Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वाचनात आघाडी असली तरी राष्ट्रीय स्पर्धेत सरासरीपेक्षा मागेच

$
0
0
इयत्ता तिसरीच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींप्रमाणेच इयत्ता आठवीच्या पातळीवरही गणितामधील अडचणी राज्यातील विद्यार्थ्यांना सतावत असल्याचे समोर आले आहे.

‘नो पार्किंग’मधील ३५० वाहनांवर कारवाई

$
0
0
‘पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने चारचाकी वाहनांना जॅमर लावण्याची कारवाई तीव्र केली आहे. वाहतूक पोलिसांनी शनिवारी दिवसभरात ३५० वाहनांना जॅमर लावून कारवाई केली,’ अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.

जेटलींच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आंदोलन

$
0
0
संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीतील ‘निर्भया बलात्कार’प्रकरणी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ शहर काँग्रेसकडून शनिवारी धिक्कार आंदोलन करण्यात आले. टिळक रोडवर एसपी कॉलेजसमोर शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

पावसाची झुम्मड!

$
0
0
दिवसभर जाणवणाऱ्या उकाड्यानंतर शनिवारी सायंकाळी शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. तासभराहून अधिक काळ झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात काही ठिकाणी घरे-दुकानांमध्ये पाणी शिरले, तर ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली होती.

पुणे फेस्टिव्हलवर आचारसंहितेचे सावट

$
0
0
संगीत, नृत्य, नाट्य, कला, गायन, वादन, क्रीडा आणि संस्कृती अशा विविध कलांच्या आविष्काराची एकत्र सांगड घालणाऱ्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे उद्घाटन यंदा उत्सव सांगतेपूर्वी अवघे चार दिवस केले जाणार आहे.

माधुरी पुरंदरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार

$
0
0
लहान मुलांना भावेल अशा शब्दांत आणि त्यांना आकलन होईल अशा भाषेत, अनेक पुस्तकांद्वारे चिमुकल्यांशी संवाद साधणाऱ्या ज्येष्ठ लेखिका, चित्रकार माधुरी पुरंदरे यांना शनिवारी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला.

खासदार असतो, तर नागपूरपूर्वी पुण्यात मेट्रो

$
0
0
पुणे आणि नागपूर मेट्रोवरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुरू असलेल्या संघर्षात माजी खासदार सुरेश कलमाडी यांनीही नवी ठिणगी टाकली आहे. ‘मी खासदार असतो, तर पुण्याच्या मेट्रोचे भूमिपूजन नक्की नागपूरपूर्वी झाले असते,’ अशी टिप्पणी करून त्यांनी भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

अडकलेल्या यात्रेकरूंची सुटका

$
0
0
मुसळधार पाऊस...,डोंगर खचल्याने रस्ता बंद..., खराब हवामान... आणि अन्नाची टंचाई...निसर्ग कोपल्यामुळे अशा अवस्थेत नेपाळमध्ये अडकून पडलेल्या पुण्यातील चाळीस यात्रेकरूंची नुकतीच सुटका झाली आणि त्यांच्या आप्तांचा जीव भांड्यात पडला.

‘अन्यायकारक फीवाढ रद्द करा’

$
0
0
माईर्स एमआयटी शाळेतर्फे करण्यात आलेली अन्यायकारक फी वाढ रद्द करण्याची मागणी एमआयटी पालक संघातर्फे करण्यात आली आहे. २०११ साली पालकांसोबत केलेल्या करारानुसारच फी घेण्यात यावी, चार टप्प्यात फी भरण्याची सवलत मिळावी तसेच फी चेकच्या माध्यमातून स्वीकारली जावी, अशी मागणीही पालकांनी केली आहे.

ससून: मार्ड चे डॉक्टर संपावर

$
0
0
‘निवासी’ डॉक्टरच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी ससून हॉस्पिटलमधील तीनशे डॉक्टरांनी शनिवारी लाक्षणिक संप पुकारला. संपामुळे आरोग्य सेवेवर काही प्रमाणात परिणाम झाला. आज, रविवारपासून आरोग्य सेवा सुरळीत असणार आहे.

