Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

स्केटिंग रिंगला नातेवाइकांचे नाव नाही

$
0
0
विमानतळ येथे महापालिकेने उभारलेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंगला नातेवाईकांची नावे देण्यावरून उद‍्भवलेल्या वादाविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी स्थानिक नगरसेवकांची कानउघाडणी केली.

कासारवाडी येथील अपघातात ४ तरुणी गंभीर जखमी

$
0
0
पुणे-मुंबई महामार्गावर कासारवाडी येथे कॉल सेंटरच्या कॅबचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात चार तरुणी गंभीर जखमी झाल्या. ही घटना शुक्रवारी (पाच सप्टेंबर) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

शंभर टक्के धरणे भरूनही पाणी मात्र एक वेळ

$
0
0
महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे धरणे शंभर टक्के भरलेली असतानाही पुणेकरांच्या नशिबी एक वेळ पाणी घेण्याची वेळ आली आहे.

मारणे टोळीला गृहमंत्र्यांचे ‘संरक्षण’

$
0
0
कुख्यात गुन्हेगार गजानन मारणे टोळीतील दहा गुन्हेगारांवर करण्यात आलेल्या तडीपारीच्या कारवाईला गृह मंत्रालयाने स्थगिती दिली आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या अधिकारात सहसचिवांनी ही स्थगिती दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही माया दाखवण्यात आली आहे.

उत्सवात ८ दिवस पाऊस कायम

$
0
0
बाप्पांच्या आगमनापासून सुरू झालेल्या पावसाने शहर आणि परिसरात सलग आठव्या दिवशी हजेरी कायम ठेवली असून, पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी दिवसभर पडत होत्या. रात्री साडेआठपर्यंत ८.८ मिमी पावसाची नोंद झाली.

‘रुपी’तून VRS साठी २५० अर्ज

$
0
0
आर्थिक बोजा कमी करण्यासाठी रुपी सहकारी बँकेने लागू केलेल्या स्वेच्छानिवृत्ती योजनेला बँकेतील साडे आठशे पैकी सुमारे २५० कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. बँकेच्या पुण्याबाहेरील वीस शाखांमधील स्वेच्छानिवृत्ती अर्जांची संख्या अद्याप स्पष्ट झाली नसल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

ई-खरेदीत मोबाइल ‘फेव्हरेट’

$
0
0
एका क्लिकद्वारे चुटकीसरशी होणारी खरेदी, भरपूर पर्यायांमधून निवड करण्याची मुभा आणि फ्री होम डिलिव्हरीमुळे देशातील ‘ई-कॉमर्स’ बाजारपेठ वेगाने विस्तारत आहे. तसेच, ‘ई-कॉमर्स’च्या माध्यमातून होणाऱ्या विक्रीपैकी २० ते २५ टक्के विक्री ही मोबाइल आणि टॅब्लेट्सच्या माध्यमातून होत आहे, अशी माहिती ‘असोचॅम’ ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.

‘खडकवासल्या’तून पाणी सोडणार

$
0
0
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांतील पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे. पानशेत धरण भरल्याने विद्युतनिर्मितीसाठी सहाशे क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून खडकवासला धरणातून शनिवारी सकाळी मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.

‘एकला चलो’चा अजितदादांचा नारा

$
0
0
‘विधानसभेसाठी काँग्रेसकडे १४४ जागांची मागणी करण्यात आलेली आहे. मात्र, काँग्रेसकडून त्याला नकार येत असल्याने सध्या चर्चा थांबली आहे. लवकरच यावर अंतिम निर्णय होईल. आवश्यक त्या जागा न मिळाल्यास आगामी निवडणूक स्वतंत्र लढावी लागेल.

विसर्जन घाटांवर तयारी

$
0
0
गणेशोत्सव विसर्जनासाठीची आवश्यक असलेली असलेली सर्व तयारी महापालिकेच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहे.

