Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मधुमेहावर विजयाचे शिखर त्याने केले सर!

$
0
0
‘टाइप१’ डायबेटिसचा आजार असतानाही इच्छाशक्ती, जिद्द आणि औषधोपचाराच्या बळावर ४६०० मीटर लांबीच्या माचु पिचू हे शिखर पुण्याच्या १९ वर्षाच्या इशांत शेवते याने सर केले. डायबेटिस केअर अॅन्ड रिसर्च फाउंडेशनच्या मदतीने डायबेटिसवर नियंत्रण ठेवून स्वप्नांच्या पंखांना बळ देता येते हे इशांतने दाखविून दिले.

‘ATS’कडून ७ पिस्तूल जप्त

$
0
0
दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पाच गुन्हेगारांना अटक करत त्यांच्या ताब्यातून सात पिस्तूल आणि १७ जिवंत काडतुसे असा सात लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

मेघगर्जनेसह सरींची हजेरी

$
0
0
शहर आणि परिसरात बुधवारी दुपारनंतर पावसाच्या काही सरी कोसळल्या. सायंकाळनंतर उपनगरांसह मध्यवर्ती भागातही मेघगजर्नेसह सरींनी हजेरी लावली. गुरुवारीही दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

होमिओपॅथीसाठीही फार्माकोलॉजी

$
0
0
‘होमिओपॅथ’ना आधुनिक चिकीत्साशास्त्रानुसार (मॉडर्न मेडिसीन) प्रॅक्टिस करण्याची मुभा मिळावी यासाठी आवश्यक एक वर्षाच्या ‘फार्माकोलॉजी’चा अभ्यासक्रम राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे आता ‘अॅलोपॅथ’ची प्रॅक्टिस करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

शार्दूलचे निवडणूक सॉफ्टवेअर

$
0
0
शालेय विद्यार्थ्यांच्या निवडणुका हा मोठ्यांसाठी तसा छोटा विषय. मात्र, शालेय विद्यार्थ्यांच्या या निवडणुकांमधून कधीकधी मोठ्यांनाही लाजवेल असे काम पुढे येऊ शकते. असेच एक काम सूस गावातील विद्या व्हॅली स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या निवडणुकांदरम्यान नुकतेच झाले.

पुणे मेट्रोला ‘NDA’चाही खो

$
0
0
नागपूरसह अहमदाबाद आणि लखनौ येथील मेट्रो प्रकल्पांनाही केंद्र सरकारच्या ‘पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डा’ने (पीआयबी) मान्यता दिली असताना, पुणे मेट्रोचा प्रस्तावच अद्याप ‘पीआयबी’समोर दाखल झालेला नाही.

...महायुतीचं जहाज बुडू नये!

$
0
0
काँग्रेस-राष्ट्रवादीचं जहाज बुडू लागल्याचं पाहून त्यावरचे उंदीर महायुतीच्या जहाजात येऊ लागले आहेत, पण त्यांच्या येण्यानं महायुतीचं जहाज बुडायला नको, असा खबरदारीचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला आहे.

रंगणार मुकुटासाठी टशन

$
0
0
‘श्रावणक्वीन’चा मुकुट पटकवण्यासाठी १५ स्पर्धक अक्षरशः झोकून देऊन तयारी करत आहेत. एकीकडे तज्ज्ञांकडून मिळणारं मार्गदर्शन, रॅम्पवॉकची जोरदार तयारी यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आहेच, तर दुसरीकडे आत्मपरीक्षणातून त्या स्वतःला विजेतेपदाकडे नेण्याची तयार करत आहेत.

टपाल खात्याला ग्राहक मंचाने फटकारले

$
0
0
टपाल खात्यातील रक्कम मध्येच काढण्यासाठी रीतसर अर्ज देऊनही खातेदाराला रक्कम न दिल्याप्रकरणी ग्राहक मंचाने टपाल खात्याला सुनावले आहे. तक्रारदाराला ४० हजार रुपये दोन टक्के व्याज दराने परत द्यावेत, असा आदेश मंचाने दिला आहे.

