Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पटेल हॉस्पिटलमध्ये आता दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटरमध्ये लॅप्रोस्कॉपी उपकरणे घेण्यात येणार असल्याने, या परिसरातील नागरिकांसाठी दुर्बिणीद्वारे श​स्त्रक्रिया करण्याची सेवा उपलब्ध होणार आहे.

पोलिस ठाण्याला ‘इन्सास’ रायफल आणि २० ‘SLR’

$
0
0
फरासखाना पोलिस ठाण्यात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पोलिस ठाण्याला दोन ‘इन्सास’ रायफल, वीस ‘एसएलआर’ आणि दोन १२-बोअर पंप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहशतवादी कृत्ये तसेच गुन्हेगारांच्या बिमोडीसाठी पोलिस ठाण्यांची शस्त्रसज्जता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलिस मुख्यालयाला कडक सुरक्षा

$
0
0
फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यास सुरुवात केली आहे. मुख्यालयात येण्याऱ्या मार्गांवरील सुरक्षा, मुख्यालयाच्या सुरक्षा भिंती, ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे तसेच शस्त्रागाराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मराठा-मुस्लिम जातीचे दाखले देण्यास सुरुवात

$
0
0
मराठा आणि मुस्लिम आरक्षणानंतर दोन्ही समाजांमधील विद्यार्थ्यांना जात दाखले आणि नॉन क्रिमीलेअर दाखल्यांचे वितरण करण्यास सुरूवात झाली आहे. सरकारने लागू झालेल्या आरक्षणाचा लाभ या दाखल्यांआधारे घेणे शक्य होणार आहे.

खंडपीठासाठी शिफारस पत्रे मागविणार

$
0
0
पुण्यात मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ व्हावे या मागणीला लोकांकडून पा​ठिंबा मिळावा यासाठी पुणे बार असोसिएशनतर्फे पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच आणि पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील नगरसेवकांना पत्र पाठविण्यात येणार आहे.

नागरिकांनी पाडला प्रश्नांचा पाऊस

$
0
0
अनधिकृत स्टॉल आणि पार्किंगबाबत पोलिसांची भूमिका काय, बालभारती आणि पौड रोडला जोडणाऱ्या डीपी रोडचे काय झाले, राहुलनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ‘नो एंट्री’ रद्द करता येईल का, वनाज चौकातील वाहतूक कोंडीचे काय, स्टँप ड्युटी भरलेली असताना कन्व्हेअन्स डीड करताना एलबीटी का भरावा लागतो, अशा प्रश्नांचा पाऊस नागरिकांच्या मेळाव्यात पडला.

पुणेकरांना पाहता येणार ‘हेरिटेज रणगाडे’

$
0
0
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धासह भारतीय सैन्याच्या सर्व लढायांमध्ये शत्रूला धूळ चाळणारे रणगाडे आता पुणेकरांना पाहता येणार आहेत. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे खडकीतील ‘सीएएफव्हीडी’जवळ उभारण्यात येत असलेल्या एन्व्हायर्न्मेंट पार्कमध्ये नागरिकांना हे रणगाडे पाहता येतील.

भुशी डॅममध्ये बुडून युवक मृत्युमुखी

$
0
0
वर्षाविहार व पर्यटनासाठी आलेल्या चिंचवड येथील युवकाचा लोणावळ्यातील भुशी डॅमच्या बांधावरून पाय घसरल्याने त्याचा डॅममध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.

बॅच मिक्स प्लांटची सक्ती रद्द करावी

$
0
0
राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी बॅच मिक्स प्लांट वापरण्याची ठेकेदारांवर लादलेली अट तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी रोड काँट्रॅक्टर्स असोसिएशनच्या पुणे जिल्हा शाखेतर्फे करण्यात आली आहे.

पुणे-पिंपरीतील ढोलपथकांची संख्या १३५ वर

$
0
0
पुण्याच्या गणेशोत्सवाचे आकर्षणाचा केंद्रबिंदू झालेल्या ढोलपथकांची संख्या १३५पर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सुमारे अठरा ढोलपथके वाढली असून, सुमारे वीस पथकांची महासंघाकडे नोंदणी झालेली नाही.