डेंगीने शहरात घेतला दुसरा बळी

$
0
0
शहरात डेंगीचा विळखा दिवसेनदिवस वाढत असून डेंगीची साथ रोखण्यास महापालिका अपयशी ठरून असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. डेंगीच्या आजाराने गुरुवारी शहरात ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. डेंगींच्या आजाराने गेलेला शहरातील हा दुसरा बळी आहे.

इजाझ झाला होता पुण्यातून गायब

$
0
0
दिल्ली पोलिसांनी अटक केलेला इंडियन मुजाहिदीनचा (आयएम) संशयित दहशतवादी इजाझ सईद अब्दुल कादर शेख (वय २७, रा. घोरपडी) हा पुण्यातून १५ फेब्रुवारी रोजी गायब झाला होता. त्याच्या पालकांनी तो बेंगळुरू येथे नोकरीच्या मुलाखतीस जात असल्याचे सांगून गायब झाल्याचे पोलिसांना सांगितले होते.

महिलेचा अपघाती मृत्यू

$
0
0
भरधाव वेगाने जात असलेल्या टेम्पोने दुचाकीला जोरात धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. मार्केट यार्ड येथील गगनविहार चौक येथे शुक्रवारी ही घटना घडली. या घटनेत स्नेहल दिलीप करावडे (५०, रा. हडपसर) यांचा मृत्यू झाला.

रस्त्यांवर गर्दीचा महापूर

$
0
0
गौरी आणि सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन... पावसाने घेतलेली विश्रांती... आणि गणेशोत्सवातील अखेरचा शनिवार...असा तिहेरी योग जुळून आला आणि शहरातील रस्त्यांवर शनिवारी गर्दीचा महापूर लोटला. प्रचंड गर्दीमुळे शहरातून शनिवारी चालणेही अवघड झाले होते.

ट्रकखाली सापडून मुलाचा मृत्यू

$
0
0
हडपसर येथील मगरपट्टा सिटी लेबर कॅम्प येथे एका ट्रकच्या चाकाखाली सापडल्यामुळे तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

मालाची निर्मिती करण्यासाठी हवी चीनकडून गुंतवणूक

$
0
0
चीनने भारतात मालाची निर्यात करण्याऐवजी मालाची निर्मिती करण्यासाठी भारतात प्रत्यक्ष गुंतवणूक करावी, अशी मागणी चीनकडे केली जाणार आहे. त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी दिली.

शास्त्रज्ञ होण्यासाठी तर प्रश्न पडायला हवेत

$
0
0
तुम्हाला शास्त्रज्ञ का व्हावसे वाटले, तुम्ही केलेल्या संशोधनातील सर्वाधिक आवडलेला शोध कोणता इथेपासून ते सध्याच्या अंतराळ विश्वाशी निगडीत संशोधनापर्यंतचे अनेक प्रश्न चिमुकल्यांनी मोकळेपणाने विचारले अन् नकळत डॉ. जयंत नारळीकर यांच्याबरोबर गप्पांची मैफल रंगत केली.

‘यशवंतराव चव्हाण’ होणार मल्टिथिएटर

$
0
0
प्रभागातील मतदारांना खूश करण्यासाठी माननीयांनी पालिकेचे बजेट रिते करण्याचा सपाटाच लावला असून, आता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या पार्किंगच्या जागेवरच आणखी एक ‘मिनी थिएटर’ उभारण्याचा घाट घालण्यात येत आहे.

धरणे भरली शंभर टक्के

$
0
0
गणरायाच्या आगमनामुळे पुण्यातील पाणीटंचाईचे विघ्न दूर झाले असून शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे शनिवारी शंभर टक्के भरली. खडकवासला धरणातून नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली.

हक्काचे पाणी न दिल्यास आंदोलन

$
0
0
‘शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे भरलेली असताना पुणेकरांना त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित का ठेवले जाते,’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुणेकरांना दोन वेळ पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना शनिवारी जाब विचारला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images