Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शास्त्रीय संगीताचा ‘नादवेध’

0
0
रागदारी संगीत क्लिष्ट आणि वेळखाऊ असल्याची एक सर्वसामान्य रसिकांची नेहमीची तक्रार असते. हा विस्तृत आणि त्यांच्यासाठी गुंतागुंतीचा असणारा विषय सोपा करण्यासाठी तसेच त्यांना शास्त्रीय संगीताची गोडी लावण्याच्या उद्देशानं ‘नादवेध’ या स्वरमैफलीचं आयोजन करण्यात आलं आहे.

जपानलाही भावलं ‘खेळ मांडला’

0
0
भाषा भलेही वेगळ्या असतील; पण भावना सगळीकडे सारख्याच असतात. नटरंग सिनेमातलं ‘खेळ मांडला’ गाणं म्हणून ‘ओसाका’, ‘वाकायामा’ आणि ‘टोकिओ’ या शहरांमध्येही रंगलं. नुसतंच रंगलं नाही, तर जपानी लोकांनी या गाण्याला दादही दिली.

या चिमण्यांनो परत फिरा...

0
0
रेडिओ... सकाळी मस्त पेपर वाचता वाचता किंवा गरमागरम चहा घेत नवी-जुनी गाणी ऐकण्याचा सुंदर अनुभव देणारं साधन. माणसाचं रेडिओशी एक छान नातं अजूनही टिकून आहे. रेडिओवरील गाण्यांच्या चाहत्यांना रेडिओयुगाचा आनंद देणाऱ्या ‘या चिमण्यांनो परत फिरा’ या कार्यक्रमाचं आयोजन कल्पक संगीत साधना संस्थेनं केलं आहे.

खडकवासल्यातून दौंडला पाणी सोडावेःCM

0
0
पुणे शहराला लागणारे पाणी आणि धरणांतील प्रत्यक्ष पाणीसाठा याचा अंदाज घेऊन दौंड व इंदापूरला खडकवासला प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

‘पुरुषोत्तम’ची वाटचाल लवकरच माहितीपटातून

0
0
महाविद्यालयीन जीवनावर गारूड केलेल्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची गेल्या पन्नास वर्षांची वाटचाल आता ‘पुरुषोत्तम करंडक’ हा माहितीपट उलगडणार आहे. दर वर्षी महाविद्यालयीन रंगकर्मींना खुणावणाऱ्या स्पर्धेतील उत्साह, विद्यार्थ्यांच्या नाटक करण्याच्या ऊर्मीचा वेध या माहितीपटातून घेण्यात आला असून, या माहितीपटामुळे या स्पर्धेचे डॉक्युमेंटेशन होते आहे.

देवस्थानांच्या इतिहासाचा साहित्य ठेवा वाचकांपुढे

0
0
महाराष्ट्रातील कोल्हापूर, पंढरपूर, जेजुरी आणि तुळजापूर या देवस्थांनाचा ऐतिहासिक संदर्भ असलेले महाराष्ट्राची चार दैवते आणि विविध प्रकारच्या मूर्तींचे विवेचन असलेले ‘मूर्तिविज्ञान’ ही ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. ग. ह. खरे यांनी लिहिलेली दोन पुस्तके पुन्हा वाचक-अभ्यासकांच्या भेटीला आली आहेत.

पुणे स्टेशनवरील पुस्तक स्टॉल नव्या रूपात

0
0
पुणे रेल्वे स्टेशनवर गेल्यावर भरपूर पुस्तकांमुळे लक्ष वेधून घेणारा व्हीलर अँड कंपनीचा पुस्तकांचा स्टॉल आता नव्या आणि आकर्षक रुपात सज्ज झाला आहे. स्टॉलच्या ८५व्या वर्धापनदिनानिमित्त स्टॉलचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

गानवर्धनचे आज ‘मुक्त संगीत चर्चासत्र’

0
0
गायन, नृत्य या शास्त्रीय संगीताच्या तिन्ही उपांगाचा समाजात सुयोग्य प्रसार व्हावा या मूळ उद्देशाने गानवर्धन संस्थेची स्थापना झालेली आहे. या संस्थेचे हे ३६ वे वर्ष आहे. त्या निमित्त या संस्थेच्या कार्याचा घेतलेला वेध...