परिस्थितीला कंटाळून अपंगाची आत्महत्या

$
0
0
आयुष्यात आलेल्या परिस्थितीला कंटाळून येरवड्यातील अपंग युवकाने नदीपात्रात उडी मारून जीवन संपवले. ही घटना बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

अतिरिक्त औषधसाठा ठेवणाऱ्या डॉक्टरांवर ‘वॉच’

$
0
0
‘शेड्युल के’नुसार अत्यावश्यक औषधांपेक्षा अतिरिक्त औषधांचा साठा ठेवणाऱ्या पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, तसेच जिल्ह्यातील काही डॉक्टरांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ‘वॉच’ ठेवला आहे. तसेच पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टरांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भुयारी मार्गातून येणाऱ्या चारचाकी वाहनांवर कारवाई

$
0
0
वाकडेवाडीमधील भुयारी मार्गातून येणाऱ्या चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली. बुधवारी सकाळपासूनच शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेच्या वतीने ही मोहीम वाकडेवाडी येथील साखर संकुलाच्या प्रवेशद्वारावरील चौकात राबवण्यात आली.

५० हजार लोकांसाठी अवघे ११ डॉक्टर

$
0
0
पुणे विभागात कार्यरत असणाऱ्या रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची संख्या ५० हजार असली तरी दुसरीकडे रेल्वे हॉस्पिटलमध्ये त्यांच्या तपासणीसाठी फक्त ११ डॉक्टर उपलब्ध असल्याचे समोर आले आहे.

पिंपरीकरांना दररोज पाणी

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना एक दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय रद्द केला असून, आजपासून (गुरुवार) पुन्हा दिवसातून एक वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे.

राज्यभर व्यापला पाऊस

$
0
0
मध्य प्रदेशच्या पश्चिम भागावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होऊ लागली असली तरीही बुधवारी राज्याच्या अनेक भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. येत्या काही दिवसांमध्ये विदर्भातील पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

सिंहगड रस्त्याने आले संशयित

$
0
0
फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात बॉम्ब ठेवणारे संशयित सिंहगड रोडने बाजीराव रोडपर्यंत आल्याची माहिती ‘सीसीटीव्ही’ फुटेजमध्ये स्पष्ट झाली आहे. संशयित साताऱ्यावरून हायवेने सिंहगड रोडवर गेले की त्यांनी सिंहगड रोड, धायरी अथवा त्या परिसरात स्फोटांपूर्वी काही दिवस वास्तव्य केले होते, याचा आता तपास सुरू आहे.

कंडक्टर भरती प्रक्रिया स्थगित

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) मोठा गाजावाजा करून जाहीर केलेली कंडक्टर भरती प्रक्रिया स्थगित करण्याची नामुष्की संचालक मंडळावर बुधवारी ओढविली. ताफ्यात पुरेशा बस उपलब्ध नसताना कंडक्टरची भरती करून त्यांची फसवणूक करण्यापेक्षा सर्व प्रक्रियाच थांबविण्याचे आदेश संचालक मंडळाने प्रशासनाला दिले.

कँटोन्मेंट बोर्डाने घेतले प्लास्टिक विघटन मशिन

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हडपसर येथील कचरा डेपोतील कचऱ्यामध्ये प्लास्टिकचे प्रमाण वाढले असताना, कचऱ्याचे विघटन करण्यासाठी बोर्डाने व्हायब्रो स्क्रिनिंग मशिन घेतले आहे. त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया करणे सोपे होणार आहे.

लालबागला वेगळा न्याय का?

$
0
0
विसर्जन मिरवणुकीवरून पोलिस विरूद्ध गणेश मंडळ असा वाद रंगण्याची चिन्ह आहेत. 'लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकी प्रमाणे आम्हालाही रात्री दोन वाजेपर्यंत परवानगी द्या. एकाच राज्यात दोन वेगवेगळे न्याय का?' असा सवाल पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या अध्यक्षांनी पोलिसांना केला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images