Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अल्पसंख्याक आयोगाकडून पाहणी

$
0
0
पुण्यात जून महिन्यात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या तीन सदस्यांनी हडपसर येथील मोहसिन शेखचा खून झालेल्या घटनास्थळाची पाहणी करून माहिती घेतली.

समान नागरी कायदा समजून घेण्याची संधी

$
0
0
समान नागरी कायद्याविषयीचे भिन्न मतप्रवाह आणि भूमिका समजून घेण्यासाठी एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाने ३० ऑगस्ट रोजी चर्चासत्राचे आयोजन केले आहे. समान नागरी कायदा समजून घेण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

विवाह ‘बाजारातील’ लुबाडणूक

$
0
0
वाढत्या स्पर्धात्मक वातावरणामध्ये वाढलेल्या अपेक्षांमुळे लग्न ठरणे, ही एक ‘समस्या’ झाली आहे. पर्यायाने वधू-वर सूचक मंडळे, वेबसाइट्सची मदत घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. अशा परिस्थ‌ितीत या विवाहाच्या ‘बाजारात’ लुबाडणूक होत असल्याची तक्रार पालकवर्गाकडून केली जात आहे. त्यावरच आधारित हा कायदेशीर आढावा…

सर्व रिपब्लिकन पक्षांसमोर विलीनीकरणाचा पर्याय

$
0
0
रिपब्लिकन ऐक्य यापुढे होणार नसल्याने सर्व समविचारी रिपब्लिकन गटांनी आपापल्या पक्षांचे विलीनीकरण करून एकत्र येण्याचा प्रस्ताव ठेवला असल्याचे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांना समजणार उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा

$
0
0
इंजिनीअरिंगचे विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांकडून औद्योगिक क्षेत्राच्या असणाऱ्या अपेक्षा जाणून घेण्यासोबतच दोन्ही क्षेत्रांमधील दरी दूर करण्यासाठी पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये (पीसीसीओई) शनिवारी (३० ऑगस्ट) राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

ढोल-ताशा ‘व्हरायटी’

$
0
0
वादनातील एकसुरीपणा घालवण्यासाठी ढोल-ताशा पथकांकडून यंदा सादरीकरणात विविधता आणली जाणार आहे. ढोल-ताशांबरोबरच झांजा, घंटा आणि घुंगरूंचा नादही आता बाप्पाच्या सेवेत रुजू केला जाईल.

व्हायोलिन वादनातून स्वरांजली

$
0
0
उपाध्ये व्हायोलिन विद्यालयातर्फे ज्येष्ठ योगाचार्य अय्यंगार गुरुजींना व्हायोलिन वादनातून स्वरांजली अर्पण करण्यात आली. नव्या पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात हा कार्यक्रम झाला.

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले विद्येचे दैवत

$
0
0
मातीच्या गोळ्याला हलक्या हाताने दिला जाणारा आकार.. त्यातून आकार घेणारे बाप्पा.. मूर्ती घडताना पाहण्यात रमलेले बालगोपाळ आणि पर्यावरण संवर्धन करण्याचा केलेला संकल्प...

स्थायीचे अध्यक्षही विधानसभेसाठी इच्छुक

$
0
0
‘गेल्या पंचवीस वर्षांपासून मी पालिकेचा सदस्य म्हणून निवडून येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मला उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुक आहे,’ असे स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी म्हटले आहे. पूर्व पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

निर्माल्य संकलन अभियान

$
0
0
गणेशोत्सवादरम्यान होणारे जलप्रदूषण कमी करण्यासाठी ‘एन्व्हायर्न्मेंटल क्लब ऑफ इंडिया’तर्फे निर्माल्य संकलन अभियान राबवण्यात येणार आहे. संस्थेचे कार्यकर्ते उत्सवाच्या दहा दिवसांत प्रत्येक मंडळाकडून टेम्पोमध्ये निर्माल्य संकलित करणार आहेत.

