Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विद्युत रोषणाईवर भर

0
0
रास्ता पेठ, मंगळवार पेठ आणि सोमवार पेठ परिसरातील देखाव्यांमध्ये संगीताच्या तालावर विद्युत रोषणाई केलेल्या मंडळांची संख्या अधिक आहे. त्याखालोखाल प्लास्टिकच्या फुलांपासून सजावट करण्यात आली असून पौराणिक देखाव्यांची संख्याही लक्षणीय आहे.

मैत्रीचे नाते दृढ करणारा उत्सव

0
0
‘गणेशोत्सव हा आमच्यासाठी वर्षातला पहिला इव्हेंट असतो. होस्टेलवर आलेल्या सगळ्यांची त्यामुळे का होईना, एकमेकांशी ओळख होते, ती पुढे वाढते आणि त्याचेच मैत्रीमध्येही रुपांतर होते. त्यामुळे आमच्यासाठी गणेशोत्सव हा ‘अवर फ्रेंड गणेशा’चाच एक उत्सव असतो म्हणा...’

भाविक गणराज रंगी रंगले

0
0
बाप्पाच्या आकर्षक मूर्ती, मनमोहक सजावट, जनजागृतीपर संदेश, डोळ्याचे पारणे फेडणारी रोषणाई, तर कुठे साधी सजावट असे चित्र दक्षिण पुण्यातील गणेशोत्सव मंडळांमध्ये पाहायला मिळते. आकर्षक देखाव्यांबरोबरच जिवंत देखावे सादर करण्यावर प्रामुख्याने या भागांमध्ये भर दिला जात आहे.

‘एक्स्प्रेस वे’वर विचित्र अपघात

0
0
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर तीन वाहनांच्या विचित्र अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून, अपघातामुळे मुंबईला जाणारी वाहतूक तीन तास विस्कळीत झाली होती. हा अपघात गुरूवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास खोपोली एक्झिट जवळील उतारावरील वळणावर झाला.

माळीण पुनर्वसनाच्या कामाला प्रारंभ

0
0
आंबेगाव तालुक्यातील डोंगराखाली दबलेल्या माळीण गावच्या पुनर्वसनासाठी लागणारी सहा ते आठ एकर जमीन तातडीने संपादित करून पुनर्वसनाच्या कामाला गती देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरव राव यांनी गुरूवारी दिली.

कारखान्यांची धुराडी दिवाळीनंतरच

0
0
उसाचा गाळप हंगाम यंदा १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला, तरी दिवाळीनंतरच साखर कारखान्यांची धुराडी पेटतील असे चिन्ह आहे. यावर्षी ७७० लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल असा अंदाज आहे.

महापौरपद हवे समाविष्ट गावांमध्ये

0
0
महापालिका हद्दीतील समाविष्ट गावांमध्ये गेल्या १५ वर्षांहून अधिक काळात एकदाही महापौरपद देण्यात आले नसल्याने या वेळी समाविष्ट गावांना हा मान मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसमधून जोर धरू लागली आहे.

वैज्ञानिक देखाव्यांची परंपरा

0
0
आकर्षक देखावे पुण्यातील गणेशोत्सवाचे आकर्षण. त्यात सामाजिक, पौराणिक, राजकीय, मनोरंजनपर अशा विविध विषयांवर देखावे सादर करून, पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वेगळी परंपरा जपली आहे.

बाप्पाचरणी परदेशी वनस्पती!

0
0
गणपतीच्या पूजेसाठी लागणा-या एकवीस पत्री नेमक्या कोणत्या, या विषयी अजूनही पुरेशी माहिती नसल्याने बाप्पाला चक्क परदेशी वनस्पती अर्पण करण्याचा ‘भक्तिभाव’ दाखवला जात आहे. विक्रेत्यांच्या ‘कृपे’मुळे हाती पडलेल्या पत्रींमधून उंदीरमारी, सुबाभूळ, वेडीबाभूळ, शंकासुर अशा वनस्पती बाप्पाचरणी अर्पण झाल्या आहेत.

