अपघातग्रस्ताला तातडीने भरपाई मिळाली..आपली चूक उमजून दारूचे व्यसन सोडून कुणी आपली जबाबदारी पुन्हा स्वीकारली..

महायुतीविरोधात आठवले आक्रमक

$
0
0
‘विधानसभेच्या निवडणुकीत केवळ पाच-सहा जागांमध्ये आम्हाला गुंडाळण्याचा भाजप-सेनेचा विचार असेल, तर आम्हालाही महायुतीसोबत रहायचे की नाही, याबाबत विचार करावा लागेल,’ असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले यांनी शनिवारी दिला.

इजाझ शेखला अटक

$
0
0
‘इंडियन मुजाहिदीन’चा (आयएम) दहशतवादी मोहसीन चौधरीचा मेव्हणा इजाझ सईद अब्दुल कादर शेख (वय २७, रा. घोरपडी) याला दिल्ली पोलिसांनी शनिवारी रात्री उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथून अटक केली.

वीजप्रश्नाला राज्य जबाबदारः गोयल

$
0
0
राज्याचा वीजप्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे वेळच नसल्याचा आरोप केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियूष गोयल यांनी रविवारी केला. मंत्रिपद मिळाल्यापासून चव्हाण यांची भेट घेण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न चव्हाणांनीच अपयशी ठरविल्याची टीकाही त्यांनी केली.

भाषा आघाडीची; तयारी स्वबळाची

$
0
0
दोन्ही काँग्रेसच्या स्वतंत्र प्रचारसभा, एकीकडे ‘कदाचित’ एकत्र प्रचार करावा लागेल, असे शरद पवार यांचे भाकित, तर दुसरीकडे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचे काँग्रेसवर टीकास्त्र... काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे दोन्ही पक्षांचे राज्यभरातील कार्यकर्ते चक्रावून गेले आहेत.

आत्महत्या रोखण्यासाठी ‘कनेक्टिंग’ची हेल्पलाइन

$
0
0
नैराश्य आणि एकाकीपणा ही आत्महत्येची प्रमुख कारणे असून दरवर्षी आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढते आहे.

‘अल कायदा’चा निषेध

$
0
0
भारतामध्ये अल कायदा संघटनेचा शाखाविस्तार करत ‘जिहाद’ करण्याचा फुत्कार करणाऱ्या अल जवाहीर याच्या प्रक्षोभक वक्तव्याचा, पुणे शहरातील मुस्लिम बांधवांनी निषेध केला आहे. पोलिस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत हा निषेध नोंदवला आहे.

पालिकेच्या शिष्यवृत्तीला अत्यल्प प्रतिसाद

$
0
0
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी पालिकेने प्रथमच ऑनलाइन यंत्रणा राबवली असली, तरी त्याला पहिल्यावर्षी मिळालेला प्रतिसाद अत्यल्प आहे. आत्तापर्यंत पालिकेकडे दाखल झालेल्या सुमारे १२ हजार अर्जांपैकी जेमतेम एक हजार अर्जच ऑनलाइन स्वरूपात दाखल झाले आहेत.

विसर्जन मिरवणुकीनिमित्त पिंपरीत वाहतूकीत बदल

$
0
0
गणेश विसर्जनाच्या वेळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील काही वाहतूक मार्गांत सोमवारी (आठ सप्टेंबर) बदल करण्यात येणार आहेत, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. त्यासाठी पर्यायी मार्गही सुचविण्यात आले आहेत.

अभिजितच्या प्रयत्नांतून साकारला गणेशाच्या रूपनिर्मितीचा माहितीपट

$
0
0
विठ्ठल आणि गणपती ही मराठी माणसांच्या मनात रुजलेली दैवते. पुराणकथांमधून या देवांची चरित्रे सर्वांना माहिती असली; तरी दैवताच्या निर्मितीची नेमकी ऐतिहासिक आणि धार्मिक कारणे सहसा माहिती नसतात. या दैवतामागच्या पुरातत्वीय सत्याचे भान देणारी डॉक्युमेंटरी फिल्ममेकर अभिजित सौमित्र याने तयार केली आहे.

विसर्जन मिरवणुकीतही आरोग्य सेवा

$
0
0
‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जल्लोषात उद्या (सोमवार) गणरायाची विसर्जन मिरवणूक निघेल. मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेशभक्तांसह पोलिसांना आरोग्याच्या समस्या उद् भवल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी आता विविध संस्था संघटनांच्या आरोग्य सेवा सज्ज झाल्या आहेत.

