Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पार्किंग बाजार समितीकडे; पावत्या मात्र ठेकेदाराच्या

$
0
0
पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या पार्किंगचा ताबा ठेकेदाराकडून घेण्यात आल्याचे बाजार समितीच्या प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र पार्किंगमध्ये येणाऱ्या वाहनचालकांकडून आकारण्यात येणारे शुल्क हे जुन्याच ठेकेदाराच्या नावाने वसूल होत असल्याने याबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे.

खडकीत ४५ बांधकामांवर हातोडा

$
0
0
खडकी कँटोन्मेंट बोर्डाने गवळीवाडा येथील ४५ बेकायदेशीर घरांवर शनिवारी कारवाई केली. या कारवाईमध्ये बोर्डाचे अभियंते, अतिक्रमणविरोधी पथक, पोलिस आणि लष्कराच्या जवानांचा सहभाग होता. खडकीतील गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी मोठी कारवाई आहे.

प्रलंबित वेतनासाठी आंदोलन करणार

$
0
0
काळेवाडी तापकीरनगर येथील भाऊसाहेब तापकीर शाळेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनाच्या मागणीसाठी ११ ऑगस्टपासून उपोषण करण्याचा इशारा कॉन्फेडरशेन ऑफ हेडमास्टर ऑफ प्रायमरी, सेकंडरी स्कूल अॅन्ड अध्यापक विद्यालय संघटनेने दिला आहे.

हरित लवादाकडे केवळ ३३४ तक्रारी

$
0
0
पर्यावरणसंवर्धन की विकास या मूलभूत प्रश्नांवरील पर्यावरणीय वाद सोडविण्यासाठी पुण्यात सुरू झालेल्या हरित न्यायाधिकरणाला ऑगस्टमध्ये एक वर्षे पूर्ण होते आहे. वर्षभरात पर्यावरणाशी निगडित ३३४ खटले या न्यायाधिकरणामध्ये दाखल झाले असून ११० प्रकरणांचे निकाल लागले. मात्र, पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेल्या तक्रारीचे प्रमाण बोटांवर मोजण्याएवढे कमी आढळले आहे.

‘सीएनजी’ रिक्षाचालकांचा आंदोलनाचा इशारा

$
0
0
गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून विस्कळित असलेला ‘सीएनजी’चा पुरवठा येत्या आठवड्यात सुरळीत झाला नाही, तर रिक्षा बंदसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार यांनी जिल्हाधिकारी सौरव राव व रिक्षा पंचायत यांच्यात झालेल्या बैठकीत दिला.

मेट्रो प्रकल्पासाठी ४ FSI नको

$
0
0
‘केंद्र सरकारने पुणे मेट्रो प्रकल्पातील अनेक त्रुटी समोर आणल्यावरही हा प्रकल्प राबविण्याबाबत दिशाभूल करणारी वक्तव्ये केली जात आहेत. तसेच मेट्रो प्रकल्पासाठी चार एफएसआय आणण्याची काहीही आवश्यकता नाही,’ असा सूर सजग नागरिक मंचातर्फे आयोजित चर्चासत्रात व्यक्त झाला.

‘निवाऱ्याची तातडीने सोय करा’

$
0
0
‘माळीण येथे सरकारतर्फे करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची अंमलबाजवणी त्वरित करावी, येथील ग्रामस्थांना निवाऱ्याची सोय उपलब्ध करून द्यावी आणि तातडीने मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,’ अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिल्या आहेत.

मृतांची संख्या १०५

$
0
0
माती व घट्ट झालेल्या गाळाच्या ढिगाऱ्यात मृतदेहांचा शोध घेण्याचे काम अखंडपणे सुरू असून, या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता १०५ वर पोहोचली आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही ५० पेक्षा जास्त व्यक्ती गाडल्या गेल्या असण्याची शक्यता आहे.

माळीण दुर्घटना नैसर्गिकच

$
0
0
आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेला नैसर्गिक घटकच कारणीभूत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) काढला आहे. या भागात राबविण्यात येत असलेल्या पडकई योजनेमुळेच ही आपत्ती ओढवल्याची चौफेर टीका होत असताना भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचा हा निष्कर्ष महत्त्वपूर्ण ठरत आहे.