युवा छायाचित्रकारांसाठी स्पर्धा

$
0
0
‘‘एमएसडी अॅग्रो प्रॉडक्ट्स अँड बेव्हरेजेस कंपनी’ आणि पुणे गणेश फेस्टिव्हल या वेबसाइटतर्फे ‘बाप्पाचा अल्बम २०१४’ ही गणेशोत्सव छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरुण उत्साही छायाचित्रकारांना प्रोत्साहन देणे आणि गणेशोत्सवातील विविध पैलू उलगडणाऱ्या छायाचित्रांचे संग्रह करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयूर धावडे आणि स्वप्नील नहार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गजानन मंडळ साकारणार बनारस घाट, महाकाली मंदिर

$
0
0
सामाजिक समस्यांविषयी सातत्याने जागृती करणाऱ्या श्री गजानन मंडळातर्फे यंदा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त गंगा नदीच्या किनाऱ्यावरील बनारस घाट आणि कोलकाता येथील महाकाली मंदिराची प्रतिकृती सादर करण्यात येणार आहे.

पुणे फेस्टिव्हलमध्ये यंदा क्रीडा स्पर्धाही

$
0
0
मनोरंजनाच्या कार्यक्रमांबरोबरच पुणे फेस्टिव्हलमध्ये यंदा विविध क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये गोल्फ टुर्नामेंट, महिलांचे बॉक्सिंग आणि रोलबॉल अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे.

गणेशोत्सवादरम्यान वाहतुकीत बदल

$
0
0
गणेशोत्सवाच्या काळात शिवाजी रोडवर बुधवार चौकातून पुढे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत उत्सवातील पहिल्या आठवड्यात दिवसा छोट्या वाहनांना स्वारगेटकडे जाण्यासाठी एक लेन खुली ठेवण्यात येत होती.

पर्यावरणपूरक सजावट साहित्य

$
0
0
पर्यावरणपूरक सजावटीचा प्रसार करण्यासाठी शाश्वत इको सोल्युशन फाउंडेशन आणि कमिन्स इंडिया यांच्यातर्फे कागदाच्या लगद्यापासून अर्थात ‘कोरोगेटेड’ मटेरियलचा वापर करून सजावटीचे साहित्य तयार करण्यात आले आहे.

भाजप अल्पसंख्याक आघाडी अध्यक्षपदी इम्रान मुजावर

$
0
0
भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर अल्पसंख्याक आघाडीच्या अध्यक्षपदी इम्रान मुजावर यांची नुकतीच निवड करण्यात आली. शहराध्यक्ष खासदार अनिल शिरोळे यांनी मुजावर यांना नियुक्तीचे पत्र दिले.

विठ्ठलवाडी-वारजे रस्त्याला निकालाची प्रतीक्षा

$
0
0
विठ्ठलवाडी-वारजे रस्त्याबाबत हरित लवादासमोर (एनजीटी) सुरू असलेली सुनावणी बुधवारी पूर्ण झाली असली, तरी कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे सिंहगड रोडवासीयांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या या रस्त्याचे भवितव्य अद्याप अंधारातच आहे.

गणपतीचे फोटो शेअर करण्यासाठी वेबसाइट

$
0
0
आपल्या घरच्या किंवा मंडळाच्या गणपतीचे जगभर ऑनलाइन दर्शन घडविण्यासाठी ओएमसीव्ही सर्व्हिसेसतर्फे वेबसाइटची निर्मिती करण्यात आली आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून घरगुती अथवा मंडळाच्या गणपतीचे फोटो, व्हिडिओ, माहिती, इतिहास आदी तपशील शेअर करता येऊ शकतो.

अल्पसंख्याक आयोगाकडून दंगलग्रस्त भागाची पाहणी

$
0
0
शहरात जून महिन्यात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या तीन सदस्यांनी हडपसर येथील मोसीन शेखचा खून झालेल्या घटनास्थळाची पाहणी करून माहिती घेतली.

गणरायांच्या स्वागताला वरुणराजाही उत्सुक

$
0
0
शहर आणि परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे गणरायांची मूर्ती घरी आणताना पुणेकरांची धांदल उडाली. राज्यात मान्सून सक्रिय असून, पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images