Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वनसेवा पूर्वपरीक्षा वादाच्या भोवऱ्यात

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) नुकतीच घेण्यात आलेली वनसेवा पूर्वपरीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. केवळ एकाच माध्यमातून झालेली ही परीक्षा पुन्हा घेण्याची किंवा पूर्वपरीक्षेच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना उत्तीर्ण करण्याची नामुष्की आयोगावर ओढावण्याची शक्यता आहे.

‘परदेशी पर्यटकांसाठी भारतात ५ मेगा सर्किट’

$
0
0
‘परदेशी पर्यटकांसाठी भारतात पाच मेगा सर्किट विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या सर्किटच्या माध्यमातून या पर्यटकांना विशिष्ट परिसरातील जवळची सर्व पर्यटनस्थळे पाहण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत,’ अशी माहिती केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मंगळवारी दिली.

अखेर संपदा जोशी यांचा राजीनामा

$
0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक डॉ. संपदा जोशी यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी अवघ्या चोवीस तासांत राजीनामा मंजूर केला.

कचरा‘कोंडी’ गंभीर होणार?

$
0
0
शहरात निर्माण होणारा कचरा खाणींमध्ये शास्त्रीय पद्धतीने जिरवण्यास धायरी येथील ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. या भागात कचरा जिरवण्यास विरोध असल्याचा ठराव ग्रामस्थांनी केला आहे.

संजय काकडेंना ‘महायुती’चे आवतण

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात परिवर्तन घडवण्यासाठी खासदार संजय काकडे यांना ‘महायुती’च्या नेत्यांनी मंगळवारी आवतण दिले. ‘काकडे यांनी आता राजकारणात सक्रिय होऊन राज्याच्या परिवर्तनात आमच्यासोबत सहभाग दाखवावा,’ असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भाजपचे आता ‘कॅम्पस नेटवर्किंग’

$
0
0
लोकसभा निवडणुकीत तरुणाईने मोठ्या प्रमाणात ‘नमो मंत्र’ जपल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही तरुणाईचे मत आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या ‘युवा नेत्यां’नी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

‘पुणे मेट्रो’ : भाजपचा खोडा

$
0
0
‘पुणे मेट्रो’ला चार दिवसांत मान्यता देण्याचे जाहीर आश्वासन केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी नुकतेच दिले असताना, भाजपच्याच स्थानिक नेत्यांनी या प्रकल्पात त्रुटी असल्याचे तुणतुणे वाजविले आहे.

हिंदुराष्ट्र सेनेची मान्यता रद्द होणार?

$
0
0
हडपसर परिसरातील दंगलीत युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हिंदुराष्ट्र सेनेची मान्यता रद्द करण्याची शिफारस राज्य सरकारकडे करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यांनी सोमवारी दिली. या संघटनेची मान्यता रद्द करण्याची मागणी विविध संघटनांनी आयोगाकडे केली होती.

इंदापूर येथे लाचखोर तलाठी गजाआड

$
0
0
इंदापूर येथील लोणी देवकर गावच्या तलाठ्याला १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सातबाऱ्याव बिगर शेती जमिनीची नोंद करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती.

गोठ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सोलापूर बाजार येथील कामगार वसाहतीमागील सुमारे शंभर वर्षांहून अधिक जुना गोठा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर गोठ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बोर्डाच्या परिसरातील गोठे धोकादायक बनले असल्याने बोर्डाने गोठे स्थलांतरित किंवा दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भविष्यात थेट पाइपद्वारेच पाणी

$
0
0
पिंपरी-चिंचवडसाठी भविष्यात पाणीपुरवठा योजना राबविताना थेट पाइपद्वारेच राबविली जाईल, अशी स्पष्टोक्ती महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी केली आहे. शहराच्या २०४१ च्या लोकसंख्येचा विचार करता आंद्रा आणि भामाआसखेड धरणातून प्रतिदिन २६७ दशलक्ष लिटर पाण्याचा कोटा मंजूर झाला असून, या योजनेचे काम लवकरच हाती घेण्यात येईल, असेही जाधव यांनी सांगितले.

PMP ची ‘इलेक्शन एक्स्प्रेस’

$
0
0
सुमारे सव्वाशे कोटी रुपयांच्या तोट्याखाली आधीच दबलेल्या पीएमपीला त्यातून बाहेर काढण्याऐवजी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कंपनीवर खर्चाचा भार वाढविणारे अनेक निर्णय संचालक मंडळाने बुधवारी घेतले.

दागिने चोरीप्रकरणी एकाला कोठडी

$
0
0
फ्लॅटचे कुलूप तोडून चार लाख ७१ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला कोर्टाने एक सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सलीम अब्दुल शेख (४०, रा. महालमड्डी, ता. धारवाड, जि. कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे.

पालिका करणार साहित्यिकांचा सन्मान

$
0
0
मराठी भाषा समृद्ध करणाऱ्या सहा साहित्यिकांचा विशेष सन्मान करण्याचे पालिकेने निश्चित केले असून, यंदापासूनच हे पुरस्कार दिले जातील, असे महापौरांनी बुधवारी जाहीर केले.

पुण्यात घरांच्या मागणीत यंदा घट होण्याची शक्यता

$
0
0
पुण्यातील निवासी घरांच्या मागणीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ११ टक्के घट होण्याची शक्यता नाइट फ्रँक या कंपनीने वर्तवली आहे. घरांच्या किमतीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

पार्किंग नियमावलीचे विद्यार्थ्यांकडून स्वागत

$
0
0
कॉलेजमधील पार्किंगसाठी नियमावली करण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निर्णयाचे विद्यार्थी आणि कॉलेज प्रशासकांकडूनही स्वागत केले जात आहे. नियमावलीमध्ये विद्यार्थिभिमुख विचार होण्यासोबतच शहरातच नव्हे, तर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये सर्वत्र एकसमान धोरण राबवले जाण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

राजकारण ‘कॅरी ऑन’

$
0
0
इंजिनीअरिंगला नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी ‘कॅरी ऑन’च्या मागणीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोर सुरू केलेल्या आंदोलनाला आता राजकीय रंग चढू लागला आहे.

खेड : पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार

$
0
0
खेड तालुक्यातील कडाचीवाडी या गावात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे.

शिक्षणाचा अंकुर फुलविण्यासाठी ‘ध्रुव’ची धडपड

$
0
0
बालपणी योग्य संगत न लाभल्याने सुटलेला शिक्षणाचा हात.., स्वतःची शिकण्याची संधी हुकल्याने आलेली अवहेलना... आणि नव्या पिढीत शिक्षणाचा अंकुर फुलविण्यासाठी वाहिलेले जीवन... ही कहाणी आहे भोर तालुक्यातील डोंगरी भागातील टिटेघर गावातील ध्रुव प्रतिष्ठानच्या वाटचालीची.

‘आयटी’ सेल ही जिल्हा परिषदेची जमेची बाजू

$
0
0
जिल्हा परिषद स्तरावर नव्याने स्थापण्यात येणाऱ्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून उपलब्ध होणारे तंत्रकुशल कर्मचारी आणि अत्याधुनिक साधने ही जमेची बाजू ठरणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images