Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘सीओडी’साठी नवी प्रशासकीय इमारत

$
0
0
‘लष्कराच्या वाहनांसाठी आवश्यक सुटे भाग पुरवणाऱ्या देहूरोड येथील सेंट्रल ऑर्डिनन्स डेपोसाठी (सीओडी) नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. तसेच लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या मोहिमेअंतर्गत या डेपोचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे,’ अशी माहिती डेपोचे प्रमुख ब्रिगेडिअर राजन कोचर यांनी बुधवारी दिली.

अधिकाऱ्यांसमोर टाकला कचरा

$
0
0
वाकड परिसरातील कचरा समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोघा नगरसेवकांनी ब क्षेत्रीय कार्यालय समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत कचरा टाकून प्रशासनाचा तीव्र निषेध केला.

पालिकेच्या क्रीडा विभागाची ‘धुलाई’

$
0
0
मनमानी आणि सुस्त कारभाराबद्दल नगरसेवकांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या कारभाराची अक्षरशः ‘धुलाई’ केली. शहरातील खेळाडू आणि कलाकारांची अवहेलना होत असल्याचे निदर्शनास आणून देत सदस्यांनी अधिकाऱ्यांना सौजन्याने वागण्याची ताकीदही दिली.

सत्य उघडकीस आणण्याची इच्छा सरकारला दिसत नाही

$
0
0
‘ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात प्लँचेट झाल्याच्या प्रकरणात सरकारला सत्य उघडकीस आणण्याची इच्छा असल्याचे दिसत नाही,’ असा आरोप पत्रकार आशिष खेतान यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

खतगावकर, किन्हाळकर भाजपच्या वाटेवर?

$
0
0
माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी सहकारमंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री माधवराव किन्हाळकर, माजी आमदार शिवाजी कव्हेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे मराठवाड्यातील ताकदवान नेते पक्षांतर्गत घुसमटीमुळे भाजपच्या वाटेवर आहेत.

धीरगंभीर हुंकार अन् विवेकाचा जागर

$
0
0
‘आम्ही सारे दाभोलकर’ असे फलक हाती घेत जमलेली तरुण मुले. त्यांच्या घोषणांनी भारावलेल्या वातावरणात ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि त्यांची पत्नी अभिनेत्री रत्ना शाह, ​अमोल पालेकर, सोनाली कुलकर्णी ही सिनेजगतातील मंडळी आणि विवेकवादी विचारांची माणसे पुण्याच्या रस्त्यावर उतरली.

विवेकवादाचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार

$
0
0
‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी कोण आहेत, हे सरकारला माहीत आहे. तरीही मारेकऱ्यांना अटक का होत नाही,’ असा सवाल करून दाभोलकरांचा विचार प्रभावी करण्यासाठी विवेकवादाचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार बुधवारी करण्यात आला.

सजावटीचे साहित्यही ‘इको फ्रेंडली’

$
0
0
रासायनिक रंग आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण कमी करण्यासाठी ‘इको फ्रेंडली’ गणेशमूर्तीबरोबरच सजावटीचे साहित्यही नागरिकांनी पर्यावरणास पोषक असेच वापरावे, या उद्देशाने ‘इको एक्झिस्ट’ या संस्थेने गणेशभक्तांसाठी यंदा वैविध्यपूर्ण साहित्य तयार केले आहे.

गर्दीवर नियंत्रणासाठी NSS ची मदत

$
0
0
दहीहंडीच्या दिवशी स्पीकर्सच्या भिंतीवर पोलिसांनी कारवाई केली नाही, एकखिडकी योजना प्रभावी पद्धतीने राबवली जात नाही, मिरवणुकीच्या दिवशी लोकप्रतिनिधींनी पूर्णवेळ थांबावे आदी सूचना मध्यवर्ती शांतता समितीच्या बैठकीत नोंदवण्यात आल्या.

पत्ते शोधण्यासाठी दीड कोटी पाण्यात!

$
0
0
मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या आठ लाख मतदारांना पोस्टामार्फत घरपोच नावनोंदणी अर्ज पाठविण्याचा आटापिटा निवडणूक आयोगाने केला खरा, पण त्यातील पाच लाखांहून अधिक अर्ज पत्ते न सापडल्याने परत आले आहेत. आयोगाच्या या खटाटोपामुळे तब्बल १ कोटी ६० लाख रुपयांचा बोजा सामान्य जनतेवर पडला आहे.