‘पर्यावरण पूरक गणेशोत्सव’ प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद

$
0
0
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती आणि सजावटीच्या प्लॅस्टिक तसेच थर्माकोलच्या वस्तूंमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी हातकागद संस्थेतील पेपरटेल्सतर्फे ‘इको फ्रेंडली गणेशोत्सव’ प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

कमी दराने वीजपुरवठा

$
0
0
गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती वीजदरापेक्षा कमी दराने वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे मंडळांनी अधिकृत वीजकनेक्शन घ्यावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

शाडूच्या मूर्तींच्या प्रतिष्ठापनेचे आवाहन

$
0
0
हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे शाडूच्या मातीपासून बनवलेली गणेश मूर्ती वापरावी; तसेच विर्सजन वेळी शास्त्रानुसार वाहत्या पाण्यात किंवा नैसर्गिक जलस्त्रोतातच विसर्जन करण्याचे आवाहन हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आले.

वर्गणीची ‘खंडणी’ उकळणारे रडारवर

$
0
0
गणेशोत्सव आठ दिवसांवर आल्याने गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वर्गणी जमवण्याचे काम जोरात सुरू आहे. मात्र, नोंदणीकृत नसलेल्या मंडळांकडून वर्गणी मागितल्याची तक्रार आल्यास पोलिसांकडून खंडणी मागितल्याच्या नावाखाली थेट गुन्हा नोंदवला जाणार आहे.

सर्पमित्रच पुरवतात गारुड्यांना साप

$
0
0
श्रावणी सोमवारचे औचित्यसाधून पुण्यातील उपनगरांसह शहराच्या बाहेर असलेल्या शिवमंदिरांमध्ये या वर्षी पुन्हा गारुड्यांची संख्या वाढली असून शहरातील सर्पमित्रच गारुड्यांना नाग पुरवत असल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

पार्किंगविरोधात आंदोलनाचा इशारा

$
0
0
मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांच्या पार्किंगसाठी बेकायदेशीरपणे वसूल केले जाणारे शुल्क त्वरित बंद करण्यात यावा अन्यथा त्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटीच्या सांस्कृतिक विभागाने दिला आहे.

अॅसिडपेक्षा ‘फिनाइल’ ठरतेय आरोग्याला घातक

$
0
0
सुरक्षित जंतूनाशक म्हणून सर्रासपणे वापरले जाणारे ‘फिनाइल’ हे अॅसिडपेक्षा आरोग्यासाठी अधिक घातक असल्याचा निष्कर्ष हेल्थ इंडिया संस्थेने केलेल्या एका सर्व्हेतून काढण्यात आला आहे. फिनाइलमुळे लिव्हर, किडनी, डोळे तसेच त्वचेचे नुकसान होऊ शकते अशी माहितीही पुढे आली.

दुखभरे दिन बीते रे भैया...

$
0
0
गेली ४० वर्षे पुण्यातील रस्त्यांवर हिंडून हार्मोनियमच्या साथीने गाणी म्हणणाऱ्या दाम्पत्याला अखेर हक्काचे घर मिळाले. केशवलाल गुजराथी हे पत्नी सोनीबाई यांच्या साथीने हार्मोनियम वाजवत गाणी म्हणून चरितार्थ चालवत होते.

कपड्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग

$
0
0
कपड्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अचानक आग लागून झालेल्या दुर्घटनेत ट्रक आणि त्यातील कपडे जळून खाक झाले. ही घटना गुरुवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास खंडाळा घाटातील खंडाळा एक्झिटजवळ घडली.

दोन पिढ्यांच्या संघर्षाला यश

$
0
0
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमुळे (एनडीए) ६२ वर्षांपूर्वी विस्थापित झालेल्या अहिरे ग्रामस्थांना गुरुवारी पुनर्वसित शिवणे (न्यू अहिरे) गावात स्वमालकी हक्काचे सातबारा उतारे देण्यात आले. पुनर्वसनासाठी गेल्या दोन पिढ्यांपासून सुरू असलेल्या अहिरे ग्रामस्थांच्या संघर्षाला यामुळे पूर्णविराम मिळाला आहे.

यापुढे २९ ऑगस्टला शेतकरी दिन

$
0
0
कृषिप्रधान देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांप्रती कृतज्ज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्याच्या भरीव कार्याचा गौरव दरवर्षी व्हावा, या उद्देशाने यापुढे २९ ऑगस्ट हा राज्यात शेतकरी दिन म्हणून साजरा होणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images