Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

माळीण दुर्घटनाग्रस्तांना हवी मदत

0
0
आंबेगाव तालुक्यातील डोंगराखाली दबल्या गेलेल्या माळीण गावातील दुर्घटनाग्रस्तांना ‘मुख्यमंत्री सहायता निधी’मध्ये धनादेशाद्वारे मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

देर आए , दुरुस्त आए...

0
0
कट प्रॅक्टिसबाबत मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे राज्य अध्यक्ष दिलीप सारडा यांच्याशी केलेली बातचीत...

माळीणमधील वीजपुरवठा पूर्ववत

0
0
डोंगरकडा कोसळून दगड, मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलेल्या माळीण गावातील वीजपुरवठा महावितरणने शनिवारी दुपारी पूर्ववत केला. माळीण गावातील वीजयंत्रणा जमीनदोस्त झालेली होती. महावितरणकडून वीजयंत्रणा उभारण्याचे व दुरुस्तीचे काम करण्यात आले.

रोगराईच्या प्रतिबंधाकरिता माळीणमध्ये औषध फवारणी

0
0
आंबेगाव तालुक्यातील माळीण गावामध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचे शोधकार्य सुरू असल्याने रोगराई रोखण्यासाठी या परिसरात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पालिकेच्या वतीने औषध फवारणी करण्यात येणार आहे.

भूस्खलनानंतरच्या पुनर्वसनाची ऐशीतैशी

0
0
जुन्नर तालुक्यातील तळमाची गावाच्या वरच्या बाजूस असलेल्या डोंगरावर नऊ वर्षांपूर्वी भूस्खलन होऊन गावाच्या पुनर्वसनाचा निर्णय झाला. मात्र, या पुनर्वसनासाठी लाखो रुपये खर्च करूनही गावकऱ्यांना उजाड छपरांच्याच घरात राहण्याची वेळ आली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा पुण्याला मेट्रोचे गाजर

0
0
केंद्र सरकारकडून मेट्रोला अद्याप अंतिम मान्यता नाही... केंद्र आणि राज्याच्या बजेटमध्ये मेट्रोसाठी ‘शून्य’ तरतूद... मेट्रोसाठीच्या स्वतंत्र कंपनीची स्थापना प्रलंबित... मेट्रो बाधित झोनवरील हरकती-सूचनांची सुनावणी अपूर्ण... मेट्रोसाठी पूर्णवेळ अधिकारी नाही...

७० घरे गाडली?

0
0
रोगराई पसरू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून बचाव कार्य करणाऱ्या लोकांना आवश्यक साहित्य देण्यात आलेले आहे. औषधांचा पुरेसा साठा करून ठेवलेला आहे.

खडकवासला वीजनिर्मितीचा मुहूर्त लांबणीवर

0
0
महापालिकेच्या बंद पाइपलाइनचे काम रेंगाळल्यामुळे खडकवासला धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प आणखी किमान सहा महिने लांबणीवर पडला आहे. कालव्यातील पाण्यामुळे वीजनिर्मिती प्रकल्पाच्या पायाखोदाईच्या कामात अडचण येत आहे.

‘गुणांचा आदर करण्याची पुण्याची परंपरा’

0
0
‘डॉ. रघुनाथ माशेलकर आणि डॉ. सदानंद मोरे यांच्यासारखे विद्वान ही महाराष्ट्राकडून देशाला मिळालेली देणगीच आहे. गुणांचा आदर करण्याची पुण्या

रस्ते, फूटपाथवर मूर्ती विक्री स्टॉल नकोत

0
0
शहरातील रस्ते वाहतुकीला मोकळे राहावेत, या दृष्टीने विविध भागांमध्ये उभारण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती विक्री स्टॉलना रस्ते, फूटपाथ आणि सायकल ट्रॅकवर परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी केली जात आहे.

सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कमी

0
0
शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही पुण्यात पावसाचा जोर कमी होता. शहराच्या काही भागात पावसाच्या काही सरी कोसळल्या. सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरात २.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी शहरात पावसाच्या काही हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

‘शेतकरी व शास्त्रज्ञांनाच दुसऱ्या हरितक्रांतीचे श्रेय’

0
0
‘काळ्या आईवर प्रेम करणारा शेतकरी आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संशोधन करणारे शास्त्रज्ञ यांनाच देशातील दुसऱ्या हरितक्रांतीचे श्रेय आहे,’ असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी केले.

‘PMP’ची धडक : महिलेचा मृत्यू

0
0
भरधाव वेगाने जात असलेल्या ‘पीएमपी’ने धडक दिल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास साधू वासवानी चौकात ही घटना घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी ‘पीएमपी’च्या चालकाला अटक केली आहे.

निम्हण यांच्या पक्षप्रवेशास भाजपजनांचा जोरदार विरोध

0
0
आमदार विनायक निम्हण यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चेने निर्माण झालेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण राज्यमंत्री आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी राव इंद्रजितसिंह हे आज (रविवारी) मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.

‘कर्तृत्ववान व्यक्तींचे विचार सर्व घटकांपर्यंत पोहचावेत’

0
0
‘छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तींना आपण केवळ एका समाजापुरते मर्यादित ठेवले आहे. त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व, त्यांच्या विचारांची व्यापकता सर्व समाजाला मार्गदर्शक ठरणारी असल्याने समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवायला हवी’, अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली.

पुणे मेट्रो लवकरच धावेल

0
0
‘पुणे शहराच्या मेट्रोला यापूर्वीच मान्यता देण्यात आलेली आहे. आता लवकरात लवकर त्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचा प्रयत्न असून, पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये लवकरच मेट्रो धावेल, असा विश्वास पुणेकरांना द्यायचा आहे,’ असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी पुण्यात सांगितले.

राज्याचा धरणसाठा ४८ टक्क्यांवर

0
0
गेल्या दिवसांत झालेल्या पावसामुळे राज्यातील प्रमुख धरणांचा जलसाठा ४८ टक्क्यांवर पोहोचला असून जलसाठ्यांची स्थिती सुधारली आहे. मराठवाडा आणि नाशिक विभागामधील धरणांमध्ये तुलनेने कमी पाणीसाठा झाला आहे. या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

‘त्रिपाठींचे वक्तव्य संधिसाधूपणाचे’

0
0
‘राष्ट्रवादी काँग्रेसने इतकी वर्षे काँग्रेससोबत सत्ता उपभोगली. त्या वेळी त्यांना आमच्यातील दोष दिसले नाहीत. आता लोकसभेच्या निवडणुकीत लागलेल्या धक्कादायक निकालानंतर सर्वांना शहाणपण सुचत आहे. डी. पी. त्रिपाठी यांचे वक्तव्य हे संधिसाधूपणाचे आहे,’ अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

‘डीएसके’चे एनसीडी बाजारात

0
0
बांधकाम क्षेत्रातील डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीने भांडवल उभारणीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये दर्शनी मूल्य असलेले नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (एनसीडी) बाजारात आणले आहेत.

इंजिनीअरिंगला इंटर्नशिप सक्ती?

0
0
इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना उद्योगविश्वातील इंटर्नशिप सक्तीची होण्याची शक्यता आहे. त्या विषयीचा निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) विचाराधीन आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून विद्यार्थ्यांच्या विविध प्रकल्पांची माहिती ‘एआयसीटीई’कडे एकत्रित केली जात आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images