कारचालकाची वाहतूक पोलिसांवर अरेरावी

$
0
0
‘आपली पोलिस खात्यात बड्या-बड्या अधिकाऱ्यांशी ओळखी आहे’ अशी दमबाजीकरत ‘जॅमर’ची कारवाई केलेल्या वाहन मालकाने वाहतूक पोलिस अधिकाऱ्याला अरेरावी केल्याचा प्रकार समर्थ पोलिस ठाण्याच्या आवारात घडला.

आघाडीच्या उंदरांमुळे आपले जहाजही बुडेल

$
0
0
‘दोन्ही काँग्रेसच्या बुडत्या जहाजाला कुरतडून अनेक उंदीर महायुतीच्या जहाजात बसू पाहत आहेत. त्यांना किती महत्त्व द्यायचे, ते आताच ठरवावे, अन्यथा आपलेही जहाज बुडण्यास वेळ लागणार नाही,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी भाजप-सेनेला दिला.

राष्ट्रवादीचे शहरात ७२ इच्छुक

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे शहरातील आठ मतदारसंघातून तब्बल ७२ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहे. यामध्ये खडकवासला मतदार संघातून सर्वाधिक म्हणजे २५ अर्ज आले असून शिवसेना, भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरुड मतदारसंघातून केवळ ५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

जागा शिवसेनेची; इन्कमिंग भाजपकडे

$
0
0
नव्या तगड्या उमेदवारांचे इन्कमिंग भाजपकडे आणि मूळ युतीच्या वाटपातील जागा मात्र शिवसेनेकडे; अशी परिस्थिती अनेक ठिकाणी उद्भवल्याने भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपात नवा पेच उभा राहिला आहे.

‘स्वच्छते’अभावी १४९ खाद्यविक्रेत्यांवर कारवाई

$
0
0
खाद्यपदार्थांची विक्री करताना स्वच्छतेचे गांभीर्य न ठेवणाऱ्या तसेच स्वच्छतेअभावी शहरातील सुमारे दीडशे हॉटेल, चायनीज, वडापावच्या खाद्यविक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सात लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

मातेपासून बाळांना संसर्ग रोखण्यासाठी नवे औषधोपचार

$
0
0
विविध संशोधनांच्या आधारे नव्याने विकसित केलेल्या ‘ऑप्शन बी प्लस’ या तीन प्रकारच्या औषधांच्या थेरपीमुळे मातेपासून बाळाला ‘एचआयव्ही’ची लागण होण्याचे प्रमाण घटले आहे. अकरा टक्क्यांवरून अवघ्या दोन टक्क्यांवर प्रमाण आणण्यात या थेरपीमुळे आरोग्य खात्याला यश आले आहे.

टंचाई संपल्यावर आता ‘पाणी’बाणी अशुद्धतेची...

$
0
0
पावसाचे आगमन लांबल्यामुळे निर्माण झालेली ‘पाणी’बाणी सुटतेय न सुटतेय, तोपर्यंत दूषित पाण्याचा प्रश्न नागरिकांना सतावू लागला आहे. शहराच्या विविध भागांत गेले अनेक दिवस गढूळ पाणी येत असून, त्याची तक्रार करूनही त्यात कोणतीही सुधारणा करण्याची तसदी महापालिकेने घेतलेली दिसत नाही.

सत्ताधाऱ्यांकडून केंद्राचा निषेध

$
0
0
केंद्र सरकारकडून पुणे मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळत नसल्याच्या निषेधार्थ पालिकेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासदांनी केंद्र सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देत निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने मेट्रोला तातडीने मंजुरी न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

‘पुणे मेट्रोबाबत दुजाभाव नाही’

$
0
0
नागपूर आणि पुणे येथील मेट्रो प्रकल्पांबाबत केंद्र सरकार दुजाभाव करत नसल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला. पुणे मेट्रोच्या प्रस्तावात अजूनही काही त्रुटी असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्येच्या माहेरघरात ‘IIM’ येणार का?

$
0
0
केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार महाराष्ट्रात होणारे आयआयएम पुण्यातच व्हावे, यासाठी येथील उद्योग क्षेत्र आणि राजकीय नेतृत्वाने पाठपुरावा करणे गरजेचे आहे. ‘आयआयएम’ संदर्भातील निर्णय राज्यातील निवडणुका झाल्यानंतरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images