Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अडिवरेचे आरोग्य केंद्र होणार अद्ययावत

$
0
0
आंबेगाव तालुक्यातील अडिवरे गावात असलेले जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत होणार आहे. परिषदेतर्फे या केंद्रात अत्याधुनिक सोयी-सुविधा पुरविल्या जाणार असून याकामी जनसहभागातूनही उपयुक्त साहित्य उपलब्ध झाले आहे.

पुणे फेस्टिव्हलमध्ये मराठी कार्यक्रमांची मेजवानी

$
0
0
यंदाच्या पुणे फेस्टिव्हलमध्ये मराठी नाटके, कवी संमेनलन, महाराष्ट्राची लोककला, कॉमेडी शो, लावणी महोत्सव, वसंतबहार गीतरजनी, हास्योत्सव एकपात्री यासारख्या विविध मराठी कार्यक्रमांचीच मेजवानी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकवर्गणीतून साकारणार टिळकांचा पुतळा

$
0
0
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये लोकवर्गणीमधून लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारण्यासाठी लोकमान्य टिळक प्रतिमा संकल्प मोहीम सुरू करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक विचारमंचातर्फे या मोहिमेची बुधवारी पुण्यात घोषणा करण्यात आली.

दगडूशेठ ट्रस्ट साकारणार वेरूळ लेण्यातील कैलास मंदिर

$
0
0
पुणेकरांसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ गणपती यंदा वेरूळ लेण्यातील कैलास मंदिरात विराजमान होणार आहे. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे उभारण्यात येत असलेल्या तब्बल ९२ फूट उंच आणि तब्बल सात मजल्यांच्या रेखीव कैलास मंदिराच्या प्रतिकृतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

सिमकार्डचा गैरवापर; २ जणांना अटक

$
0
0
दुसऱ्याच्या कागदपत्रांवरचे युनिनॉर कंपनीचे सिमकार्ड अपरोक्षपणे वापरल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना २९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुलाखतींच्या निमित्ताने दोन्ही काँग्रेस आखाड्यात

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाला उत्तर म्हणून काँग्रेसने अखेर राष्ट्रवादीच्या कोट्यातील ११४ मतदारसंघांमधील मुलाखतींचा कार्यक्रम बुधवारी जाहीर केला. येत्या सोमवारी (३१ ऑगस्ट) मुंबईत या मुलाखती घेण्यात येणार आहे.

‘पुरुषोत्तम’च्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर

$
0
0
कॉलेजियन्सचा नाट्यजागर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल बुधवारी रात्री जाहीर झाला. गेल्या वर्षीच्या ‘एमआयटी’सह सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, अभिनव आर्ट्स कॉलेज, गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

एक चोरी करून दुसरी करताना चोरटा जाळ्यात

$
0
0
नाना पेठेतील पेन्शनरवाला कॉम्प्लेक्समध्ये घरफोडी करणारा गुन्हेगार स्थानिकांच्या जाळ्यात अलगद सापडला. एका फ्लॅटमध्ये चोरी केल्यानंतर दुसरा फ्लॅट फोडण्याच्या प्रयत्नात असताना एका चाणाक्ष महिलेमुळे या आरोपीला अटक करण्यात आली.

घरफोडी करणारे ५ जण गजाआड

$
0
0
गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने घरफोडी करणाऱ्या पाच गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीचे ४६ लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या आरोपींनी गेल्या वर्षभरात घरफोडीचे ७५ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील १९ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत त्यांनी घरफोड्या केल्या आहेत.

स्वरूपानंदांना कुंभमेळ्यात येऊ देणार नाहीः गोविंददेव गिरीजी

$
0
0
द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या वक्तव्यामागील ‘बोलवता धनी’ वेगळाच असून, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांनी साईबाबांना गुरू किंवा देव मानता येणार नसल्याचे म्हटले आहे.

