Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अनाधिकृत स्टॉलवरून औंधमध्ये हाणामारी

$
0
0
औंध परिसरातील स्नेहांकित पार्कजवळ युवकांच्या डोक्यात पहार टाकल्याने एक जण गंभीर जखमी झाला. यामुळे रस्त्यावरील अनाधिकृत स्टॉलचा विषय ऐरणीवर आला आहे. आंबेडकर पुतळ्याजवळ अनाधिकृत गणपती स्टॉलच्या भाड्यावरून वाद झाला होता.

एकवीरा देवीच्या मंदिरात नव्याने दर्शनरांगा

$
0
0
लोणावळ्याजवळील कार्ला-वेहरगाव येथील एकवीरा देवीच्या गडावर भाविकांना दर्शन व्यवस्थित घेता यावे यासाठी नव्याने दर्शनरांगा उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून हे काम येत्या नवरात्र उत्सवापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ४० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

मदतीचा वापर इस्रायलविरोधात

$
0
0
‘गाझा पट्टीवर नियंत्रण ठेवणारी हमास संघटना आखाती मित्र देश तसेच संयुक्त राष्ट्र संघटनेकडून मिळणाऱ्या मदतीचा वापर इस्रायलविरोधात लढण्यासाठी करत आहे. हमास संघटनेला पॅलेस्टाइन जनतेशी कोणतेही देणेघेणे नसून ती दहशतवादी संघटना आहे,’ असा आरोप इस्रायलचे मुंबईतील उप वाणिज्य प्रतिनिधी मातान झमीर यांनी नुकताच पुण्यात केला.

कचरा व्यवस्थापनाचाच ‘कचरा’

$
0
0
सुतारवाडी येथील घनकचरा व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेला शेडर मशीन प्लॅन्ट दुरुस्तीनंतरही अद्याप सुरू झालेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून ही यंत्रणा सुरूच नसल्याने वापराअभावी येथील मशीन देखील गंजली आहे. यामुळे व्यवस्थापनासाठीच्या साहित्याचाच कचरा झाल्याची बाब पहायला मिळत आहे.

मुलाला विष पाजून आईची आत्महत्या

$
0
0
सासू, जाऊ आणि नणंदांच्या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे विवाहितेने आपल्या दीड वर्षांच्या मुलाला विष पाजून खून केला; तसेच स्वतःही विषही घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार भारती विद्यापीठ परिसरात घडला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

परताव्याचा फक्त कांगावाच

$
0
0
गेल्या पंधरा वर्षांपासून केवळ आश्वासनांची बरसात करणाऱ्या राज्यातील आघाडी सरकारने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मूळ जमीनमालकांना साडेबारा टक्के परताव्याबाबत केवळ कांगावाच केला आहे.

३ अल्पवयीन मुलींच्या विनयभंगप्रकरणी कोठडी

$
0
0
चित्रकला स्पर्धेसाठी आलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अटक केलेल्या एकाला २७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

‘UPSC’ परीक्षेत कारचालकामुळे गोंधळ

$
0
0
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेदरम्यान पुण्यातील आपटे प्रशालेच्या परीक्षा केंद्राबाहेरील पार्किंगमध्ये चारचाकी वाहन लावण्यावरून वाहन चालक आणि प्रशासनामध्ये जोरदार वाद झाला.

माणिकबागेतील पाचशे घरे अंधारात

$
0
0
सिंहगड रोडवरील माणिकबाग परिसरात उच्च दाबाच्या भूमिगत वीज वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने सुमारे पाचशे घरे शनिवारी रात्री साडेदहा वाजल्यापासून अंधारात असून रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत वीज पुरवठा पूर्ववत झाला नव्हता.

उपनगरांना झोपडले…!

$
0
0
शहर आणि परिसराला, विशेषतः उपनगरांमध्ये रविवारी मुसळधार पाऊस झाला. दुपारी काही जोरदार सरी कोसळल्यानंतर सायंकाळी पावसाचा जोर अधिकच वाढला होता. सायंकाळी साडेपाच ते साडेनऊपर्यंत मध्यवर्ती भागात २१ मिलिमीटर तर पाषाण परिसरात ४३ मिमी पावसाची नोंद झाली.

