Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गरवारे कॉलेजला विजेतेपद

$
0
0
आबासाहेब गरवारे कॉलेजने पुणे शहर विभागाच्या आंतरमहाविद्यालयीने टेबल टेनिस स्पर्धेतील मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले.

कामगार पुरविणाऱ्या ठेकेदारांनी ला‌टला ‘मलिदा’

$
0
0
महापालिकेतील पाणीपुरवठा, आरोग्य, तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागात कामगार पुरविणाऱ्या ठेकेदारांना केंद्र सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार ‘स‌र्व्हिस टॅक्स’मध्ये (सेवा कर) सूट देण्यात आली आहे.

महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी

$
0
0
महापालिकेच्या महापौरपदाची मुदत पुढील महिन्यात संपत असल्याने महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, असे पत्र महापालिकेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे.

गणपतीची प्रतिष्ठापना करा ६ ते ११.५३ पर्यंत

$
0
0
लाडक्या गणरायाचा उत्सव आजपासून घराघरात जल्लोषात साजरा होणार आहे. आज गणपतीची प्रतिष्ठापना करताना सकाळी ६ ते ११.५३ पर्यंत करावी. या पूजेसाठी सुर्योदयापासून ६.४४ ते १० वाजेपर्यंतचा काळ प्रथम प्रहराचा म्हणून सर्वोत्तम मानावा, असे शारदा ज्ञानपीठम् चे संस्थापक पं. वसंतराव गाडगीळ यांनी सांगितले.

सर्वाधिक कचऱ्याच्या जागांचे दोन महिन्यांत परिवर्तन

$
0
0
शहराच्या बऱ्याच भागांत कचराकुंडी भरून कचरा रस्त्यावर पसरल्याचे दिसणारे नेहमीचे चित्र पुढील दोन महिन्यांमध्ये धूसर होण्याची शक्यता आहे. शहरात सर्वाधिक कचरा साठणाऱ्या जागांचा शोध घेऊन त्याचे परिवर्तन ‘शून्य कचरा’ योजनेत करण्याचे उद्दिष्ट नवनियुक्त आयुक्तांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले आहे.

राजकारण बाजूला ठेऊन मेट्रोचा पाठपुरावा करा

$
0
0
शहराची सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी मेट्रो प्रकल्प महत्वपूर्ण भूमिका बजाविणार आहे. पुणे मेट्रोची सर्व प्रक्रिया पूर्ण‍ झाली असून, केवळ केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाच्या अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव प्रलंबित आहे.

लाच स्वीकारणाऱ्या कारकुनाला अटक

$
0
0
दोन्ही पायांनी अपंग असणाऱ्या तरुणाकडून रेशन दुकानाच्या परवान्याबाबत आलेला तक्रारी अर्ज निकाली काढण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अन्नधान्य वितरण कार्यालयातील अव्वल कारकुनाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली.

डॉ. सबनीस यांची माघार

$
0
0
डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून गुरुवारी माघार घेतली. संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांना पाठिंबा देऊन त्यांनाच हे अध्यक्षपद मिळावे, या भूमिकेतून ही माघार घेत असल्याचे डॉ. सबनीस यांनी गुरुवारी जाहीर केले.

बाप्पा येणार वाजतगाजत...

$
0
0
बाप्पाच्या आगमनासाठी घरोघरी लगबग सुरू असतानाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह मानाच्या मंगलमूर्तींची आज मोठ्या दिमाखात प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक काढण्यात येणार आहे. मानाचे गणपती आणि प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या गणेशाची माध्यान्हीपर्यंत विविध मुहूर्तांवर प्रतिष्ठापना होणार आहे.

पोलिसांचे आज बॅण्ड संचलन

$
0
0
एरवी उत्सवावेळी शस्त्रधारी पोलिसांचे संचलन करत समाजात जरब निर्माण करणाऱ्या पोलिसांकडून एक आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘श्रीं’च्या प्रतिष्ठापनेप्रसंगी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पुणे पोलिसांकडून बेलबाग चौक ते अलका चौकादरम्यान पोलिस बॅण्ड, पाइप बॅण्डद्वारे संचलन करण्यात येणार आहे.