हुक्काबार चालविणाऱ्या हॉटेलवर पोलिसांचा छापा

$
0
0
साळुंखे विहार रोडवर विनापरवाना राजरोसपणे हुक्काबार चालवणाऱ्या हॉटेलवर येरवडा पोलिसांनी ‘रेड’ केली. या हॉटेलच्या मॅनेजरसह मालकाविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘पीएमपी’ने प्रवाशांना सोडले अर्ध्या रस्त्यात

$
0
0
प्रवाशांच्या फायद्याचे निर्णय न घेत‌ा वेगवेगळ्या कारणांनी बदनाम झालेली पीएमपी आता प्रवाशांना रस्त्यात मध्येच सोडण्यातही मागे पुढे पाहत नसल्याचे समोर आले आहे. शनिवारवाडा ते नऱ्हे या बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना शेवटच्या स्टॉपपर्यंत न सोडता बसच्या ड्रायव्हर, कंडक्टरने वडगांव फाट्यावरच उतरविले.

‘शिवाजीनगर’मध्ये हवे शत प्रतिशत

$
0
0
‘येत्या निवडणुकीत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या कार्यकर्त्यालाच संधी द्यावी, ही भावना आपण पक्षाच्या केंद्रीय नेत्यांकडे पोहोचवू,’ असे आश्वासन संरक्षण राज्यमंत्री राव इंद्रजीतसिंह यांनी रविवारी दिले. दरम्यान, येथून पक्षाने बाहेरचा उमेदवार लादू नये, अशी जाहीर मागणी कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे केली.

माळीण दुर्घटनेतील १०५ मृतदेह हाती

$
0
0
आंबेगाव तालुक्यातील माळीण येथे माती व घट्ट झालेल्या गाळाच्या ढिगाऱ्यात मृतदेहांचा शोध घेण्याचे काम अखंडपणे सुरू असून, या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता १०५ वर पोहोचली आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही ५० पेक्षा जास्त व्यक्ती गाडल्या गेल्या असण्याची शक्यता आहे.

दोनशे झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन पालिकेमुळे रखडले

$
0
0
महापालिकेच्या दिरंगाईमुळे सिंहगडरोडवरील प्रभाग क्रमांक ५३ येथील जयदेवनगर झोपडपट्टीमधील २०० झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन रखडले आहे. या झोपडपट्टीधारकाचे करार करण्यास उशीर झाल्याने हे पुनर्वसन रखडले असल्याचे समोर आले आहे.

प्रॅक्टिकल परीक्षेतील ‘डिसेक्शन’वर फुली

$
0
0
पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर प्रयोगांसाठी कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांचे ‘डिसेक्शन’ करण्यावर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) बंदी घातली आहे. ‘यूजीसी’चा हा निर्णय जैवविविधता जोपासण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

$
0
0
बंगालच्या उपसागराचा उत्तर भाग आणि लगतच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, त्याची तीव्रता वाढली आहे. त्याच्या प्रभावाने येत्या दोन दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

फुटपाथवर दगडाने ठेचून खून

$
0
0
लाल बहादूर शास्त्री रोडवर विद्या सहकारी बँकेसमोरील फुटपाथवर एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

‘NET’आता ‘CBSE’च्या माध्यमातून

$
0
0
विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) ‘नेट’ची परीक्षा यापुढे ‘सीबीएसई’च्या माध्यमातून घेण्याचा निर्णय ‘यूजीसी’ने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठातर्फे राज्यात घेतल्या जाणाऱ्या ‘सेट’च्या परीक्षेमध्ये मात्र कोणतेही बदल होणार नसल्याचे विद्यापीठाकडून रविवारी स्पष्ट करण्यात आले.

‘RPI’ला हव्यात २० जागा

$
0
0
‘महायुतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आरपीआय) सन्मानाची वागणूक द्यावी आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात २० जागा द्याव्यात,’ अशी मागणी खासदार रामदास आठवले यांनी रविवारी केली.

दिरंगाईच्या गाळात मेट्रो

$
0
0
पुण्याच्या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलेल्या इराद्याला २४ तास उलटण्याच्या आतच, केंद्र सरकारने मेट्रो प्रस्तावाच्या फेरतपासणीचे करण्याचे सूतोवाच केले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images