‘पालिकेचा प्रस्ताव राज्याने नाकारावा’

$
0
0
महापालिकेने एलबीटीच्या दरात वाढ करण्याचा पाठविलेला प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर करु नये, अशी मागणी शहर काँग्रेसने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आहे. एस्कॉर्ट बंद झाल्याने पालिकेला होणारी तूट भरून काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने एलबीटीच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे.

विद्यापीठाविरोधात संघटना न्यायालयात दाद मागणार

$
0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उत्तरपत्रिकेची प्रत मिळवण्याक होणारी दिरंगाई, पुनर्मूल्यांकनासाठी आकारले जाणारे ७३० रुपये बेकायदेशीर असल्याचा आरोप करत त्या विरोधात विद्यार्थी संघटना ग्राहक न्यायालयात दाद मागणार आहेत.

सोने-चांदीवरील ‘एलबीटी’ वाढविण्याचा प्रस्ताव

$
0
0
जकात नाक्यांवरील एस्कॉर्ट रद्द झाल्याने पालिकेच्या उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी सोने, चांदीवरील स्थानिक संस्था कर (एलबीटी) वाढविण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. यामुळे महापालिका विरूद्ध शहरातील सराफ यांच्यातील वाद पुन्हा एकदा जोरदार पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित

$
0
0
मुसळधार पावसाने रविवारी सलग दुसऱ्या दिवशी पुणे आणि परिसराला झोडपले. वारजे, सिंहगड रोड, धानोरी गाव आणि हडपसर परिसरातील काही सोसायट्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये पाणी घुसले. कात्रज परिसरात सर्वाधिक ८०.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

रुपी बँकेवरील निर्बंधांना ३ महिने मुदतवाढ

$
0
0
अडचणीत आलेल्या रुपी बँकेवरील निर्बंधांना तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. दरम्यान, रुपी बँकेच्या विलीनीकरणासाठी बुलडाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने तयारी दर्शविली आहे.

‘वीकेंड चेनस्नॅचर’चा शहरात धुमाकूळ

$
0
0
पोलिसांनी सोनसाखळी हिसकावणाऱ्या चार टोळ्या गजाआड केल्यानंतरही ‘वीकेंड’ला गुन्हे करणाऱ्या टोळीने मात्र शहरात धुमाकूळ घातला आहे. या टोळीने शहरात शनिवारी सहा सोनसाखळ्या हिसकावत पाच लाख रुपयांचे दागिने हिसकावले आहेत.

‘अपंगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ उभारा’

$
0
0
अपंगांना प्रवर्गनिहाय प्रशिक्षण देण्यासाठी आणि संशोधनासाठी स्वतंत्र अपंग विद्यापीठ उभारण्याची आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी सोमवारी व्यक्त केले. प्रहार अंपग क्रांती आंदोलनातर्फे आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन वैद्य यांच्या हस्ते झाले.

भोरजवळ सौरऊर्जा पार्क

$
0
0
भोर तालुक्यातील केंजळ या ग्रामीण भागात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, विघ्नहर्ता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शाळेच्या १४ हजार चौरस फूट विस्तीर्ण प्रांगणात सुमारे ७० लाख रुपये खर्चून उभारलेल्या ‘विघ्नहर्ता ऊर्जा पार्क’ची दखल केवळ राज्यातच नव्हे तर देशपातळीवर सुद्धा निश्चित घेतली जाईल, असे मत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप कंद यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेसमुळे राजकारणी बदनाम

$
0
0
काँग्रेसने राजकारण्यांना बदनाम केल्याची टीका भाजपचे केंद्रीय सचिव श्याम जाजू यांनी रविवारी केली. महाराष्ट्र राज्य मातंग समाज संघटनेतर्फे देण्यात येणारे ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कारां’चे वितरण बालगंधर्व रंगमंदिर येथे जाजू यांच्या हस्ते करण्यात आले.

वारजे येथील सावकारावर गुन्हा

$
0
0
वारजे येथील एका महिलेला जादा दराने व्याजाने पैसे देऊन, तिला पैशांसाठी त्रास देणाऱ्या सावकाराविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ३० वर्षाच्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images