अखेर ‘ती’ तीन गावे पुरंदर सिंचन योजनेत

0
0
पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात पुरंदर तालुक्यातील मावडी, कोळविहिरे व नावळी या तीन गावांचा अधिकृतरीत्या समावेश करण्याचा निर्णय अखेरीस कृष्णा खोरे महामंडळाने घेतला आहे. महामंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

खड्डे बुजविण्यासाठी पालिका अखेर रस्त्यावर

0
0
शहरात गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसानंतर रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती पालिकेने तातडीने हाती घेतली आहे. गुरुवारी पावसाने उघडीप दिल्याने दिवसभर रस्ते दुरुस्तीची कामे केली गेली; तसेच रात्रपाळीतही काही ठिकाणी दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.

खडकवासल्यातून दौंड, इंदापूरला पाणी सोडावे

0
0
पुणे शहराला लागणारे पाणी आणि धरणांतील प्रत्यक्ष पाणीसाठा याचा अंदाज घेऊन दौंड व इंदापूरला खडकवासला प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

प्रवासी वाढविण्यासाठी एसटीची ‘ऑगस्ट क्रांती’

0
0
एसटीचा तोटा कमी करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एक ऑगस्टपासून ‘प्रवासी वाढवा’ अभियान सुरू करण्याचे निश्चित केले आहे. हे अभियान ३० सप्टेंबरपर्यंत राबवण्यात येणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘कुकडी’तून नगर, सोलापूर, बीडला पाणी

0
0
पावसाअभावी दुष्काळस्थिती निर्माण झालेल्या नगर, सोलापूर व बीड जिल्ह्यातील काही तालुक्यांना कुकडी प्रकल्पातून दोन अब्ज घनफूट (टीएमसी) सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारी रात्रीपासूनच सुरू करण्यात आली आहे.

गावांमध्ये बांधकामांची कोटीच्या कोटी उड्डाणे

0
0
महापालिका हद्दीत नव्याने ३४ गावांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर करताच या गावांमध्ये बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. तब्बल १० कोटी चौरसफूट बांधकामे या गावांमध्ये झाली आहेत. याचा मोठा फटका पालिकेला बसणार आहे.

‘स्कॉलरशिप’मध्ये इंग्रजी माध्यमाचे यश

0
0
स्कॉलरशिप मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये यंदा इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे यश प्रकर्षाने जाणवते आहे. चौथी आणि सातवी या दोन्ही इयत्तांच्या गुणवत्ता यादीत इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची संख्या मराठीच्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक आहे.

स्टेट शुगरकेन प्राइस बोर्ड’ची स्थापना करणार

0
0
रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार ‘स्टेट शुगरकेन प्राइस बोर्ड’ स्थापन केले जाणार असून यापुढे त्याच्या मार्फतच ऊसाचा दर निश्चित केला जाणार आहे. राज्याचे मुख्य सचिव त्या बोर्डाचे अध्यक्ष असतील.

ऑनलाइन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय

0
0
अकरावीसाठी यंदा पहिल्यांदाच राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत विविध विद्यार्थी संघटनांतर्फे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले.

विशेष समुपदेशन ३१ जुलैला

0
0
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही कारणाने प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ३१ जुलै रोजी विशेष समुपदेशन फेरी होणार आहे. सध्याची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहणाऱ्या जागांवर या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार आहे.

‘एमबीबीएस’ अॅडमिशनच्या बहाण्याने ३३ लाखांना लुबाडले

0
0
शहरातील एका बड्या मेडिकल कॉलेजमध्ये ‘एमबीबीएस’ला अॅडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने मुंबई येथील एका व्यावसायिकाला ३३ लाख रुपयांचा फसवल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

फसवणूक झाल्यास तत्काळ कळवा

0
0
नाशिक येथील ‘केबीसी’ घोटाळ्याचे लोण पुण्यात तर पसरले नाही ना, याची खातरजमा करण्याची विनंती नाशिक पोलिसांनी पुणे पोलिसांना केली आहे. या प्रकरणी कोणी फसवले असल्यास त्यांनी तत्काळ जवळील पोलिस ठाण्यांना माहिती द्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images