Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

थेरगावमध्ये गॅसगळती,पाच जखमी

$
0
0
थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटलमागच्या दत्तनगरमध्ये घरात गॅसगळती झाल्यामुळे एकाच कुटुंबातील पाचजण जखमी झाले आणि घराची पडझड झाली. आज (सोमवारी) पहाटे पाच वाजता ही घटना घडली.

‘पडकई’मुळे झाली दुर्घटनेची तीव्रता कमी

$
0
0
माळीण घटनेमागे ज्या पडकईचे कारण दिले जात आहे. मात्र, डोंगरउतारावरील त्याच भातशेतीमुळे माळीणच्या दरडीची तीव्रता कमी झाल्याचे आता समोर येत आहे. अभ्यासकांनी केलेल्या प्राथमिक पाहणीत डोंगर उतारावरील भाताचे वावर सुरक्षित असून, त्या वावरात मोठ्या प्रमाणात दरडीचा भाग अडकून राहिल्याचे दिसून आले आहे.

उद्‍‍ध्वस्त गावात राहणे अशक्य

$
0
0
लहानाचे मोठे ज्या गावात झालो, जेथे सुखाचे क्षण अनुभवले, तोच गाव आता उद्‍‍ध्वस्त झालेला आहे. ज्या मातीवर इतके वर्ष जगलो, त्याच मातीने अनेकांचे प्राण घेतले. आता येथे राहणे शक्यच होणार नाही, अशी व्यथा माळीण गावातील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

माळीणमध्ये आव्हान दुर्गंधी आणि आरोग्याचे

$
0
0
माळीण येथे रविवार रात्रीपासून जोरदार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाल्याने मदतकार्याला मर्यादा येत आहेत. पाऊस, दुर्गंधी व काम करण्यासाठी उपलब्ध असलेली अतिशय कमी जागा, या गोष्टींचा सामना करत मृतदेह शोधण्याचे काम शोधपथकाकडून अहोरात्र सुरू आहे.

धनगर आरक्षणावरून पवारांच्या कोंडीचा डाव

$
0
0
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींनाच फक्त राजकीय आरक्षण आहे. त्यामुळेच धनगर समाजाला अनूसूचित जमातीतून (एसटी) आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. असे झाल्यास बारामती मतदारसंघ आरक्षित होण्याची शक्यता असून, याद्वारे शरद पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न महायुतीतर्फे केला जात आहे, असा आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे सोमवारी करण्यात आला.

बाजार समित्यांवर अशासकीय सदस्य?

$
0
0
गेली अनेक वर्षे प्रशासकांच्या कारभाराखाली असलेल्या बाजार समित्यांमध्ये निवडणुका घेण्याची टाळाटाळ करणाऱ्या सरकारने आता या समित्यांवर अशासकीय सदस्यांची थेट नियुक्ती करण्याचा घाट घातला आहे.

पालिकेच्या जागेत अतिक्रमण

$
0
0
येरवड्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाच्या मागे अंध, अपंग व्यक्तींसाठी बांधण्यात आलेल्या दुकानांचा उपयोग म्हशी, बांधकाम साहित्य आणि अवैध कृत्यांसाठी होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पालिकेचा निधी वाया गेल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांची समृद्धी आघाडी सरकारने रोखली

$
0
0
साठ हजार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे आत्मे आघाडी सरकारला शाप देत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचा आकांत आघाडी सरकारला घालवल्याशिवाय थांबणार नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दौंड येथील किसान मोर्चा पदाधिकारी मेळाव्यात केली आहे.

सासवडला मिळणार दिवसाआड पाणी

$
0
0
सासवडसह पुरंदर तालुक्यात व पश्चिम डोंगरी भागात गेले आठवडाभर पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे सासवड शहरातील पाणीटंचाई दूर झाली आहे. पाणीटंचाई दूर झाल्याने दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर गिरमे यांनी दिली आहे.

