Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

राज्यातील गरिबांचा ‘गृह कोटा’ उलटणार?

$
0
0
आर्थिक मागास घटकांतील नागरिकांसह अल्प व मध्यम उत्पन्न गटातील गरजूंना हक्काच्या घरासाठी बांधकाम प्रकल्पांमध्ये २० टक्के ‘कोटा’ राखीव ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय अंगलट येण्याची दाट शक्यता आहे.

कामशेतजवळ अपघात; ३ जणांचा मृत्यू

$
0
0
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कामशेतजवळ पाथरगावच्या हद्दीमध्ये फॉरच्युन कार आणि टँकरची एकमेकांना धडक बसून मंगळवारी दुपारी झालेल्या अपघातामध्ये तीन जण ठार झाले.

पोलिस भरतीसाठी बनावट कागदपत्रे

$
0
0
वानवडी येथे राज्य राखीव दलाच्या मैदानावर सुरू असलेल्या भरतीमध्ये कबड्डीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून भरतीचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांचा ‘व्हॉट्स अप’ ग्रुप

$
0
0
‘व्हाटस् अप’वरून पसरणाऱ्या अफवांना रोखण्यासाठी पोलिसांनी ‘व्हाटस् अप’चाच आधार घेतला आहे. दस्तुरखुद्द पोलिस आयुक्त सतीश माथूर यांनीच लोकप्रतिनिधींचा एक ग्रूप तयार करून अफवांबद्दलची वस्तुस्थिती सांगण्यास सुरुवात केली आहे.

सिंहगडचा घाट रस्ता बंद

$
0
0
सिंहगड घाट रस्ता ‘चकाचक’ होऊन काही महिनेही झाले नसताना मंगळवारी पहाटे घाट रस्त्यावर दोन ठिकाणी दरड कोसळली. यातील दगड मोठे असल्याने रस्ता बंद झाला आहे.

डेंगीसदृश्य ताप ४० % पेशंट

$
0
0
अधूनमधून कोसळणारा पाऊस... मध्येच पडणारे ऊन... यासारख्या बदलत्या हवामानामुळे शहरात चाळीस टक्के नागरिकांना डेंगीसदृश्य तापाची लक्षणे आढळत असल्याचे निरीक्षण वैद्यकतज्ज्ञांनी नोंदविले आहे. तर, लहान मुले सर्दी, ताप, खोकल्याने हैराण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

पाणीमाफिया मोकाटच

$
0
0
शहरातील नागरिकांच्या हक्काचे पाणी पालिकेकडून माफक दराने घेत हद्दीतील आणि हद्दीबाहेरील नागरिकांना चढ्या दराने विकणाऱ्या पाणीमाफियांवर कारवाई करण्याचा पालिकेचा इशारा केवळ ‘बोलाची कढी’ ठरल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले.

‘MPSC’तील ‘घुसखोरी’ उघड

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) निवडल्या जाणाऱ्या जिल्हा उपनिबंधक पदावर निवड झाल्याची बनावट कागदपत्रे सादर करून थेट राज्य प्रशासनात नोकरी मिळवण्याचा व त्याकरिता आवश्यक असलेले प्रशिक्षण घेण्याचा एका महिलेचा धक्कादायक प्रयत्न उघडकीस आला आहे.

प्लँचेटचे ‘पोळ’खोल

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासाठी प्लँचेटचा आधार घेतला नसल्याचे पुण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात प्लँचेटचा वापर केल्याची कबुली त्यांनी दिल्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पत्रकार आशिष खेतान यांनी एका वृत्तवाहिनीद्वारे जारी केले आहे.

मोहन नाडकर्णी यांचे निधन

$
0
0
भारतीय संगीतक्षेत्रातील एक ज्येष्ठ अभ्यासक आणि लेखक मोहन नाडकर्णी यांचे न्युझीलंडमधील ऑकलंड येथे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. नाडकर्णी ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज, बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. नाडकर्णी यांचे संगीत क्षेत्रावर लिहिलेलं विपुल साहित्य प्रसिद्ध झालेलं आहे.

