Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आता काँग्रेसची स्वबळाची भाषा

0
0
राष्ट्रवादीला दूर ठेवले, तर विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होईल, असा सूर पक्षात उमटला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने दिलेल्या स्वबळाच्या इशाऱ्यानंतर काँग्रेसमध्येही तशी चाचपणी सुरू झाली आहे. वेळ आली, तर १९९९ चा फॉर्म्युला वापरण्याचा पर्यायही पक्षवर्तुळात पुढे आल्याचे समजते.

आबांची शिवसेनेशी ‘सेटलमेंट’?

0
0
गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभेसाठी आपल्याविरोधात कमजोर उमेदवार उभा राहावा आणि लढत सोपी व्हावी, यासाठी शिवसेनेशी ‘सेटलमेंट’ केली असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

नाट्य संमेलन बेळगावीच होणार

0
0
सीमाप्रश्नाच्या ताज्या वादाच्या पार्श्वभूमीवर ९५वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन बेळगाव येथेच घेण्यावर मोहोर उमटविण्यात आली आहे. नाट्य परिषदेच्या नियामक समितीच्या सदस्यांनी बेळगावला जाऊन पाहणी केल्यानंतर त्याबाबतची अंतिम घोषणा केली जाईल.

पेट्रोल पंप चालकांचा बंद मागे

0
0
आज मध्यरात्रीपासून पुकारण्यात आलेला पेट्रोल पंप चालकांचा बंद स्थगित करण्यात आला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनने हा संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

'टेंडर न काढताच PMनी केले भूमिपूजन'

0
0
निविदा न काढता पंतप्रधानच भूमिपूजन करत आहेत. जनतेचा नेताच असे करतो तर मग आम्ही काय घोडे मारले आहे? केंद्रातील नव्या सरकारमुळे जनतेचे नुकसानच झाले आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

पार्किंगसाठी विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबणार

0
0
कॉलेजमधील पार्किंगच्या शुल्कापोटी विद्यार्थ्यांची केली जाणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी नियमावली बनविण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने सोमवारी घेतला. ही नियमावली सर्व कॉलेजांना बंधनकारक करण्यात येणार असून, त्या माध्यमातून पार्किंगच्या शुल्कापोटी चालणारी बेकायदेशीर पैसे वसुली थांबविली जाणार आहे.

‘सोशल इंजिनीअरिंग’चा बसपचा पुन्हा नारा

0
0
लोकसभा निवडणुकीत राज्यात सुमारे तेरा लाख मते मिळविणारा बहुजन समाज पक्ष (बसप) विधानसभा निवडणुकीसाठी ‘सोशल इंजिनीअरिंग’चा प्रयोग पुन्हा एकदा राबविणार आहे.

निवडणुकांसाठी कृती आराखडा लवकरच

0
0
सहकार कायद्यातील ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका तातडीने घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी मोठी यंत्रणा लागणार आहे. राज्यातील दीड लाख सहकारी संस्था निवडणुकांना पात्र आहेत.

मुख्यमंत्र्यांना योग्य सन्मान हवाच

0
0
मुख्यमंत्र्यांचा अपमान होता नये, प्रत्येकाने प्रत्येकाचा योग्य तो सन्मान राखला पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंड येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उद्‍घाटनाच्या वेळी व्यक्त केले.

मुद्रांक चुकवेगिरीच्या अभय योजनेला ‘अभय’

0
0
मिळकतींच्या दस्तावरील मुद्रांक शुल्क चुकविलेल्या आणि कमी मुद्रांक भरलेल्या प्रकरणांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘अभय योजने’ला येत्या ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभय योजनेद्वारे राज्यभरातून कोट्यवधी रुपयांहून अधिक महसूल गोळा होण्याची अपेक्षा आहे.

राष्ट्रवादी कार्यकर्तीचा अपघातात मृत्यू

0
0
राष्ट्रवादी पक्षाच्या पुणे शहर पर्यावरण सेलच्या उपाध्यक्षा व अखिल भारतीय समता परिषदेच्या उपाध्यक्षा शलाका सुरेश गिरमे (वय ३१) यांचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना सोलापूर रस्त्यावर शंकरमठाजवळ घडली. दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

‘बीआरटी’ची टोलवा टोलवी

0
0
आळंदी आणि नगर रोडवरील बीआरटीचा मार्ग किमान बससाठी खुला करण्याबाबत पीएमपीने पुन्हा हात आखडता घेतला आहे. बस टर्मिनल आणि आयटीएमएसपाठोपाठ आता या मार्गावरील इतर सुविधांची पूर्तता पालिकेने करावी, असे पत्र पाठवत पीएमपीने पुन्हा पालिकेच्या कोर्टात चेंडू ढकलला आहे.

१० डिसेंबरला ठरणार साहित्य संमेलनाचा अध्यक्ष

0
0
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. १३ सप्टेंबरला मतदार यादी जाहीर होणार असून २३ सप्टेंबरपर्यंत अध्यक्षपदासाठी अर्ज करता येणार आहे.

डॉ. सदानंद मोरे लढवणार संमेलन अध्यक्षपदाची निवडणूक

0
0
पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. ‘आधुनिक साहित्य आणि संत साहित्य यांच्यातील मी दुवा आहे.

विद्यापीठाच्या नाट्य विभागांच्या अनुदानाचा सरकारला विसर

0
0
बारामतीमध्ये झालेल्या नाट्य संमेलनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यापीठाच्या नाट्यविभागांना अनुदान देण्याच्या घोषणेचा राज्य सरकारला विसर पडला आहे. ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी राज्यभरातील विद्यापीठाच्या नाट्यविभागांशी समन्वय साधून राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला होता.

पुण्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस

0
0
गेल्या काही दिवसांतील जोरदार पावसामुळे पुण्यातील पावसाने ऑगस्टची सरासरी ओलांडली असून, आता पाऊस हंगामी सरासरीच्या नजीक येऊन ठेपला आहे. पुण्यात २५ ऑगस्टपर्यंत जून ते सप्टेंबर या हंगामाच्या सरासरीच्या तब्बल ९५ टक्के पाऊस झाला आहे.

संजय काकडे भाजपकडे

0
0
राज्यसभा खासदार संजय काकडे हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत. लवकरच ते भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही काळापूर्वी काकडे यांनी राज्यसभेवर निवड झाली होती.

पक्षांचे व्हिजन डॉक्युमेंट ही चांगली बाब : फडणवीस

0
0
पुण्यातील कार्यक्रमात फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या ‘व्हिजन महाराष्ट्र’ या अजेंड्याची जाहीर माहिती दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ब्लू-प्रिंटप्रमाणेच भाजपनेही या माध्यमातून आपला अजेंडा जाहीर केला आहे.

वनरक्षक, वनपालांचे काम बंद आंदोलन

0
0
राज्यातील वनरक्षक आणि वनपालांच्या अन्यायकारक वेतनश्रेणीच्या गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या मागण्या मंजूर होत नसल्यामुळे राज्यातील वनरक्षक आणि वनपालांनी २५ ऑगस्टपासून प्रत्येक जिल्ह्यात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

पेट्रोलसाठी रांगाच रांगा

0
0
पेट्रोल पंप मंगळवारी बंद राहणार असल्याच्या चर्चेमुळे सोमवारी दिवसभर पुणेकरांनी पंपांवर गर्दी केली होती. शहरातील बहुतांश पंपांवर पेट्रोलसाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images