Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मखरांचे होणार रिसायकलिंग

$
0
0
गणेशोत्सवातली आरास देखणी व्हावी आणि ती पर्यावरणपूरकही ठरावी, यासाठी थर्माकोलचे रिसायकलिंग करण्याची शक्कल पुण्यातल्या धनकवडी येथील कमलेश धार्मिक या कलाकाराने लढवली आहे.

‘टॅटू’ काढताय...? सावधान...!

$
0
0
तुम्हाला तुमच्या प्रेयसी, प्रियकराच्या नावाचे ‘टॅटू’ अथवा गोंदून घ्यायचंय ...? फॅशन म्हणून नवीन काही डिझाईन्स हात, कंबर, दंड, छाती, पोट, मान, पाठीवर काढून घ्यायचीय...? त्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर सावधान...!

पुणे-दुबई विमान तांत्रिक कारणांमुळे रद्द

$
0
0
एअर इंडियाचे पुण्याहून दुबईला जाणारे विमान मंगळवारी तांत्रिक कारणांमुळे दुबईसाठी उड्डाण करू शकले नाही. आता हे विमान बुधवारी दुपारी १२ वाजता दुबईकडे प्रयाण करणार आहे. ‘पुण्याहून दुबईला जाणारे विमान दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी उड्डाण करते.

गणेशोत्सवात शेवटचे पाच दिवस रात्री बारापर्यंत स्पीकरला परवानगी

$
0
0
गणेशोत्सवात गौरी विसर्जनानंतर अनंत चतुदर्शीपर्यंतचे पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर लावण्यास जिल्हाधिकारी सौरव राव यांनी परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना ध्वनी प्रदूषणाची मर्यादा पाळण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.

काँग्रेसच्या मुलाखतींना निम्हण अनुपस्थित

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी शहर व जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी मुंबईत टिळक भवनात पार पडल्या. कसबा पेठ, पुणे कँटोन्मेंट, शिवाजीनगर आणि हडपसर या मतदारसंघांमधील इच्छुकांनी यावेळी मुलाखती दिल्या.

२ आठवड्यांनंतर अखेर मिळाले आयुक्त

$
0
0
दोन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पुणे महापालिकेला नवीन आयुक्त मिळाले आहेत. राज्य सरकारने कुणाल कुमार यांची पालिका आयुक्तपदी नेमणूक केली असून, ते बुधवारी (आज) कार्यभार स्वीकारणार आहेत. यापूर्वीच्या आयुक्तांची बदली झाल्यानंतर आयुक्ताविनाच पुणे महपालिकेला कारभार हाकावा लागत होता.

पेट्रोलच्या तुटवड्यामुळे पुणेकरांचे हाल

$
0
0
सलग चौथ्या दिवशी शहरात पेट्रोलचा तुटवडा कायम असल्याने पुणेकरांचे हाल झाले. पुणे-मुंबई दरम्यान असलेल्या पेट्रोल पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने तसेच लोणी येथील पेट्रोल डेपोच्या डिलिव्हरी पॉईंट्समध्ये बिघाड झाल्याने पेट्रोलच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता.

पेट्रोलचा पुरवठा आज होईल सुरळीत

$
0
0
पेट्रोलच्या पुरवठ्यात आलेल्या अडचणी दूर करण्यात येत असून कंपन्यांनी मुंबई व सोलापूर येथून पेट्रोलचा साठा मागविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आजपर्यंत (बुधवार) शहर व परिसरातील पेट्रोलचा पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने मंगळवारी देण्यात आली.

राज्य बँकेच्या संचालकांच्या चौकशीला मुदतवाढ

$
0
0
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (एमएससी) कोट्यवधी रुपयांच्या तोट्याला कारणीभूत ठरलेल्या संचालकांवरील वैयक्तिक जबाबदारी निश्चित करणाऱ्या चौकशीला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय सहकार खात्याने घेतला आहे.

नव्या जादूटोणाविरोधी कायद्यान्वये ८५ गुन्हे

$
0
0
पैशांचा पाऊस, अलौ​किक शक्ती, गुप्तधन, नग्नपूजा, नरबळी यासह काळ्या जादूचे ८५ गुन्हे जादूटोणा विरोधी कायद्यान्वये राज्यात दाखल झाले आहेत. राज्यात सर्वाधिक नाशिक येथे नऊ, तर पुण्यात पाच गुन्हे दाखल झाले आहेत.