‘चुकीच्या राजकीय प्रवृत्तींना यापुढे विरोधच’

$
0
0
पुरंदरच्या दुष्काळाचे वर्षानुवर्षे केवळ राजकारण केले जाते. पण मूळ प्रश्नाला कोणी हात घालत नाही. नेते सासवडमध्येच असूनही प्रश्न सोडविले जात नाहीत. पण गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही सासवडचे प्रश्न सोडविले आहेत.

‘पराभवाने खचून न जाता पक्ष मजबूत करा’

$
0
0
‘लोकसभेच्या पराभवाने खचून जाण्याचे कारण नाही. शेवटी स्थानिक संस्था या महत्त्वाच्या असून त्यात पक्ष संघटना मजबूत ठेवावी,’ असे सूतोवाच माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी सासवड येथील तालुका काँग्रेस भवन येथे भेट देताना केले.

‘भोर-वेल्ह्या’च्या जागेची ‘राष्ट्रवादी’ची मागणी

$
0
0
भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे. हा मतदारसंघ पूर्वी पक्षाकडेच होता. त्यामुळे जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे घ्यावा, अशी जोरदार मागणी ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आली.

पराभव पुसण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ता सज्ज

$
0
0
‘काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता खंबीर असून, लोकसभेचा पराभव पुसून काढण्यासाठी सज्ज झाला आहे. विधानसभेसाठी काँग्रेसचा कार्यकर्ता पुन्हा ताठ मानेने मतदारांसमोर जाणार आहे,’ असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांनी सोमवारी व्यक्त केला.

गाडीतळ उड्डाणपुलाजवळ वाहतूककोंडी

$
0
0
गाडीतळ उड्डाणपुलाच्या कामासाठी सासवड रस्त्यावरील येणारी वाहने पुलाजवळील सर्व्हिस रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. सासवडहून हडपसर व सोलापूरकडे जाणारी वाहने या मार्गाने जात आहेत. या ठिकाणी दिशादर्शक फलक व वाहतूक पोलिस नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

निसर्गसंपन्न मावळ… आता ‘हाय अलर्ट’वर!

$
0
0
मावळाला लाभलेले निसर्गाचे वरदान हे मानवाच्या हस्तक्षेपामुळे भविष्यात कर्दनकाळ ठरू शकते. आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर जी नैसर्गिक आपत्ती कोसळून संपूर्ण गावच मातीत विलीन झाले.

तंबाखूबंदीसाठी कॅन्सर सर्जनचा पुढाकार

$
0
0
राज्यात गुटखाबंदी लागू झाल्यानंतर तंबाखूबंदीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आता चक्क राज्यातील बहुतांश कॅन्सरतज्ज्ञांनीच राज्य सरकारच्या या मोहिमेला हातभार लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या मोहिमेत पुणे जिल्ह्यातील दोघा डॉक्टरांसह तिघांचा समावेश आहे.

चिखलीतील ‘अल्पाइन प्लाझा’ इमारत धोकादायक

थेरगावला गॅसगळतीमुळे स्फोट

$
0
0
थेरगावातील दत्तनगरमध्ये एका घरात सोमवारी (४ ऑगस्ट) गॅसचा स्फोट झाल्याने कुटुंबातील पाच व्यक्ती जखमी झाल्या. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

तेहतीस लाखांचे हस्तिदंत जप्त

$
0
0
पुणे-मुंबई राष्ट्रीय मार्गावर सोमाटणे येथील टोलनाक्यावर बेकायदा हस्तिदंताची वाहतूक करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील सहा जणांच्या टोळीला तळेगाव व पुणे ग्रामीण पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून ३३ लाख ३० हजार रुपये किमतीचा तीन किलो ७०० ग्रॅम वजनाचा हस्तिदंत हस्तगत करण्यात आला आहे.

बाजार समितीने घेतला अखेर पार्किंगचा ताबा

$
0
0
जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील वादग्रस्त ठरलेल्या पार्किंगचा प्रशासनाने सोमवारी अखेर ताबा घेतला; तसेच बाजार समितीच्या नावानेच शुल्क आकारणीच्या पावत्या देण्यास सुरुवात केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images