सासवडमधील कचरा डेपो स्थलांतरित करण्याचा आदेश

$
0
0
सासवड शहरात असलेला उघड्यावरील कचरा डेपो त्वरित कुंभार वळण येथील नियोजित जागेत प्रक्रिया मशिनरीसह स्थलांतरित करावा आणि शहरातील सांडपाणी व मैलापाणी प्रक्रिया करून ‘डिच हाउस’ उभे करून त्याची विल्हेवाट ३१ मार्चपर्यंत लावावी, असा अंतरिम आदेश हरित लवादाने सासवड नगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले.

बाजार समितीला पूर्वीचा अधिकारी नको

$
0
0
प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सचिवपदावर पूर्वी काम केलेल्या अधिकाराची राज्य सरकारने नेमणूक करू नये, असा ठराव समितीच्या प्रशासकीय मंडळाने केला. ठरावामुळे पूर्वी प्रशासक म्हणून काम केलेल्या तसेच काही प्रकरणांची चौकशी सुरू असलेल्या एका अधिकाऱ्याला समितीत आणण्याच्या प्रयत्नांना आपोआपच ‘ब्रेक’ लागला आहे.

रस्त्यातच विक्रीमुळे वाहतूक कोंडी

$
0
0
मार्केट यार्डात रस्त्याच्या अगदी मधोमध शेतीमालाचे ट्रक, टेम्पो उभे करून भाजीपाल्याची सर्रासपणे विक्री केली जात असल्याने रविवारी पुन्हा वाहतुकीच्या कोंडीच्या त्रासाला पुन्हा सामोरे जावे लागले.

‘मॅग्मो’च्या डॉक्टरांचे निलंबन का नाही ?

$
0
0
महाराष्ट्रात डॉक्टरांनी केलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमां’तर्गत (आरबीएसके) डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र वैद्यकीय अधिकारी संघटनेचे (मॅग्मो) डॉक्टर संपावर गेल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई का केली नाही अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने आरोग्य खात्याला विचारणा करीत फटकारले.

सहायक पोलिस निरीक्षकासह कर्मचाऱ्याला अटक

$
0
0
खुनाच्या प्रयत्नात अटक असलेल्या आरोपीच्या जामीन अर्जावर, कोर्टात आरोपीच्या बाजूने सकारात्मक उत्तर देण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वडगाव निंबाळकर येथील सहायक पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी अटक केली.

कॅम्पस प्लेसमेंटमध्ये ‘अच्छे दिन’ची नांदी

$
0
0
विकासदर वाढल्याचे प्रतिबिंब ‘कॅम्पस प्लेसमेंट’मध्येही पडले असून, इंजिनीअरिंग कॉलेजांच्या कॅम्पसवर ‘अच्छे दिन’ची नांदी होत आहे.

नागरिकांच्या तक्रारींचा महापालिका ठेवणार ट्रॅक

$
0
0
महापालिकेच्या विविध विभागांबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारींची सद्यस्थिती पाहण्यासाठी प्रशासन नवीन सॉफ्टवेअर तयार करत आहे. यामुळे महापालिका आयुक्तांना एका क्लिकवर नागरिकांनी केलेल्या तक्रारीची सद्यस्थिती पाहून त्याचा आढावा घेता येणार आहे.

२ वेळा पाण्यासाठी काँग्रेसही आग्रही

$
0
0
शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे काठोकाठ भरून नदीत पाणी सोडून देण्याची वेळ आलेली असताना आता महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसनेही पुणेकरांना दोन वेळा पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. सर्वसामान्य पुणेकर आणि कष्टकरी वर्गासाठी दोनवेळा पाणीपुरवठा आवश्यक आहे, असे पक्षाने म्हटले आहे.

ग्रंथालयाने सुरू केले स्वायत्त विद्यापीठ

$
0
0
बदलापूरच्या ग्रंथसखा वाचनालयातर्फे मराठी भाषा, इतिहास आणि संस्कृती संवर्धनासाठी स्वायत्त विद्यापीठ सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांची या विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड करण्यात आली असून, जानेवारीपासून विद्यापीठातील साहित्य अभ्यासकांना खुले करण्यात येणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images