कंबर कसूनही तपासात प्रगती नाही

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. शहरातील काही भागांत तपास सुरू झाला असून, या गुन्ह्यातील साक्षीदारांकडे चौकशी सुरू केली आहे. पुणे पोलिस दलातील एक पोलिस निरीक्षक कायमस्वरूपी ‘सीबीआय’च्या मदतीला देण्यात आला आहे.

‘जॅमर’च्या कारवाईने बडे प्रस्थ जॅम

$
0
0
वाहतूक पोलिसांनी बड्या प्रस्थांच्या वाहनांवर कधी नव्हे ते कारवाईचा बडगा उगारला असताना या मंडळींकडून आता वाहतूक पोलिसांवरच दबाब आणण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. बिहारचे प्रधान सचिव, प्राप्तिकर अधिकारी, राज्याच्या गृहमंत्रालयातील उच्च पदस्थ, माजी मंत्री, मंत्र्यांचे स्वीय सहायक आदींसारख्या उच्चाधिकाऱ्यांनीच ‘जॅमर’च्या कारवाईविरुद्ध वाहतूक पोलिसांना दमबाजी करीत असल्याचे समोर आले आहे.

पुणे मेट्रो साइड ट्रॅकवरच

$
0
0
मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या अटींची पूर्तता पुण्याने केली नसल्याचा ठपका ठेवला जात असला, तरी विविध खात्यांतर्फे उपस्थित केल्या गेलेल्या सर्व त्रुटी दूर केल्या असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

‘एमआयटी’त फीविरोधी आंदोलन

$
0
0
कोथरूडच्या एमआयटी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक फी वाढीविरोधात पालकांनी मंगळवारी आंदोलन केले. फीवाढ मागे घेण्यासाठी ‘एमआयटी’च्या संचालकांशी झालेल्या चर्चेदरम्यान पालकांना धमकावण्याचा प्रकार घडल्याचा आरोप पालकांनी केला.

तासाभराच्या पावसाने तळे

$
0
0
अनेक दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शहर आणि परिसरात मंगळवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. अवघ्या तासाभरात २३.४ मिलिमीटर पाऊस झाला. यामुळे ठिकठिकाणी तळे साचून वाहतूक मंदावली.

वर्षानंतरही पोलिस अंधारातच

$
0
0
अंधश्रद्धेच्या विरोधात रान पेटविणारे विवेकवादी सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाले असले, तरी त्यांच्या मारेकऱ्यांबाबत पोलिस अजूनही अंधारातच आहेत. या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना कितपत यश येईल, याबाबत आता जाहीर शंका उपस्थित केली जात आहे.

योगगुरू अय्यंगार यांचे निधन

$
0
0
पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित योगगुरू बी. के. एस. अय्यंगार (९६) यांचे पुण्याच्या प्रयाग हॉस्पिटलमध्ये प्रदीर्घ आजारपणामुळे निधन झाले. अय्यंगार योगाचे जन्मदाते असलेल्या बी. के. एस. अय्यंगार यांना मूत्रपिंड (किडनी) निकामी झाल्यामुळे डायलिसिसवर ठेवण्यात आले होते.

आ. विजय शिवतारे यांच्या गाडीवर हल्ला

$
0
0
येथील दहीहंडीच्या निमित्ताने अनेक राजकीय पक्षांचे नेते व्यासपीठावर एकत्र आले असताना अचानक आमदार विजय शिवतारे यांच्या गाडीवर दोघांनी हल्ला करून चालकास मारहाण व शिवीगाळ केली. त्यानंतर गाडीच्या मागील काचाही फोडल्या.

मेट्रो मार्गालगत ४ ‘FSI’ नको

$
0
0
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मेट्रो मार्गालगत चार ‘एफएसआय’ देण्याच्या प्रस्तावाला ग्रीन थंब पर्यावरण संस्था व कर्वे रोड येथील एलआयसी कॉलनीतील रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे.

उंडाळकरांवर भाजपचा गळ

$
0
0
मुख्यमंत्र्यांना कराड दक्षिणत मतदारसंघातच रोखून धरणार असल्याची रणनीती भारतीय जनता पक्षाचे नेते विनोद तावडे यांनी जाहीर केली आहे. या रणनीतीचा भाग म्हणून भाजपच्या वतीने या मतदारसंघातील सध्याचे आमदार आणि काँग्रेसचे माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यावर गळ टाकायला सुरुवात केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images