परतीचा मान्सून लांबणीवर

0
0
सर्वसाधारणपणे एक सप्टेंबरपासून मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो असे मानले जाते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात कोसळणाऱ्या पावसानं वेगळेच संकेत दिलेत. पुढील १५ दिवसांत देशाच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

माने ‘मॅट’कडे दाद मागणार

0
0
वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रमात विनापरवानगी सहभाग..., सरकारवर टीका..., लोकप्रतिनिधींशी गैरवर्तणूक...अशा ‘गंभीर’ कारणांचा शोध लावून पणन खात्यातील बड्या धेंडांवर कारवाई सुरू करणारे पणन संचालक सुभाष माने यांना निलंबित करण्यात आले आहे.

‘कॉफी टेबल बुक’ने उलगडला पुणे फेस्टिव्हलचा प्रवास

0
0
पुणे फेस्टिव्हलच्या २५ वर्षांचा प्रवास उलगडणाऱ्या ‘कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांच्या हस्ते झाले. पुणे फेस्टिव्हलची रौप्यमहोत्सवी चित्रमय झलक या पुस्तकातून उलगडणार आहे. टाइम्स ऑफ इंडिया पब्लिकेशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

फेस्टिव्हल की कौतुक सोहळा!

0
0
एरवी पुणे फेस्टिव्हलची चर्चा होते ती, तिथे सादर होणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि कलाकारांच्या उपस्थितीने. यंदाच्या पुणे फेस्टिव्हलमध्ये दबक्या आवाजात चर्चा रंगली ती उपस्थितांनी सुरेश कलमाडी यांच्यावर उधळलेल्या स्तुतीसुमनांची. हा पुणे फेस्टिव्हल आहे की कलमाडी यांच्यासाठी आयोजित कौतुक सोहळा याची कुजबुज उपस्थितांमध्ये होती.

पुणे फेस्टिव्हलचे जल्लोषात उद्‍घाटन

0
0
ढोल-ताशांचा गजर आणि सनईवादनाने झालेली सुरुवात, ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी आणि ईशा देओल यांनी सादर केलेली मनमोहक गणेशवंदना, ग्रेसी सिंगचं कृष्णस्तुतीपर नृत्य, गोव्यातले पारंपरिक नृत्य, सुपरबाईक रॅली आणि तारेतारकांच्या उपस्थितीने पुणे फेस्टिव्हलचे शुक्रवारी जल्लोषात उद्घाटन झाले.

चुकीच्या लोकांच्या हाती देश जाणे धोकादायक

0
0
‘देशाला पुढे नेण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे असून कोणावर कोणतीच सक्ती करता येत नसते. त्यामुळे चुकीच्या लोकांच्या हातात देश गेला तर आपला देश पुढे जाऊ शकणार नाही,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीचा उल्लेख न करता भाष्य केले.

...असा रंगला मोदी गुरुजींचा तास

0
0
वर्गात अंथरलेल्या सतरंज्यांवर दाटीवाटीने बसलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी... अंधाऱ्या हॉलमध्ये स्क्रीनवरचे चित्र अधिक सुस्पष्ट करण्यासाठी चाललेली शिक्षकांची धडपड पाहणारे लुकलुकणारे डोळे...

महापौरपदाच्या इच्छुकांच्या सर्वांसमोरच मुलाखती

0
0
महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांची शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओळख परेड घेतली. महापौरपद तुम्हालाच का द्यावे, हे पद मिळाल्यास तुमचे प्राधान्य कोणते राहील, असे प्रश्न उपस्थित करत पवार यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.

धक्का देणाऱ्या महिलेनेच चोरली पर्स

0
0
दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या महिलेच्या दानपेटीत पैसे टाकण्यासाठी गेली असता पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आले. तातडीने तिने बंदोबस्तावरील पोलिसांकडे तक्रार केली. मंडपातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दर्शन रांगेत धक्का देणाऱ्या महिलेने ती चोरल्याचे उघडकीस आले.​

शहर परिसरातील ३० तरुण भेलकेच्या संपर्कात

0
0
पुणे शहरातील विविध झोपडपट्ट्या आणि परिसरातील ३० तरुण संशयित नक्षलवादी अरुण भेलकेच्या संपर्कात असल्याचे दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात उघड झाले आहे. ‘एटीएस’ला भेलकेच्या घरात या तरुणांची यादी मिळाली असून त्यांच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे.

म्हसे, निंबाळकरांसह ११ अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
0
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, पुणे गृहनिर्माण मंडळाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, नोंदणी उपमहानिरीक्षक आर. एस. क्षिरसागर यांच्यासह अकरा अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images