Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आव्हान दुर्गंधीचे

$
0
0
माळीण गावात मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात येत असलेले मृतदेह संपूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असून त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरू लागली आहे. मृतदेह सडले असल्याने ते ओळखणेही अवघड झाले आहे. शनिवारी चौथ्या दिवस अखेरपर्यंत ८२ मृतदेह बाहेर काढण्यात आले.

काही तासांतच कचराकुंडी ‘चकाचक’

$
0
0
प्रशासनाने मनात आणले तर तुडूंब भरलेली कचराकुंडी अवघ्या काही तासांमध्ये स्वच्छ होऊ शकते, याचा प्रत्यय सिंहगड रोडवरील अमृतानंद सोसायटीतील नागरिकांना आला. गेले आठ ते दहा दिवस भरून वाहणारी कचराकुंडी अवघ्या काही तासांतच स्वच्छ करण्यात आली.

औंध क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा अभिनव संकल्प

$
0
0
औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त येत्या वर्षभर जनतेची कामे वेळेत करण्याचा संकल्प कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी ऑगस्ट १९९०मध्ये औंध क्षेत्रीय कार्यालयाची स्थापन करण्यात आली.

अंजनगाव पाणी योजना ‘पाण्या’त

$
0
0
अवर्षणग्रस्त स्थिती, जुलै महिना संपल्यानंतर पावसाने दिलेली हुलकावणी, त्यामुळे खरिपाच्या पिकांची झालेली पंचाईत, पिण्याच्या पाण्याची गंभीर स्थिती आदी प्रश्न बारामतीसमोर आवासून उभे असताना सुरू असणाऱ्या राजकारणामुळे बारामतीकरांची अवस्था दयनीय झाली आहे.

निम्हणांचा मंत्रिपदाचा दुष्काळ महायुतीच संपवेल : बारणे

$
0
0
आगामी विधानसभा ​निवडणुकीनंतर महायुत्ती सत्तेत येईल आणि त्याचवेळी आमदार विनायक निम्हण यांच्या मंत्रिपदाचा दुष्काळ संपेल असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

धानोरीत नाल्यावरच बांधकामांचा राडारोडा

$
0
0
धानोरी परिसरात बांधकामांचा राडारोडा नाल्याच्या शेजारी टाकण्यात येत असल्याने परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. नाल्यावरच राडारोडा टाकण्यात आल्याने नाल्याचे अस्तित्वच नष्ट होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

आळंदी रस्त्यावर सेनेचे ‘खिळेतोड’ आंदोलन

$
0
0
आळंदी रस्त्यावर अनेक ठिकाणी प्लास्टिकचे गतिरोधक मोठे खिळे ठोकून बसविण्यात आले आहेत. मात्र या रस्त्यावर सातत्याने असणाऱ्या जड वाहतुकीमुळे हे गतिरोधक उखडल्याने खिळे बाहेर आले आहेत. या खिळ्यांमुळे वाहनांची चाके पंक्चर होऊन अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

‘नगरसेवक तुमच्या दारी’ व्हाया फिरते संपर्क केंद्र

$
0
0
पथदिवे बंद आहेत, खोदलेला रस्ता दुरूस्त करा, पाण्याची गळती आहे, पाणी कमी दाबाने येते, कचरा साठला आहे, सांडपाण्याचे चेंबर तुंबले आहे... या आणि अनेक समस्या सांगण्यासाठी नागरीक नगरसेवकाच्या संपर्क कार्यालयात खेटे घालतात.

खेड तालुक्यात भातलावणी वेगात

$
0
0
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांचे भात हेच प्रमुख पीक आहे. यावर्षी संपूर्ण जून महिना पावसाअभावी कोरडा गेला. शेतकऱ्यांनी महत्प्रयासाने पाण्याची उपलब्धता करून भात रोपे जगवली. मात्र, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने पुनरागमन केल्याने भात रोपांना नवसंजीवनी मिळाली आहे.

राहुल कुल गट ठोकणार राष्ट्रवादीला अलविदा?

$
0
0
भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांच्या निर्धार मेळाव्याने दौंड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट अटळ आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनमत काय आहे, याची जाणीव झाल्याने कुल गट पवारांच्या छत्रछायेतून बाहेर पडणार असल्याची शक्यता आहे.

