Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘माळीण’ मृतांच्या वारसांना पिंपरी पालिका मदत देणार

$
0
0
माळीण दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन आणि महापालिकेच्या वतीने २५ लाख रुपयांचा निधी देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत सोमवारी (चार ऑगस्ट) एकमताने मंजूर करण्यात आला. अध्यक्षस्थानी महापौर मोहिनी लांडे होत्या.

काँग्रेसने इच्छुकांकडून अर्ज मागविले

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात आले आहेत, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी दिली. यासंदर्भात प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी काँग्रेसच्या सर्व जिल्हाप्रमुखांना पत्र पाठविले आहे.

दरडीचा मावळातील तुंग किल्ल्याला धोका

$
0
0
मावळातील तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गणपती मंदिर परिसरात दीड किलोमीटर लांब व सात ते आठ फूट खोल जमिनीला भेगा पडल्या आहेत. किल्ल्याच्या पायथ्याशीच तुंग गावठाण आहे. गावात एकूण सव्वाचे कुटूंब असून, सातशे लोकवस्ती आहे.

पवना धरण ८२ टक्के भरले

$
0
0
पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण ८२ टक्के भरले आहे. पाऊस न थांबल्यास कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असून, नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

लोणावळ्यात १२० मिलिमीटर पाऊस

$
0
0
जोरदार पावसामुळे मावळातील अनेक नद्या नाल्यांना पूर आला आहे. अनेक पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. लोणावळ्यात सोमवारी (चार ऑगस्ट) १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मराठी भाषा धोरणाचा मसुदा अंतिम टप्प्यात

$
0
0
मराठी भाषेच्या विकासासाठीच्या पुढील पंचवीस वर्षांचे धोरणाच्या मसुदा लेखनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महिन्याभरात मसुद्याचे लेखन पूर्ण करून तो राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे.

‘सापुतारा मान्सून’ १६ सप्टेंबरपासून

$
0
0
पावसाळी पर्यटनाविषयी वाढत असलेल्या आकर्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी गुजरात पर्यटन महामंडळाने येत्या १६ ते ७ सप्टेंबर दरम्यान सापुतारा मान्सून महोत्सव आयोजित केला आहे.

महागाईची झळ बाप्पांनाही

$
0
0
बाजारपेठेतील महागाईची झळ गणपती बाप्पांनाही काही प्रमाणात बसणार आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांतील चढ-उतार, कच्च्या मालाच्या किमतीतील वाढ आदी कारणांमुळे मूर्तींच्या किमतीमध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

‘सिंटेल’कडून आयटी करंडक ‘हायजॅक’

$
0
0
आयटी कंपन्यांतील तरुणांना रंगमंचावर आणणाऱ्या आयटी करंडक स्पर्धेत सिंटेल कंपनीच्या ‘हायजॅक’ एकांकिकेने सांघिक प्रथम पारितोषिक पटकावले. अॅक्सिस टेक्निकलच्या ‘वन बॉल टू गो’ला द्वितीय आणि कॉग्निझंटच्या ‘मॅनिक्वीन’ला तृतीय पारितोषिक मिळाले.

फक्त शैक्षणिक प्रवेशांचे दाखले देण्याची व्यवस्था

$
0
0
महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केल्यामुळे नागरी सुविधा केंद्रातील दाखल्यांच्या कामावर परिणाम झाला आहे. मात्र, शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

ITI साठी आजपासून नव्याने विकल्प शक्य

$
0
0
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना आज, मंगळवारपासून नव्याने ऑप्शन्स (विकल्प) सादर करता येणार आहेत. आयटीआयच्या ऑनलाइन प्रवेशासाठीची तिसरी फेरी सुरू होत असून यासाठी विद्यार्थ्यांना पूर्णपणे नवे ऑप्शन देता येणार आहेत.

सक्तीच्या इंटर्नशिपला तुटपुंजा मोबदला

$
0
0
एकीकडे अभ्यासक्रमाचा सक्तीचा भाग म्हणून आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप सक्तीची करण्यात आली असली, तरी या दरम्यानच्या काळात त्यांना मिळणाऱ्या मोबदल्याविषयी कोणतेही निकष नाहीत. त्यामुळे शहरातील शिकाऊ आर्किटेक्चरना काही हजारांच्या तुटपुंज्या मोबदल्यावरच उमेदवारीचा काळ काढावा लागत आहे.

दोघा दुचाकीचोरांकडून चोरीच्या दहा दुचाकी जप्त

$
0
0
गुन्हे शाखेच्या युनिट एक या पथकाने दोघा दुचाकी चोरांना अटक करत त्यांच्याकडून चोरीच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत. या चोरट्यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यात १२ दुचाकी चोरल्याची माहिती दिली आहे.

दहा लाखांच्या खंडणीप्रकरणी तीन जणांना अटक

$
0
0
बांधकाम व्यावसायिकाला दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सोलापूर येथील एका आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. या व्यावसा​यिकाच्या ऑफिसमधील दोघांनीच खंडणी मागण्याचा कट रचल्याचे उघड झाले आहे.

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

$
0
0
औंध येथील जकात नाक्यावर रविवारी सकाळी दुचाकीस्वाराला उडवूत पळून गेलेल्या कार चालकाविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे कर्मचारी भरत इंदलकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

तीन ठिकाणी साखळीचोरी

$
0
0
सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्यांनी रविवारी सुटी साजरी करत सोनसाखळी हिसकावण्याचे चार गुन्हे केले. या चारही घटनांमध्ये सुमारे साडे तीन लाख रुपयांचे दागिने हिसकावण्यात आले आहेत. या प्रकरणी ​वारजे, कोथरूड, ​विश्रामबाग आणि हिंजवडी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

बापू पठारेंच्या पत्नीनेच केले बेकायदा बांधकाम

$
0
0
शहरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करावीत, या मागणीसाठी आंदोलन करून प्रसंगी राजीनामा देण्याची भाषा करणाऱ्या आमदार बापू पठारे यांच्या कुटुंबीयांनीच बेकायदा बांधकाम केल्याचे समोर आले आहे.

मंगळवारी मुसळधार

$
0
0
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र अशा दोन्ही बाजूंनी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने पुण्यासह राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. पुण्यात रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार सोमवारी सायंकाळपर्यंत कायम होती.

जलतरण तलावांवरील निर्बंध उठविले

$
0
0
धरणांमध्ये पुरेसा साठा झाला असल्याने जलतरण तलाव आणि बांधकाम प्रकल्पांवरील निर्बंध पालिकेने सोमवारी मागे घेतले. सुरुवातीच्या टप्प्यात बोअर आणि विहिरीचे पाणी वापरणारे तलाव आणि बांधकाम प्रकल्प सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

खडकवासला, मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग

$
0
0
धरणांच्या परिसरात झालेल्या पावसामुळे खडकवासला व मुळशी धरणाचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले असून खडकवासला धरणातून १३ हजार ४०० क्युसेक आणि मुळशीतून ३५ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images