खंडणी मागणारे २ पत्रकार अटकेत

$
0
0
कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांना बदनामीची धमकी देऊन खंडणी घेणाऱ्या एका साप्ताहिकाच्या दोन पत्रकारांना पोलिसांनी अटक केली आहे. बळीराम येडबा ओहोळ (वय ३६) आणि संदीप शिवाजी भंडारी (वय ४२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

उपयोग शून्य; उपद्रव जास्त

$
0
0
केंद्र सरकारच्या ‘जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजने’तून (जेएनएनयूआरएम) गेल्या आठ वर्षांत शहरात तब्बल १७ प्रकल्प मंजूर झाले असले, तरी त्यातील नेमक्या किती प्रकल्पांचा लाभ प्रत्यक्ष नागरिकांना झाला, याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही.

शेतकऱ्यांनो, मार्केटिंगवर भर द्याः पवार

$
0
0
‘शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग करता येईल का, याचा विचार करण्याची गरज असून प्रत्यक्ष निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची आणि त्यादृष्टीने विचार करून कृती करण्याची आवश्यकता आहे,’ असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मांडले.

वारजे येथील सावकारावर गुन्हा

$
0
0
वारजे येथील एका महिलेला जादा दराने व्याजाने पैसे देऊन, तिला पैशांसाठी त्रास देणाऱ्या सावकाराविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटक पक्षांसाठी ‘नऊ’ची मात्रा

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपाबाबत अधिकृत काही सांगण्यात आले नसले, तरी भाजपला १३५ आणि शिवसेनेला १५३ जागा असे जागावाटप सध्या गृहित धरले जात आहे.

धर्म रक्षणाची मंदिरे टिकली पाहिजेत

$
0
0
‘आर्थिक निकषावर निर्माण झालेले वर्ग समाजासाठी जीवघेणे आहेत. त्यामुळे समतेची अनुभूती देणारी आणि धर्म व संस्कृतीचे रक्षण करणारी मंदिरे टिकली पाहिजेत,’ असे मत स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी शनिवारी व्यक्त केले.

वाढत्या भ्रष्टाचाराचा गरिबांवर परिणाम

$
0
0
‘भारतात भ्रष्टाचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वाढत्या भ्रष्टाचारामुळे अनेक क्षेत्रांत अपात्र व्यक्ती पुढे येत आहेत. त्याचा व्यवस्थेवर, सार्वजनिक धोरणांवर तसेच गोरगरिबांवर विपरीत परिणाम होत आहे,’ असे मत प्राप्तिकर विभागाचे महासंचालक उज्ज्वल चौधरी यांनी नुकतेच व्यक्त केले.

‘वैज्ञानिक माहिती दिल्यास दुर्घटना टाळणे शक्य’

$
0
0
भूस्खलन होण्यापूर्वी काही संकेत मिळत असतात. भूस्खलन होऊ शकते, अशा भागातील लोकांना या संकेतांविषयी वैज्ञानिक माहिती दिल्यास संभाव्य दुर्घटनांमध्ये होणारी हानी टाळली जावू शकते. लोकांपर्यंत ही वैज्ञानिक माहिती पोहचविली पाहिजे, असे मत मराठी विज्ञान परिषदेचे विनय र. र. यांनी मांडले.

स्वप्न आयएएस होण्याचे

$
0
0
‘मटा’मध्ये आलेली अंध कलेक्टरची बातमी मला माझ्या मित्रांनी वाचून दाखवली. मलाही तसंच व्हायचंय. त्यासाठीची तयारीही सुरू आहे, पण नव्या अभ्यासक्रमाच्या तयारीसाठीचे मटेरिअलच मिळत नाही. ते मिळाले, तर मीही एखादी पोस्ट निश्चितच मिळवू शकेन. सगळ्यांनीच साथ दिली, तर ‘आयएएस’ही होऊ शकेन...’ जिवाजी वाघमारे सांगत होता.

आवक वाढल्याने भाज्या स्वस्त

$
0
0
राज्याच्या बहुतांश भागात पावसाने उघडीप दिल्याने गुलटेकडी येथील मार्केट यार्डमध्ये भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली. सलग दुसऱ्या आठवड्यातही किरकोळ बाजारात वांगी आणि टोमॅटो वगळता अन्य फळभाज्यांचे दर सुमारे वीस टक्क्यांनी कमी झाले आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>