पर्यावरण रक्षणासाठी विशेषानुदान

$
0
0
राज्य सरकारने राज्यातील जिल्हा परिषदांना पर्यावरण विकास आराखडा तयार करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेने १९ ग्रामपंचायतींचा आराखडा तयार केला असून, त्यांना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदानांतर्गत पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

आवक वाढली सीताफळचे दर घटले

$
0
0
पुणे जिल्ह्याच्या भागातून सीताफळांची हंगामातील सर्वाधिक आवक गुलटेकडीच्या मार्केट यार्डात झाल्याने रविवारी त्याच्या किलोच्या दरात २५ टक्क्यांनी घट झाली. दर घटल्याने पल्प उत्पादक, ज्युसविक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात सीताफळांची रविवारी खरेदी केली.

पत्नीचा छळ : डॉक्टर पतीला सक्तमजुरी

$
0
0
पहिल्या पत्नीचा छळ करून तिला घटस्फोट न देता दुसरे लग्न केल्याप्रकरणी एका डॉक्टरला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. सरदार यांनी तीन वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

वादकांचा सन्मान प्रथमच

$
0
0
‘कुठल्याही गाण्याच्या प्रसिद्धीनंतर लोकप्रियता मिळते ती गायक, गीतकार आणि संगीतकारांना. मात्र, गाणं हे एक ‘टीमवर्क’ आहे. ते लोकप्रिय होण्यासाठी संगीत साथ केलेल्या वादकांचा त्यात सिंहाचा वाटा असतो.

ना. गोखले यांचे पहिले चरित्र मराठीत

$
0
0
महात्मा गांधी यांचे राजकीय गुरू नामदार डॉ. गोपाळ कृष्ण गोखले यांचे ‘महात्मा गोपाल कृष्ण गोखले’ हे पहिले चरित्र आसामी भाषेतून ९४ वर्षांनी मराठीत आले आहे. डॉ. गोखले यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारी बरीच पुस्तके आता उपलब्ध असतानाही आसामी इतिहासकार डॉ. सूर्यकुमार भुयां यांनी गोखले यांच्या निधनानंतर आसामी भाषेत लिहिलेल्या पहिल्या चरित्राचा मराठीत अनुवाद होण्याची घटना महत्त्वाची आहे.

विनयभंग : तरुणाला सक्तमजुरी

$
0
0
घरात घुसून विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणाला एक वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सचिन खाडे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

लोणावळ्यातही माळीणची पुनरावृत्ती?

$
0
0
लोणावळा-खंडाळ्यात बांधकाम व्यावसायिक, पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी या भागातील टेकड्यांचे उत्खनन केले आहे. जुन्या खंडाळ्यातील अंधवृद्धाश्रमाजवळील टेकडीचे उत्खनन करून सपाट केल्यामुळे या परिसराला माळीण गावासारखा धोका निर्माण झाला आहे.

चिखलीत जमीन खचली

$
0
0
चिखली येथील अल्पाइन प्लाझा या इमारतीच्या आवारात अचानक मोठे भगदाड पडले असून या घटनेमध्ये एक महिला जखमी झाली आहे. इमारतीचा पाया भुसभुशीत असल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

भुशी डॅममध्ये तरुण-तरुणीचा मृतदेह

$
0
0
लोणावळ्याजवळील भुशी डॅमच्या जलाशयात एका तरुण व तरुणीचा मृतदेह रविवारी सायंकाळी साडेचाच्या दरम्यान तरंगताना पर्यटकांना आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांचे हात एकमेकांना बांधलेले असल्याने हा प्रकार आत्महत्येचा आहे की खुनाचा याची चौकशी पोलिस करत आहेत.

सीमावर्ती भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी

$
0
0
‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठी बांधवांच्या पाठीमागे शिवसेना खंबीरपणे उभी राहील,’ अशी ग्वाही केंद्रीय अवजड व उद्योगमंत्री अनंत गीते यांनी येथे दिली. कोर्टाचा निर्णय होईपर्यंत येल्लूर-बेळगाव परिसर केंद्रशासित जाहीर करावा, या मागणीचा पुनरुच्चारही गीते यांनी या वेळी केला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images