लष्करी संस्थाच्या सुरक्षेत वाढ

$
0
0
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लष्करातर्फे शहर आणि परिसरातील सर्व लष्करी संस्थांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. कुठलाही संभाव्य धोका निष्फळ ठरविण्यासाठी या संस्थांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

आले सच्चे ‘अच्छे दिन...’!

$
0
0
लोकसभा निवडणुकीपूर्वी गाजलेल्या एका गाण्याची आठवण झाली. ‘अच्छे दिन’ आले, येतील किंवा येणार नाहीत, माहिती नाही; पण पुढचे दहा दिवस तमाम गणेशभक्तांसाठी ‘अच्छे दिन’ ठरणार आहेत. त्यामुळेच सध्या सगळीकडे ‘हम गणेशजी को लानेवाले है, अच्छे दिन आनेवाले है...’ हीच भावना प्रत्येकाच्या मनात सध्या रुंजी घालत असेल.

पुण्यात 'इबोला'चा संशयित पेशंट

$
0
0
पुण्यात 'इबोला'चा संशयित पेशंट नायजेरियाहून आलेल्या विद्यार्थ्यावर 'नायडू'त उपचार म टा...

सिंहगड रोडवर दुचाकीस्वाराला लुटले

$
0
0
मोबाइलवर फोन आला म्हणून बोलण्यासाठी थांबलेल्या दुचाकीस्वार लायब्ररीयनला तिघा आरोपींनी लुटल्याचा प्रकार सिंहगडरोडवर बुधवारी रात्री घडला. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

विमा कंपनीला ग्राहक मंचाचा दणका

$
0
0
जुन्या आजारावरील उपचारांचा खर्च पॉलिसीनुसार देता येणार नाही, असे सांगून विम्याची रक्कम देण्यास नकार देणाऱ्या विमा कंपनीला ग्राहक मंचाने फटकारले आहे. विमा कंपनीने तक्रारदाराला ७१ हजार २९५ रुपये द्यावेत, असा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे.

स्थानिक, ‘बीपीएल’ नागरिकांनाच बिलांमध्ये सवलत

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येणाऱ्या कोणत्या रुग्णांना सवलती द्यायच्या, याबाबतची सुधारित नियमावली बोर्डाने तयार केली आहे.

इमारतींसाठी आग प्रतिबंधक उपकरणांची सक्ती

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील १५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींमध्ये आग प्रति​बंधक उपकरणे बसविण्याचा आदेश बोर्डाने दिला आहे. ही यंत्रणा न बसविणाऱ्या इमारतींच्या बिल्डर, सोसायटी किंवा घरमालकांना नोटिसा पाठविण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.

आर्थिक उलाढालीची माहिती बंधनकारक

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू झाल्यामुळे आता या परिसरातील व्यापाऱ्यांकडे बोर्डाने आर्थिक उलाढालीची माहिती मागितल्यास ती देण्याची त्यांच्यावर सक्ती असणार आहे. तसेच पुण्याहून माल खरेदी करून बोर्डाच्या हद्दीत जाणाऱ्या वाहनांची बोर्डाकडून तपासणी होणार आहे.

विसर्जन घाटांवरील तयारी पूर्ण

$
0
0
दीड दिवसांच्या गणरायाचे शनिवारी (३० ऑगस्ट) विसर्जन होणार असल्याने पालिकेने नदीलगतच्या घाटांवर; तसेच उपनगरांमध्ये विसर्जनाची सर्व तयारी पूर्ण केली आहे.

चोरीला गेलेला मुद्देमाल मूळ मालकांकडे

$
0
0
सोनसाखळी चोरी, घरफोडी, वाहन चोरी यांसारख्या १३१ गुन्ह्यांत चोरीस गेलेला सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल शिवाजीनगर मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात नागरिकांना परत करण्यात आला. गणेशोत्सवाला सुरुवात होत असतानाच हा मुद्देमाल परत करण्यात आल्याने तक्रारदारांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images