‘एनए’साठी पूर्वपरवानगीची अट रद्द करण्याचा आदेश

$
0
0
विकास आराखडा तयार असलेल्या महापालिका आणि नगरपालिकांच्या हद्दीत जमिनींच्या बिगरशेतीसाठी (एनए) पूर्वपरवानगी काढून टाकण्याच्या निर्णयाचा आदेश बुधवारी राज्य सरकारने प्रसिद्ध केला. त्यामुळे या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली.

‘एक्स्प्रेस वे’वर ४ रेस्क्यू व्हॅन

$
0
0
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात झाल्यानंतर मोटारींमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यासाठी चार रेस्क्यू वाहने तैनात करण्यात येणार आहेत. या रेस्क्यू वाहनांमुळे अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळणे शक्य होणार आहे.

अतिगर्दीमुळे कासचे ‘महाबळेश्वर’ होण्याचा धोका

$
0
0
जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर आता कास पठाराचे अतिगर्दीने ‘महाबळेश्वर’ होण्याचा धोका उभा ठाकला आहे. आतापर्यंत बोडक्या वाटणाऱ्या पठाराच्या घाट रस्त्यावरील मोकळ्या जागा हॉटेल चालकांच्या नजरेत भरल्या असून खासगी जागांवर मालकी हक्कांची कुंपणेही दिसायला लागली आहेत.

गुन्हेगार बाबा बोडके उमेदवारीसाठी ‘मातोश्री’वर

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही वर्षांपूर्वी वादग्रस्त प्रवेश केलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार बाबा बोडके याने भोर-वेल्हा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारीसाठी बुधवारी मुंबईत ‘मातोश्री’वर मुलाखत दिली. बोडके याच्यावर खुनासह विविध गुन्हे दाखल आहेत.

आता थर्माकोलचा होणार पुनर्वापर

$
0
0
गणेशोत्सवात सजावटीसाठी थर्माकोलचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. उत्सव संपल्यानंतर थर्माकोलची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्याने प्रदूषण होते. ते टाळण्यासाठी पूर्णम् इकोव्हिजन ही संस्था आणि ज्ञानदा प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने थर्माकोल संकलन मोहीम हाती घेण्यात आली आहे.

इच्छुक चालती ‘मातोश्री’ची वाट

$
0
0
राजकारणाचे बदलते वारे लक्षात घेऊन शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढविण्यासाठी शहरातील इच्छुकांची बुधवारी झुंबड उडाली. दोन्ही शहरप्रमुख आणि नगरसेवकांसह काँग्रेस व राष्ट्रवादीतील इच्छुकांनीही ‘मातोश्री’ ची वाट धरली आहे.

आमचा परतीचा प्रवास सुरू

$
0
0
‘राजकारणात सध्या वेगळे वारे वाहत आहे, आमचाही परतीचा प्रवास सुरू झाला आहे. हा आमच्या सरकारचा शेवटचा महिना आहे ..!’ खुद्द राज्याचे पशुसंवर्धन मंत्री आणि काँग्रेस नेते अब्दुल सत्तार यांनीच बुधवारी पुण्यात एका कार्यक्रमात परतीची भाषा सुरू केल्याने उपस्थितांना धक्काच बसला.

मेट्रोचे सर्वाधिकार आयुक्तांनाच

$
0
0
मेट्रोचा संभाव्य वाढीव खर्च, सुधारित प्रकल्प अहवाल अशा सर्व बाबींविषयी निर्णय घेण्याचे अधिकार सर्वसाधारण सभेनेच पालिका आयुक्तांकडे दिले असताना, भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाकडून उपस्थित केले जाणारे मुद्दे खुसपटच असल्याचे स्पष्ट होत आहे.

‘बालभारती’ : संचालकांना घेराव

$
0
0
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) कार्यालयीन सचिव नीलिमा नाईक यांच्यावर सहकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप करत, मंडळातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी त्यांच्या बदलीसाठी संचालकांना घेराव घातला.

खडकवासल्यासाठी MNSमध्ये स्पर्धा

$
0
0
गेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) खाते उघडणाऱ्या खडकवासला मतदारसंघात आपल्याला संधी मिळावी, यासाठी पक्षाच्या नेत्यांमध्येच जोरदार स्पर्धा निर्माण झाली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images