मराठा-मुस्लिम जातीचे दाखले सुरु

$
0
0
मराठा आणि मुस्लिम आरक्षणानंतर दोन्ही समाजांमधील विद्यार्थ्यांना जात दाखले आणि नॉन क्रिमीलेअर दाखल्यांचे वितरण करण्यास सुरूवात झाली आहे.

पुणे-सातारा महामार्ग धोकादायक

$
0
0
पुणे-सातारा महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरू असून, पावसामुळे सध्या काम बंद आहे. सध्या या मार्गावरील जुन्या व नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरील लेनदर्शक पट्टे नाहीसे झाले आहेत. तसेच पुलांसाठी खणलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका आहे.

भात रोपवाटीकेसाठी १००% अनुदान

$
0
0
पावसाने या वर्षी ओढ दिल्यामुळे तालुक्यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक भात रोपवाटिका खराब झाल्या तर, काहींची उगवण झाली नाही, काही भागांत पेरण्याच झाल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना भातलावणीसाठी रोपेच नाहीत.

पर्यटकांनी फुलला माळशेज घाट

$
0
0
उशीरा का होईना बरसलेल्या पावसाने मान्सून डेस्टिनेशन असलेल्या माळशेज घाटात, धबधबे खळखळू लागले आहेत. चिंब पावसात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी घाटात पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. विशेष म्हणजे, पर्यटन आणि सांस्कृतिक विभागामार्फत घाटातल्या धबधब्यांचा परिसर तसेच व्ह्यू पॉइंट सजविण्यात आला आहे.

बारामतीला छावणीचे स्वरूप

$
0
0
अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाने बारामतीत सुरू केलेल्या आंदोलनाला गोलबोट लागणार नाही आणि बारामतीमधील शांतता अबाधित राहील, यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महासंचालक रितेश कुमार याच्यासह कोल्हापूर परिक्षेत्राच्या अखत्यारीत असलेल्या चार जिल्ह्यांचा पोलिस बंदोबस्त बारामतीत तैनात करण्यात आला आहे.

सार्वजनिक रस्ता टाउनशिपच्या दिमतीला

$
0
0
साडेसतरानळी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आरपी रोड अमनोरा टाउनशिपने सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद केला आहे. नियमांचे उल्लंघन करून बंद केलेला रस्ता हा सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करावा तसेच या मार्गावरील अतिक्रमण काढून टाकावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

मुंढवा-खराडी होणार नवा पूल

$
0
0
मुंढवा-केशवनगर-खराडी परिसरातील नागरिकांना अरुंद पुलावरून जाताना सहन करावी लागणारी वाहतूककोंडी लवकरच दूर होण्याची चिन्हे आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या पुलाशेजारी समांतर पूल बांधण्यास पालिकेने मान्यता दिली असून, पुढील महिन्यात नव्या पुलाचे भूमिपूजन होणार आहे.

‘बीआरटी’ नव्हे, ‘लकाकणारा हत्ती’

$
0
0
आळंदी-नगर रोडवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जलद करण्यासाठी ‘बीआरटी’साठी स्वतंत्र मार्ग तयार केले असले तरी या मार्गावरून बस धावण्यास किमान वर्षभर विलंब लागणर आहे. असे असतानाही या मार्गांवरील बस स्टॉपवर रात्री दिवे सुरूच ठेवण्यात येत आहेत.

आरक्षण अव्हेरल्याने नोकर भरतीस स्थगिती

$
0
0
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने कात्रज दुग्धालय येथे दूध संघाच्या निर्मितीपासून ते आजतागायत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचा अनुशेष न भरता केलेल्या नोकर भरतीस राज्य सरकाने स्थगिती दिल्याची माहिती पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कामगार संघटनेचे अध्यक्ष डी. के. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कँटोन्मेंटच्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलत

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाकडून प्रॉपर्टी टॅक्समध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, संबंधित ज्येष्ठ नागरिक हे स्वतः मालक असणे आणि प्रॉपर्टी निवासी असण्याची अट घालण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images